आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍त्री उद्योजकताः संधी आणि आव्‍हाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज एकविसाव्या शतकात स्त्री करिअरच्या बाबतीत फार सजग झाली आहे. आज जवळजवळ सर्वच क्षेत्रे स्त्रियांनी पादाक्रांत केली आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी आजची स्त्री प्रयत्नशील आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत त्या जवळपास सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. विमान, रेल्वे, रिक्षा, ट्रक, टॅक्टर चालविण्यासारख्या राकट कामांतही ती अग्रेसर आहे. अशक्यप्राय आव्हाने स्वीकारून यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास तिची सतत आगेकूच सुरू आहे.

महिलांमध्ये उद्योजकता रुजल्याशिवाय घराघरांत उद्योजकता रुजणार नाही. कुटुंबातील एक स्त्री उद्योजक झाली तर उद्योजकतेचे संस्कार ती आपल्या कुटुंबावर करील. तिच्या उद्योजकीय संस्कारातून भावी पिढी उद्योजकीय होईल. उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे सारे गुण तिला निसर्गाने बहालच केले आहेत. स्त्रियांना उद्योगातील काडीमात्र कळत नाही असा समाजातील बहुसंख्य पुरुषांचा गैरसमज होता. पण काही महिलांनी एकत्र येऊन पापड बनविण्याचा घरगुती उद्योग सुरू केला आणि हळहळू आपल्या पापडाची ‘लिज्जत’ जगभर पसरवली. ‘लिज्जत पापडाने’ आपलं नाव केवळ देशातीलच नव्हे तर परकीय बाजारपेठेत गाजवले आणि महिला उद्योजकांचे खरे अस्तित्व या पुरुषप्रधान समाजाला कळले.

स्त्री उद्योजकतेचा प्रारंभ 1990 च्या सुमारास झाला कारण 1990 नंतर जागतिकीकरणामुळे स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले. स्त्रियांचा उद्योग क्षेत्रातील लक्षणीय सहभाग पाहता, 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरणात भारत सरकारला स्त्रियांच्या उद्योजकतेबाबत स्वतंत्रपणे विचार करावा लागला. लघु उद्योगाच्या क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योगात महिला मोठ्या संख्येने रोजगार करीत आहेत. लघुउद्योग क्षेत्रात महिला उद्यमींची एकूण संख्या 10, 63, 721 (10.़11टक्के) असल्याचा अंदाज आहे. केवळ महिलांद्वारे व्यवस्थापन चालविणार्‍या उद्योगांची संख्या एकूण 9,95 141 (9़ 46 टक्के) असल्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला या लघु उद्योगासोबत जुळलेल्या आहेत. सुमारे 13 टक्के महिला लघुउद्योग क्षेत्रात नोंदणीकृत आहेत, तर उर्वरित 87 टक्के महिला लघुउद्योग क्षेत्रात अनोंदणीकृत आहेत. रोजगाराच्या संदर्भात महिलांद्वारे प्रबंधित क्षेत्रातील भागीदारी 7 ़ 14 टक्के होती. महिलांद्वारे चालविण्यात येणार्‍या लघुउद्योग क्षेत्रात प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2 ़ 49 टक्के रोजगारांच्या संधी उपलब्ध होत्या. लघुउद्योग क्षेत्रातील महिला कर्मचार्‍यांची संख्या 33़17,496 एवढी आहे यातील 57़ 62 टक्के महिला कर्मचारी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यातील लघुउद्योगात कार्य करीत आहेत. लघुउद्योग क्षेत्रातील एकूण रोजगारांत महिला कर्मचार्‍यांचे प्रमाण 13 ़ 31 टक्के होते. मिझोराम, ओरिसा, कर्नाटक, गोवा, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आणि पाँडेचरी या राज्यात महिला रोजगाराची हिस्सेदारी या राज्यातील एकूण रोजगाराच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सॅटर्डे क्लब ही जागतिक संघटना महाराष्ट्रीय उद्योजकांचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, यासाठी बिझनेस नेटर्वकिंगच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. याच संघटनेच्या ‘वुमन आंत्रप्रिन्युर फोरम’मार्फत महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या व्यवसायाचे आदानप्रदान व्हावे. एकंदरीतच व्यवसायवृद्धी व्हावी याकरिता एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद 27 जुलै 2013 रोजी ठाणे येथे होणार आहे.

बदलत्या काळाची पाऊले ओळखून सॅटर्डे क्लबने महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या व्यावसायिक अनुभवांचे आदान प्रदान व्हावे, महिला उद्योजकांच्या विविध समस्यांचे निरसन व्हावे, त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन केले आहे. लघु उद्योग आणि ग्रामीण भागातील लघु उद्योगांत महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग लक्षात घेता, कौशल्य प्राप्त कर्मचार्‍यांची आवश्यकता लक्षात घेऊन महिला उद्यमींना प्रशिक्षण देण्याचे काम लघु उद्योग मंत्रालयामार्फत करता येते. भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या लघुउद्योगात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असावा या उद्देशाने लघु उद्योग मंत्रालयामार्फत चालविल्या जाणार्‍या योजनेतून महिलांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकाधिक महिला उद्योगांची कास धरून आपले आर्थिक सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न लघु उद्योगामुळे केला जातो.