आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली वार्तापत्र: सुखद अाैषधी मूल्यांची वाट काटेरी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेदी सरकारच्या जेनेरिक अाैषधीच्या धाेरणाकडे बघितले तर या सरकारबद्दल अभिमान वाटेल एवढे चांगले कार्य या क्षेत्रात हाेत अाहे यात जराही दुमत असण्याचे कारण नाही. रसायन मंत्रालयाने जेनेरिक अाैषधांबाबत उल्लेखनीय कामगिरी केली. उद्देश खूप चांगला अाहे. परंतु ही वाट अाैषधी कंपन्यांनी व काही वगळता डाॅक्टरांनी काटेरी केली अाहे.

माेदी सरकारने गरीब, सामान्यांना िदलासा देणारे लक्षवेधी पाऊल उचलले अाहे. येणाऱ्या काळात जेनेिरक अाैषधे देशवासीयांना कर्जबाजारी हाेण्यापासून वाचवणार अाहेत. संयुक्त पुराेगामी अाघाडी सरकारच्या काळात जेनेिरक अाैषधांची दुकाने थाटण्यात अाली हाेती. परंतु देशी, िवदेशी अाैषधी कंपन्यांना मनमाेहन िसंग सरकारचे हे पाऊल अापल्यासाठी घातक अाहे, असे वाटले. जनअाैषधीचा प्रसार करण्याअाधीच या शक्तीने सरकारचे ताेंड बंद केले हाेते. केंद्रातील सरकार बदलले आणि पाहता पाहता एक वर्ष हाेऊनही गेले. जनता अाता चर्चा करायला लागली माेदी सरकारने काय केले? माेदी सरकारच्या जेनेिरक अाैषधीच्या धाेरणाकडे बघितले तर या सरकारबद्दल अभिमान वाटेल एवढे चांगले कार्य या क्षेत्रात हाेत अाहे यात जराही दुमत असण्याचे कारण नाही. रसायन मंत्रालयाने जेनेरिक अाैषधांबाबत उल्लेखनीय कामगिरी केली अाहे. अनंत कुमार आणी हंसराज अहिर या खात्याचे मंत्री अाहेत. चंद्रपूरसारख्या मागासलेल्या िजल्ह्यातून अालेले हंसराज अहिर हे लाेकांना अाराेग्य िमळावे म्हणून सतत प्रयत्नशील असतात. िसकलसेलचे देशात सर्वाधिक िशबिरे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अायोजित केलेली अाहेत. त्यांच्याकडे हे खाते येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा करून घर बांधण्यासाठी आिण लग्न करण्यासाठी लाेक कर्ज घेतात अाता अाजारपणासाठीही कर्जाशिवाय पर्याय नसताे हे ठासून सांगितले. महागड्या अाैषधी सामान्य, गरीब लाेकांनी िवकत घ्यायच्या कश्या? अहिरांची तळमळ पाहून माेदींनी त्यांना जेनेिरकसाठी तुम्हाला जेवढे करता येईल तेवढे करा, मी तुमच्यासाेबत अाहे, असे अाश्वासन िदले.
काॅंग्रेस सरकारमध्ये केवळ १०२ अाैषधी उपलब्ध करून िदल्या हाेत्या ती संख्या वाढवत ना. अहिरांनी ५०४ वर अाणली. देशात डाॅक्टरांचे जाळे, त्यांची कट प्रॅक्टिस, अमुक तमुक कंपन्यांचा अाग्रह ही शंृखला ताेडणे सरकारसाठी तारेवरची कसरत हाेती. एखादे िवधायक काम हाती घेतले की त्याला अनेकाची साथ िमळते. वाल्याचे वाल्मीकी हाेतात. तसाच काहीसा प्रकार वैद्यकीय क्षेत्रात झाला अाहे. प्रत्येक क्षेत्रात अापले अस्तित्व िदसावे असावे म्हणून संघटना असतात. डाॅक्टरांचीही इंिडयन मेडिकल असाेिसएशन ही सर्वात माेठी संघटना अाहे. डाॅक्टरांच्या सुख दु:खाच्या क्षणात संवेदनशील असलेली ही संघटना अलीकडच्या काळात रुग्णांच्या हिताचा िवचार करायला लागली हे माेठे परिवर्तन माेदी सरकारच्या काळात घडले. सहा महिन्यांपूर्वी जेनेिरक अाैषध िवक्रीचा िवचार अायएमए पुढे मांडण्यात अाला तेव्हा त्यातील काही पदाधिकाऱ्यांनीच फाटे फाेडायला सुरुवात केली. ज्यांचा थेट कमीशनचा संबंध येत हाेता त्या सगळ्यांनीच याला माेठ्या प्रमाणात िवराेध केला. कारण बाजारपेठेत नामांकित कंपन्यांच्या नावाने िवकल्या जाणाऱ्या अाैषधींच्या तुलनेत जेनेिरक परंतु ब्रॅन्डेड अाैषधी ८० ते ९० टक्के सवलतीत रुग्णांना उपलब्ध हाेणार हाेत्या. