आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dolly Thakur About On Director Richard Attenborough

मोहवून टाकणारा माणूस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला अगदी स्पष्ट आठवतंय. सप्टेंबर १९७९ मधला एक दकिस. दुपारी दोनच्या सुमारास दारावरची घंटा वाजली. मी दार उघडलं तर माझी मैत्रीण राणी दुबे समोर उभी. तिच्यासोबत चक्क रिचर्ड अॅटनबरो. तेव्हा माझा मुलगा कासार (कासार पदमसी)वर्षाचा होता, आम्ही एका लहानशा घरात राहत होतो, फार फर्नणिरही नव्हतं घरात. ते दोघे आले आणि चक्क खाली पसरलेल्या गाद्यांवर बसले. तेव्हा मी आणि अलेक(अलेक पदमसी) नाट्यक्षेत्रात होतो, घरातल्या भिंतींवर नाटकवाल्यांची छायचित्रे लावलेली होती. त्यावरून रणिर्ड यांनाही आमचा अंदाज आला. त्यांना "गांधी' या णति्रपटाचं काम सुरू करायचं होतं आणि ते अभिनेत्यांच्या शोधात होते. त्यांना फिल्मस्टार्स नको होते, रंगभूमी कलाकारच हवे होते. आम्ही बोलत असतानाच अलेकही घरी आला. तो आल्या आल्या रणिर्ड म्हणाले, धिस इज माय जिन्ना! (हेच माझे जिन्ना) आम्ही रात्री एकत्र जेवायला गेलो. दोन-तीन दकिसांनी त्यांचा फोन आला, मी कास्टिग डायरेक्टर म्हणून काम करू शकते का ते किचारायला. मी हो म्हटलं. तेव्हा भारतात कास्टिग डायरेक्टर असं काम कोणीच करत नव्हतं, मुख्यत्वे पंजाबी दिग्दर्शक वा नरि्माते णति्रपट काढायचे आणि त्यात याची बहीण, त्याचा भाऊ अशांनाच काम मिळायचं. (पटातल्या व्यक्तीरेखेनुसार अिभनेते नकिडण्याचं काम कास्टिंग डायरेक्टर करत असतात.)
एकदा काम करायचं नशि्चति झाल्यावर मी कासारला घेऊन दिल्लीत राहायला गेले. अशोक हॉटेलची एक किंग रणिर्ड यांनी घेतली होती. तळमजल्यावर कार्यालयं होती, पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवर आमच्या राहायच्या खोल्या होत्या. माझ्या खोलीत एका भिंतीवर मी णति्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखांची, म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या नेत्यांची छायाणति्रे लावून ठेवली होती. आपण इतहिासाच्या पुस्तकात त्यांच्याबद्दल वाचलेलं असतं, परंतु ते दिसत कसे होते हे आपल्याला तितकंसं नीट ठाऊक नसतं. इतहिासाच्या पुस्तकात असणाऱ्या छायाणति्रांवरून अभिनेते नकिडणं अशक्य होतं, म्हणून मी ती छायाणति्रं लावून ठेवली होती. दुसऱ्या भिंतीवर मी ज्या कलाकारांना वाव देणं शक्य होतं, त्यांची छायाणति्रं लावली होती. रणिर्ड यांनी मला नकिडीचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी कुठेही प्रवास करू शकत होते. मी कोलकात्याला गेले एक नाटक पाहायला, तिथे मला शेखर चॅटर्जी हा अभिनेता सापडला. बंगालची फाळणी टाळण्याचा प्रयत्न करणारे सुऱ्हावर्दी या नेत्याच्या व्यक्तीरेखेसाठी तो मला योग्य वाटला. चेन्नई, तिरुवनंतपुरम, याही िठकाणी मी प्रवास केला. अमरीश पुरी, ओम पुरी हे कलाकार अर्थात आमच्या यादीत होतेच; परंतु त्यांचं काम पाहायला मुद्दाम कुठे जाण्याची आवश्यकता नव्हती. रोहिणी हट्टंगडी तेव्हा नाटकात काम करत असे. मी ते नाटक पाहायला मुंबईला आले. मला वाटलं, ही कस्तुरबाच्या भूमिकेसाठी योग्य आहे; पण रणिर्ड तेव्हा दिल्लीत होते आणि त्याच रात्री लंडनला जाणार होते. रोहिणीकिषयी कळल्यावर ते आधी मुंबईला आले, सेंटाॅर हॉटेलमध्ये मी रोहिणीची आणि त्यांची रात्री ११ वाजता भेट घडवून आणली. ही कस्तुरबाच आहे, असं ते म्हणाले रोहिणीला पाहिल्यावर; पण तुला कमिान ११ किलो वजन कमी करावं लागेल, असंही त्यांनी लगेच सांगून टाकलं. रोहिणीचं वजन कमी करणं ही माझीच जबाबदारी होती. मी केम्प्स कॉर्नरजवळचा एक डॉक्टर शोधला. त्याने तिला पथ्य तर सांिगतलंच शकिाय दीड तास चालायचा व्यायाम करायचीही सूचना केली. रोहिणी रोजच्या रोज व्यायाम करते की नाही, याकडे माझं व्यवस्थति लक्ष होतं. बऱ्यापैकी वजन कमी झाल्यावर ती लंडनला गेली आणि तिथे तालमी व उच्चार वगैरेचं प्रशकि्षण सुरू झालं. मला तेव्हा खरं तर भक्ती बर्वे आणि िस्मता पाटील या दोघी गुणी अिभनेत्रींना घेण्याची फार इच्छा होती. या दोघींची स्क्रीन टेस्टही झाली होती, परंतु रोहिणीलाच कस्तुरबाची भूमिका मिळाली. रोहिणीकडे पासपोर्टही नव्हता, तेव्हा तो मिळवून द्यायलाही मी तिला मदत केली होती. मी त्यांना अिभनेत्यांची नावे सुचवत असे, पण शेवटचा नरि्णय त्यांचाच असे. अर्थात, त्यांनी मी सुचवलेली सर्व नावे स्वीकारली, हेही खरेच. मी एकूण ४९८ नावे सुचवली होती! हॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या नकिडीचे काम सुझी फिगिस यांनी केले होते.

