आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी शिक्षण असूनदेखील महिलाजागृतीचे कार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत - कर्नाटकच्या ग्रामीण आणि किनारपट्टी क्षेत्रात महिलांना स्वच्छतेसाठी त्या जागरूक करतात.
लहान वयात लग्न झाल्यामुळे गिरिजा यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. लग्नानंतर कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्नही केला, मात्र ते जमले नाही. मुलांच्या शिक्षणात त्यांनी लक्ष घातले. त्यांचा एक मुलगा वकील तर दुसरा लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गिरिजा यांच्या सासरची माणसे अमेरिकेत आहेत. त्यामुळे सासू-सासऱ्यांनीही तिकडेच जाणे पसंत केले. गिरिजा आणि त्यांचे पती दावणगेरेमध्ये राहिले. साडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. खरेदीच्या निमित्ताने त्यांचे बंगळुरूला येणे झाले. खरेदी करतेवेळी त्यांना विविध प्रकारची अंतर्वस्त्रे पाहायला मिळाली. ग्रामीण महिलांनाही असे कपडे आवडू शकतील, मात्र त्यासाठी त्या शहरात येणार नाहीत, असे त्यांना वाटले. यासंदर्भातील अभ्यास आणि विचारविनिमयानंतर त्यांनी स्वत:ची वेबसाइट सुरू केली. आपल्या कामावर त्या एखाद्या एमबीएची नियुक्ती करू शकत नव्हत्या ना कोणते बडे नाव त्यांच्याजवळ होते. माफक दरात कोणकाेणती अंतर्वस्त्रे मिळू शकतात हे ग्रामीण तरुणींना कळावे हा त्यामागचा उद्देश होता. वेबसाइट सुरू केल्यानंतर गावागावात सामग्री पाठवायची कशी, ही समस्याही त्यांच्यासमोर होती. सुरुवातीला ते स्पीड पोस्टने पाठवणे सुरू झाले.
सध्या त्यांच्या गंगावती एक्स्पोर्टची उत्पादने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खरेदी केली जात आहेत.

त्यांच्या आगामी मोहिमेत ग्रामीण व किनारपट्टी क्षेत्रातील महिलांना कपड्यांच्या स्वच्छतेबाबत जागरूक केले जाणार आहे. यामध्ये त्यांचा एक मुलगा संतोष त्यांच्याबरोबर आहे. महिलांना अस्वच्छतेमुळे कोणताही आजार जडू नये यासाठी वर्षभराच्या मोहिमेत प्रयत्न केले जातील, असे त्यांची सून अनिताने सांगितले.
गिरिजा पावते, निर्यातदार
वय - ५०
कुटुंब - पती, दोन मुले- दोन सुना.