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास एम्लाेिडपाइन १० गाेळ्या २० रुपयास िमळतात त्या जेनेरिकमध्ये केवळ अडिच रुपयात िमळत अाहेत. वेदनाशमक गाेळ्या ३० रुपयाहून ५ रुपयांवर, रक्तदाबावरील गाेळ्या ९४ रुपयांहून १० रुपये, तापावरील गाेळ्या ४२ रुपयांहून साडेतीन रुपये, साखरेच्या अाजारावरील गाेळ्या ६६ रुपयांहून केवळ तीन रुपयांवर, प्रतिजैिवक १५० रुपयांहून ४१ रुपयात उपलब्ध हाेत अाहे. या वर्षात िकमान एक हजार अाैषधी रुग्णांना अगदी स्वस्त दरात उपलब्ध हाेतील. त्यात क्षय आणी कर्कराेगावरील अाैषधी असतील. अायएमएच्या डाॅक्टरांमध्ये जेनरीक अाैषधांसाठी सकारात्मक भावना निर्माण व्हायला जवळपास सहा महिने लागले. याची सुरुवातच अायएमएच्या मुख्यालयातून झाली. पहिले स्टाेअर त्यांनी सुरु केले. अाता देशभरातील १४०० शाखांमध्ये जनअाैषधीचे दुकान सुरु हाेत अाहे. केंद्र सरकारला िमळालेले हे खूप माेठे यश अाहे. येत्या अाॅगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते िद. १४ अाॅगस्ट राेजी या अभियानाचा प्रारंभ हाेत अाहे त्या िदवशी देशभरात तीन हजार जनअाैषधींचे दुकाने सुरु हाेतील. तर पुढच्या चार वर्षात प्रत्येक गावात जनअाैषधीच्या दुकानांमध्ये गर्दी िदसून येईल. देशात चांगली सुरुवात झाली असली तरी डाॅक्टरांचा हा उत्साह िकती िदवस टिकेल याकडेही पाहिले पाहिजे. सगळेच डाॅक्टर वाईट नाहीत परंतु अनेकांचा डाेळा पैशावर असताे. बलाढ्य अाैषधी कंपन्यांकडून भेट वस्तू स्वीकारणाऱ्या महाराष्ट्रातील १३ डाॅक्टरांवर इंिडयन मेडिकल काैन्सिलच्या (एमसीअाय) एथिक समितीने अलीकडेच कारवाई केली हाेती. या डाॅक्टरांनी अाैषधी कंपन्यांकडून फ्लॅट्स, माेटारी आणी िवदेशातील सहली केल्या असल्याचे एमसीअायच्या चाैकशीअंती स्पष्ट झाले हाेते. अहमदाबाद येथील इरिस लाईफ सायन्सेस याअाैषधीनिर्मिती कंपनीने अनेक डाॅक्टरांना ५० लक्ष रुपयांच्या मर्सिडीज कार िदल्या हाेत्या. काही अाैषधी कंपन्यांनी डाॅक्टरांच्या पाल्यांच्या िवदेशातील िशक्षणाचा भार साेसला अाहे. हे सगळे उघडकिस येऊही या कंपन्यांवर काेणतीही कारवाई झाली नाही. िकंबहुना त्या डाॅक्टरांची पदवी रद्द करण्यात अाली नाही. लाेकांचा डाॅक्टरांवर िवश्वास असताे त्यामुळे ताे कसाही वागला तरी त्याच्या शब्दांच्या पलिकडे रुग्ण जात नाही. अमुकच कंपनीची अाैषधी िवकत घ्या आणी याच दुकानातून घ्या, असा अाग्रह धरणारे डाॅक्टर समाजासाठी अत्यंत घातक अाहेत ते केवळ पैशात अाकंठ बूडु पाहताहेत त्यांना राेखणे ही सरकारची माेठी परिक्षा ठरणार अाहे.
इंिडयन मेडीकल असोसिएशनने जनअाैषधींसाठी पुढाकार घेतला असला तरी िकती डाॅक्टर नैतिकता पाळतील हा प्रश्न या संस्थेतील पदाधिकाऱ्यांपुढे अाहे. िशवाय काही डाॅक्टर जेनेरीक अाैषधांच्या गुणांबद्दल गैरसमज िनर्माण करीत असल्याचेही िदसून येते आहे. अाैषधांचा दर्जा अन्य कंपन्यांच्या दर्जाएवढाच असणार अाहे. यात केवळ जाहीरातीचा खर्च, अाकर्षक पैकींग आणि डाॅक्टरांचे कमिशन आणि निर्मात्याचा खूप सारा नफा याबाबींचा समावेश नसल्यानेच त्या ८० ते ९० टक्क्यांनी स्वस्त िमळणार अाहे. केंद्र सरकारही यासाठी गंभीर असल्याचे िदसून येते. सरकारी रुग्णालयातून यापुढे जेनेरीक अाैषधीच िमळतील. खासगी डाॅक्टरांनाही अाैषधीसमाेर ‘जेनेरीक’ असे कॅपिटल अक्षरात िलहावे लागेल. जे डाॅक्टर िलहिणार नाहीत त्यांच्या नैतिकतेच्या तपासण्या नंतरच्या काळात सरकार आणि समाज करेल हे नव्याने सांगायला नकाे. सरकारचा उद्देश खूप चांगला अाहे परंतु ही वाट अाैषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी व काही वगळता असंख्य डाॅक्टरांनी काटेरी केलेली अाहे.