रणिर्ड अत्यंत शांतपणे काम करत. समोरच्याला मोहवून टाकत ते. लोकांकडून योग्य प्रकारे काम करून घेण्याची कलाही त्यांना चांगलीच अवगत होती. ते डारि्लंग, पपेट, एंजल अशा लाडिक संबोधनाने अनेकदा समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत. बहुधा त्यांना सगळ्यांची नावं लक्षात राहायची नाहीत. डॉल, डारि्लंग अशाच नावाने मलाही हाक मारत. प्रत्यक्ष छायाणति्रण सुरू नसेल, तरी ते स्वस्थ बसून राहत नसत. सतत अभिनेते, इतर तंत्रज्ञ यांच्याशी चर्चा करत. ते काहीही काम करत नाहीयेत असा एकही क्षण नव्हता तेव्हा.

काम करताना आम्हाला जसं स्वातंत्र्य होतं, तसंच पैशांचीही कमी पडत नव्हती. कुठेही किमान, टॅक्सीचा प्रवास, हॉटेलात राहण्याचा खर्च, कशावरच बंधन नव्हतं. असा मोकळेपणा, एवढं स्वातंत्र्य नंतर फार कमी णति्रपटांसाठी काम करताना मला अनुभवायला मिळालं.

"गांधी' या चित्रपटाने माझं करिअरच बदलून गेलं. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांचं, या णति्रपटाशी जोडल्या गेलेल्या सर्वांचंच आयुष्य बदलून गेलं. माझ्यावर या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या डबिंगचीही जबाबदारी येऊन पडली होती. मग अनुपम खेर, पंकज कपूर, कुलभूषण खरबंदा आदी कलाकारांकडून आम्ही डबिंग करून घेतलं. तेव्हा बांद्र्याच्या सॉरिक हॉटेलमध्ये एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता, तिथे हे काम चालायचं. संगीताचं रेकॉर्डिंग बीआर चोप्रा स्टुडिओत झालं. रवशिंकर आणि जॉर्ज फेंटन यांच्याकडून संगीत करवून घेतलं होतं. जॉर्ज ताजमहाल हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांना आणायला मी बऱ्याचदा जात असे.
आता इतक्या वर्षांनंतरही त्या चित्रपटाशी संबंधित कोणीतरी भेटतं आणि या आठवणींना उजळा मिळतो. जा‍लियनवाला बाग हत्याकांडाच्या प्रसंगात चन्नी नावाचा एक सरदार रंगकर्मी होता. या कामाचे त्याला तेव्हा चार हजार रुपये मिळाले होते. त्यातनं त्याने फ्रजि घेतला आणि त्याफ्रजणिं नाव ठेवलं डॉली! चार वर्षांपूर्वी चन्नी दिल्लीत एनएसडीमध्ये मला भेटला, तेव्हा त्याचा मुलगा त्याच्यासोबत होता. आम्ही भेटल्यावर तो मुलाला म्हणाला, आपला फ्रजि आठवतोय का डॉली नावाचा. मुलगा हो म्हणाल्यावर चन्नीने माझ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाला,हणि्यावरून नाव ठेवलं होतं त्या फ्रजणिं.
मी त्यांच्याशी फति्रपट संपल्यानंतरही संपर्कात होते. लंडनला जेव्हा जेव्हा गेले, तेव्हा तेव्हा त्यांना भेटले. ज्या व्यक्तीशी तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता, काहीही प्रश्न वणिारू शकता, काहीही सांगू शकता, असे रणिर्ड होते. त्यांनी कायम माझे स्वागतच केले. इतका मोठा माणूस आहे, कसं भेटायचं अशी भीती त्यांच्याबद्दल वाटत नसे. शेवटची २००६ मध्ये भेटले होते. नंतरही त्यांच्या एका सहकाऱ्याच्या संपर्कात होते व त्यांच्या प्रकृतीची वणिारणा करत होते. "गांधी'च्या आठवणी माझ्यासोबत कायमच राहतील. रणिर्ड यांच्याही आठवणी राहतील अर्थात मनात.
(शब्दांकन : मृण्मयी रानडे, संपादक, मधुरिमा)