आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही वरील हिंदी मालिकांची माझी आवड ज्या वेगाने वाढते, त्याच वेगाने त्या मालिका मला खिन्न करून द्विधा मन:स्थितीत लोटतात. त्यांच्यामुळे मला जीवनाचा उबग येतो. टीव्ही बंद करताच माझे मन अनेक गोष्टींकडे ओढ घेऊ लागते. प्रशस्त दिवाणखान्यात उतरणा-या लांब पाय-या असलेल्या एका मोठ्या बंगल्यात राहावेसे वाटते. माझ्या घरात रेशमी सोफा असावा, सुंदरसा सेंटर टेबल असावा, असे मला वाटते. संगमरवरी मूर्तींनी घर सजवण्याची इच्छा होते. संपूर्ण पाय-यांवरचे रेड कार्पेट थेट माझ्या शयनकक्षापर्यंत अंथरलेले असावे. वा-याच्या झोतावर झुळझुळणारे मऊ पडदे व भिंतीवरच्या तसबिरींच्या चौकटी गालिच्याशी मेळ खाणा-या असाव्या असे मला वाटते.
सुंदरशा बनारसी, कांजीवरम साड्यांनी कपाट भरलेले असावे. गुलाबी साडीवर काळ्या चपला मी कधी घालणार नाही, कारण माझ्याकडे साड्यांच्या रंगांशी मेळ साधणारी पादत्राणे असतील. एखाद्या राजाचा खजिना असावा एवढे दागदागिने माझ्याकडे असतील. सुंदर राणीसारखी मी नेहमी सजलेली असेन. माझ्या डोळ्यांमध्ये आय-लायनर, पापण्यांवर मस्करा व ओठांवर लालचुटूक लिपस्टिक लावलेली असावी. माझ्या कुरळ्या केसांच्या बटा वा-यावर उडतील अशी माझी केशरचना असेल.
माझ्या स्वयंपाकघरात चमचमणारी भांडी असावीत. मायक्रोवेव्ह ओव्हन, डिशवॉशर असेल, ग्रॅनाइट काउंटरटॉप बसवून घेण्याचा माझा मानस असेल. माझा नवरा फक्त माझ्यावर लट्टू असावा व सगळ्या जगाने मला ‘आदर्श बहू’ म्हणावे. असे मला मनातून वाटत राहते.
टीव्हीवरील हिंदी मालिका पाहिल्यांनतर अशा अनेक गोष्टींचा मला ध्यास लागतो.
पण, भांडी घासतानाही रेशमी साडी नेसणा-या व अंगभर दागिने घालणा-या या स्त्रिया राहतात तरी कोणत्या देशात? मे महिन्याच्या उकाड्यातही कपाळावर घामाचा थेंबही न येऊ देता या स्त्रिया स्वयंपाकघरात कशा काय राबतात हे मला जाणून घ्यायचे आहे. राजमहालासारखे घर, शाही विवाहसोहळे, नोकरांचे गणवेश असे की, आपल्या कपड्यांची लाज वाटावी. टीव्ही मालिकांमधील या जगाने माझ्या मनाचा ठाव घेतला आहे. माझा नवरा त्याच्या कार्यालयातील अडचणी सांगतो किंवा मुलगा शाळेत दिवस कसा गेला हे सांगतो तेव्हा मी काहीही न बोलता फक्त स्मित करत असते, कारण मी तेव्हा टीव्ही मालिका पाहात असते.
दिवसाचे अनेक तास मी टीव्हीच्या विश्वात रममान झालेली असते. या मालिकांमधील कुटुंबाशी माझे काही एक नाते नाही, पण या कुटुंबासाठी मी अनेकदा
माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करते. तुम्ही पण असेच करता का? टीव्ही मालिकांच्या या पोकळ स्वप्नवत विश्वात तुम्हीपण दररोज हरवून जाता व ब्रेकमधील काही क्षणात स्वत:च्या जगात असता का?
vitusha.oberoi@dainikbhaskargroup.com लेखिका मिड-डेच्या माजी संपादक सध्या कॅनडात वास्तव्य
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.