आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Vijay Pangrekar Article About Social Work, Divya Marathi

गरजूंना मदत करणे हाच खरा धर्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘भूमिका’ पानावरील ‘जीवनमार्ग’ सदरात, (20 फेब्रुवारी) ‘वर्तमानात खरी सेवा,’ या शीर्षकाखाली जे मौलिक मार्गदर्शन केलेले आहे, ते खूपच छान आहे. धनिक वर्गात समाजसेवा आजकाल फॅशन समजली जाते. पण जे खूप श्रीमंत नाहीत ज्यांच्याजवळ खूप पैसा नाही तेसुद्धा गरजूंना मदत करून, आपल्या ऐपतीप्रमाणे, मानसिक समाधान मिळवू शकतात. ह्या लेखांत लिहिल्याप्रमाणे, कोणाच्याही मदतीला धावून जाणे इतकी सेवा तर तुम्ही नक्कीच करू शकाल. मी माझ्या जीवनात असा आनंद लुटत असतो.हा आनंद खूपच विलक्षण असतो. घरी खूप नोकर-चाकर आहेत, पण मन:शांती नाही; मग काय उपयोग अशा भरमसाठ पैशाचा. स्वामी विवेकानंद म्हणतात,‘देवळांत जाऊन, देवाच्या पाया पडण्यापेक्षा आणि देवस्थानासाठी करोडोची देणगी देण्यापेक्षा, गरीब आणि गरजवंतांची भूक भागवल्यास, खरी देवपूजा होईल, खरे पुण्य लाभेल.