आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिजैविकांचा अतिवापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटिबायोटिक्सला (प्रतिजैविके) अँटिबॅक्टेरियल्स असेही म्हणतात. शरीरात जीवाणूंच्या प्रसारामुळे नुकसान होत असेल तरच ही आैषधे दिली जातात. अँटी हा एक युनानी वा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ विरोध असा होतो. बायोस म्हणजे जीवन. अर्थात जीवनविरोधी बॅक्टेरियाशी लढणारे आैषध.

अँटिबायोटिक्सचा प्रयोग शरीराला अपायकारक जीवाणूंशी लढण्यासाठी केला जातो. बॅक्टेरिया शब्द बॅक्टेरियमचे अनेकवचन आहे. टीबी आणि इतर प्रकारचे संक्रमण रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. मंेदूज्वरासारख्या भयंकर रोगांचे कारण बॅक्टेरियाच असतात. काही बॅक्टेरिया घातक, तर काही लाभदायक असतात.
यू. एस. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, अँटिबायोटिक्स आैषधे बॅक्टेरियाशी लढतात. याचा योग्य वापर केल्यास ते जीवनरक्षक आहेत. बॅक्टेरियाच्या प्रसारास त्यामुळे प्रतिबंध होतो. त्यामुळे त्यांचा खात्मा होतो. तुमच्या शरीरातील नैसर्गिक प्रतिकारक्षमता अशा बॅक्टेरियांशी लढा देतात. मात्र, आजारात प्रतिजैविक आैषधे घ्यावी लागतात. याच्या शरीरातील वाढीला व रोगांचा संचार होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करण्याची नैसर्गिक क्षमता व्यक्तीत असते. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतात. मात्र, त्यानंतरही संसर्ग झाला तर अँटिबायोटिक्स घ्यावे लागते.

पेनिसिलीन हे पहिले प्रतिजैविक आहे. याच्याशी संबंधित अॅम्पिसिलीन, अॅमॉक्सिलीन व बेंजिलपेनिसिलीन ही अँटिबायोटिक्स आहेत. यांचा वापर सध्या व्यापक प्रमाणात होत आहे. याशिवाय इतर अनेक प्रतिजैविके आहेत. अनेक देशांतील डॉक्टर्स हे घेण्याचा सल्ला देतात.

अतिवापर केल्यास
सध्या जगभरात प्रतिजैविकांचा अतिवापर ही प्रमुख समस्या आहे. कारण अतिवापराने बॅक्टेरिया या आैषधींवर मात करू शकतात. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनेही प्रतिजैविकांच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युरोपात २०१२ मध्ये काही तथ्ये सादर केली. यानुसार प्रतिजैविके बॅक्टेरियावर प्रभावी ठरत नसल्याने दरवर्षी २५,००० लोकांचा मृत्यू होत आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्रतिजैविकांचा शोध लावला. १९४५ मध्ये यासाठी त्याला नोबेलने गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना फ्लेमिंग म्हणाले, ‘एक अज्ञानी व्यक्ती याचा अतिवापर करून शरीरास पोषक मायक्रोब्स वा बॅक्टेरियांचाही खात्मा करू शकते.’ याचा अर्थ ७० वर्षांपूर्वीच याच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगण्यात आले होते. अनेक प्रकारची प्रतिजैविके एक वा दोन पद्धतींनीच काम करू शकतात.
नवे संशोधन
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ३० वर्षांच्या टप्प्यानंतर नवे प्रतिजैविक शोधणे शक्य झाले आहे. हे एक टॅक्सोबॅक्टिन आहे. टीबी या विकाराशी लढण्यास ते सक्षम आहे. प्रतिजैविके अत्यंत वेगाने रोगांशी मुकाबला करण्यास सक्षम असतात. मात्र त्याचे दुरगामी व काही जलद गतीने होणारे साइड इफेक्टसही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखादा आजार वेगाने पसरत असल्यास सध्यातरी प्रतिजैविकांशिवाय अन्य पर्याय नाही. मात्र सातत्याने त्याचा वापर टाळणेच योग्य असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे.
वैज्ञानिकांचे काही निष्कर्ष
जास्त प्रतिजैविके घेणाऱ्या मुलांमध्ये स्थूलता वाढते, असे ऑगस्ट २०१२ एनवाय स्कूल ऑफ मेडिसिनने काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे. तुमचे इतर आैषधोपचार सुरू असतील तर डॉक्टरांना त्याची पूर्वकल्पना द्या. कारण प्रतिजैविके इतर आैषधांना रिअॅक्ट करतात. काही अँटिबायोटिक्स घेताना कोर्स सुरू असताना आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. काही केवळ जेवणानंतरच घ्यायचे असतात. तुम्ही टेट्रासायक्लीन्स नामक अँटिबायोटिक घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ घेऊ नयेत. दारू सेवन करत असताना जर मटोनिडाझोल नामक अँटिबायोटिक घेतले तर संसर्गाची रिअॅक्शन होऊ शकते. या प्रतिजैविकांचे सेवन डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांनुसारच झाले तर त्याचा परिणाम दिसून येतो.
अँटिबायोटिक्सचे साइड इफेक्ट
स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये झालेल्या संशोधनानुसार, घातक बॅक्टेरियामुळे शर्करा वाढण्याची शक्यता असते. तोंडात बुरशीजन्य संसर्ग किंवा पोटाचे विकारही संभवतात. याचे साइड इफेक्ट जाणण्यासाठी प्रतिजैविकांच्या अतिवापराच्या परिणामांची सूची दिली आहे. प्रतिजैविकांसमोर त्यांचा कोणत्या अवयवांवर परिणाम होतो त्या विषयी...
सल्फोनामाइड्स
मुतखडा होण्याची शक्यता असते.

ट्रायमिथोप्रिम
रक्तदोष वा रक्त दूषित होण्याची शक्यता.
टेट्रासायक्लीन्स
ऊन सहन करण्याची क्षमता घटते.

क्लिनडामायनसिन
ज्येष्ठांमध्ये कोलायटिसची शक्यता.

पेनिसिलीन्स
चेहरा, मुखामध्ये सूज, श्वसनाचा त्रास.

अॅरिथ्रोमायसिन आणि अमायनोग्लायकोसाइड्स
मूत्रपिंडावर दुष्परिणामाची शक्यता.