आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोन्याच्या बाजारभावाने मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ. आता या विद्यापीठाला 2016 या वर्षी 100 वर्षे पूर्ण होतील... महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लावलेले छोटेसे रोपटे आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्याच्या शाखा भारतात अनेक राज्यांत पसरल्या आहेत. याच विद्यापीठाचे 1979 ला दूरशिक्षण विभाग (सेंटर फार डिस्टन्स एज्युकेशन) सुरू केला. या दूरशिक्षण विभागामुळे संपूर्ण दिवस काम करणाºया महिलांना काम करून शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. ती मुक्त विद्यापीठांनी प्राप्त करून दिली.
महिला विद्यापीठ महिलांच्या उत्कर्षासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यातच एक आगळावेगळा कार्यक्रम फेबुवारी महिन्यात तीन दिवस घेण्यात आला. महिला विद्यापीठ व यूजीसी एरिया सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत-कॅनडा आंतरराष्ट्रीय (ऑन ओपन अँड फ्लेक्झिबल डिस्टन्स र्लनिंग) आपल्याकडे ‘मुक्त व लवचिक दूरशिक्षण’ हे अधिवेशन विद्यापीठाच्या जुहू येथील आवारात अलीकडेच पार पडले. मुक्त व लवचीक दूरशिक्षण कशा प्रकारचे असते, अशा दूरशिक्षणाची मानवी विकासांत कशी भर पडते किंवा या मुक्त व लवचीक दूरशिक्षणाची आज समाजात का गरज आहे, या गोष्टींची चर्चा या अधिवेशनात करण्यात आली. ज्याप्रमाणे भारतात जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामानंद तीर्थ, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, स्वामी विवेकानंद आणि यशवंतराव चव्हाण यांसारखे अनेक विद्वान लोक जीवनभर शिकत राहिले व इतरांना त्यांनी शिक्षणाचे धडे दिले. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून सर्व लोकांच्या विकासाचा पाया मजबूत केला. भारतातील उच्च शिक्षणाचे लक्ष्य प्राप्त करून घेण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले. म्हणून शिक्षणाचा तोच तोच सारखेपणा न होता आता तयार आधुनिक जगाची व ज्ञानाची आणि समाजातील शिक्षणाची भूक पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांसाठी सुलभ व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, हे या अधिवेशनाचे उद्दिष्ट होते.
भारत-कॅनडा मुक्त व लवचीक दूरशिक्षण आंतरराष्ट्रीय अधिवेशनात एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत तसेच या अधिवेशनाच्या प्रमुख डॉ. जय शिंदे तसेच कॅनडा व मलेशिया प्रांतातून आलेले मान्यवर अनुवर अली, पा. मुखोउपाध्याय, प्रा. रोरी मॅकग्रिल, प्रा. मेक्यूयल आलम, प्रा. किनशुक, प्रा. मिशेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, तसेच मान्यवर डॉ.राम ताकवले आणि एम.के.सी.एल. चे प्रमुख डॉ. सावंत तसेच एस.एन.डी.टी. मुक्त विद्यापीठाचे संचालक प्रो. शितोळे अशी अनेक मान्यवर, व्यासंगी, तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्राचे राज्यपाल शंकर नारायणन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुक्त व दूरशिक्षण प्रदान करण्यासाठी कॅनडा व भारत या दोन्ही देशांतील अनुभवाची देवाण-घेवाण करणे हा मुख्य उद्देश या अधिवेशनाचा होता. मुक्त व लवचीक दूरशिक्षणासाठी जगभरातील शिक्षण तज्ज्ञांमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा व कार्यक्रम घडवून आणण्याची संधी उपलब्ध करून देणे. मुक्त व लवचीक दूरशिक्षण अधिवेशनाचा प्रमुख उद्देश भारत व कॅनडा या देशांच्या अनुषंगाने विकसनशील व विकसित देशामध्ये मुक्त अध्ययनासंबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी व्यासपीठ ठरावे, अशी आशा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांनी व्यक्त केली. आजच्या या परिस्थितीत भारत व कॅनडातील मुक्त व दूरशिक्षणांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी शिक्षण तज्ज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, अध्ययनासाठी उपयुक्त अशा ई-र्लनिंग तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल व त्यात सखोल संशोधन होईल, आणि शिक्षण पद्धती व तंत्रज्ञान यांचे एकत्रीकरण कसे होईल, याचीही चर्चा अधिवेशनात झाली. मुक्त व लवचीक दूरशिक्षण अध्ययनातील गुणवत्ता व शाश्वती आणि उपलब्ध असलेले शैक्षणिक संसाधन, अशा प्रकारच्या विविध विषयांवर व्यासंगी व विद्वान तज्ज्ञांच्या उपस्थितीत अनेक विषय सादर करण्यात आले. मुक्त व लवचीक दूरशिक्षण अधिवेशनाचे ध्येय हे या लोकविद्यापीठाच्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षण या ध्यासाने शैक्षणिक चळवळ उभी करणे या ध्येयासाठी मुक्त व लवचीक शिक्षण प्रणालीच्या ज्ञानव्यवहारात स्वत:च्या भाषेचा वापर करणे, असा असल्याची चर्चा यात झाली. समाजाच्या आशा-आकांक्षा, सांस्कृतिक व भौतिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक व तंत्र विज्ञान व व्यावसायिक शिक्षणक्रम, शैक्षणिक नेतृत्व उत्तम अशा प्रकाराच्या निकषांवर आज हे शिक्षण उभे करण्याची गरज आहे, अशी आशा कुलगरूंना वाटते. महिलांना उच्च शिक्षण देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ कटिबद्ध आहे. उच्च शिक्षण जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण मनुष्याच्या आशा-आकांक्षांशी शिक्षणाची नाळ जुळते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.