आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ वर्षांच्या तरुणीपासून ४४ वर्षांच्या महिलेपर्यंत पीसीओएसचा त्रास होऊ शकतो. दर महिलांपैकी एका महिलेस हा त्रास आढळतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) हा रोग बरा होत नाही; परंतु त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते किंवा यावर तात्पुरता इलाज केला जातो.

पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमला (पीसीओएस) या आधी स्टेन लेवेन्थल सिंड्रोम म्हटले जाते. ही हार्मोनल (संप्रेरकीय)असंतुलनाची समस्या आहे. याचा महिला आणि मुलींवर परिणाम झालेला दिसून येतो. याला सिंड्रोम यासाठी म्हटले जाते, कारण त्यामुळे रुग्णास काही समस्या निर्माण होतात. पीसीओएस १८ ते ४४ वर्षांच्या ५ ते १० टक्के महिलांमध्ये हा आजार दिसून येतो. या आजाराची व्याख्या नेहमी बदलत असते. या रोगाने किती महिलांना पछाडलेे आहे हे सांगता येत नाही; परंतु प्रत्येक १० पैकी एक महिलेत या आजाराची लक्षणे दिसून येतात. बहुतांश महिलांना हा आजार वयाच्या २० ते ४० वर्षे वयात जाणवतो. यात ११ वर्षांच्या मुलींना हा आजार होऊ शकतो. मग त्या मुलीस मासिक पाळी आलेली असो वा नसो; तिलासुद्धा हा आजार जडण्याची शक्यता असते. ज्या महिलांच्या नातेवाइकांना मधुमेह, पीसीओएस किंवा स्थूलपणाचा त्रास आहे त्यांना हा त्रास होऊ शकतो.

अनेक आजारांचा संकेत
काहीमध्ये वर दिलेल्या (बॉक्समध्ये) दोन स्थितींचे निदान होते आणि कधी यात ओव्हरीमध्ये गळूसुद्धा राहत नाहीत. यासाठी निदान आणि केसच्या दृष्टीने प्रत्येक रुग्णावर उपचार वेगवेगळे असतात. हा त्रास मासिक पाळी किंवा इन्फर्टिलिटीचा नसतो, परंतु प्रकृती गंभीर होऊ शकते. ही अनेक प्रकारच्या समस्यांची पूर्वलक्षणे मानली जातात. उदा. झोप न येणे, झोपेत श्वास कोंडणे, इन्सुलिनची समस्या, मेटॅबॉलिक सिंड्रोम हृदयरोग आणि टाइप - २ चा आजार किंवा उच्च रक्तदाब. कोणतेही रुग्ण अशा वेळी मूडी बनतात. अँड्रोमेट्रियल हायपरप्लेसिया आणि अँड्रोमेट्रियल कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. यामुळे पीडित रुग्णाचे वजन वाढू लागते आणि जेवणावर
नियंत्रण अाणि व्यायाम करूनसुद्धा शरीर जड वाटू लागते. जीवनशैली आणि निकृष्ट आहार सेवन ही कारणे असू शकतात. इन्सुलिन थांबणे आणि अँड्रोजन हार्मोनची वाढ झाल्याने वजन वाढू लागते. या कारणानेही हार्मोनल असंतुलन होते.

फिमेल हार्मोन
जेनेटिक आणि एन्व्हायर्नमेंटल पीसीओएसचा त्रास वाढवतात, यासंदर्भात डॉक्टर आणि रिसर्च करणाऱ्यांना माहिती असते, परंतु याचे प्रमुख कारण काय, हे अद्याप सांगता येत नाही. ओव्हरीज हार्मोन वाढवते, हे एक प्रकारचे रसायन असते. तेच शरीराच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवतात. एक हार्मोन जी ओव्हरी बनवते, ती म्हणजे इस्ट्रोजन. कधी कधी याला "फिमेल हार्मोन'सुद्धा म्हटले जाते. ही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त बनतात.

मेल हार्मोन
ओव्हरीमध्ये अँड्रोजनसुद्धा तयार होते. याला "मेल हार्मोन' म्हटले जाते. कारण महिलांच्या तुलनेत ते पुरुषांत अधिक तयार होतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये अँड्रोजन जास्त तयार होतात. तरी इस्ट्रोजन प्रमाणापेक्षा कमी होऊ लागतात. जास्त संख्येत अँड्रोजन असल्यामुळे मेंदूपासून येणाऱ्या संवेदनावर परिणाम होतो. त्यामुळे ओव्हेल्युशन होते. या कारणाने या आजारात ओव्हेल्युशन तितका होऊ शकत नाही. परिणामी, ओव्हरीमध्ये गळू
तयार होऊ लागतो. शरीरावर केसांची वाढ होणे, ही अन्य लक्षणे आहेत. इन्सुलिनमुळे पेशीमध्ये साखर वाढू लागते. जेव्हा पेशी इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नसतील, तर शरीरातील रक्तात साखर वाढू लागते. शरीरात यामुळे इन्सुलिनही वाढते. इन्सुलिन वाढल्यामुळे अँड्रोजेनचे उत्पादन वाढते. याकारणामुळे पीसीओएस होतो. इन्सुलिन वाढल्याने भूक लागते आणि जास्त आहाराच्या सेवनामुळे वजन वाढते.

रोग कधी बरा होत नाही
पॉलिसिस्टिक ओव्हेरियनमुळे आजार प्रत्यक्षात बरा होत नाही. यामुळे रुग्णास त्याच्या लक्षणानुसारच राहावे लागते. सर्वात प्रथम त्यांना जीवनशैली बदलणे आवश्यक ठरते. यामध्ये कमी कॅलरीचा आहार घेणे, परिश्रमाची कामे करून वजन घटवणे, आदी उपाय आहेत. वजन कमी केल्याने पीसीओएसची लक्षणे नियंत्रणात येतात. जर ६० किलो वजन असेल, तर ६ किलो वजन घटवल्यास खूप लक्षणे कमी दिसतात. याने ओव्हेल्युशन सुरू होऊ शकते. पुरळं कमी होतात. त्याचबरोबर मधुमेहाचा धोका टळतो.

हे आहेत उपचार
यात कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळी, इन्सुलिन सेन्सिटायजिंग एजंट, अँटी अँड्रोजन एजंटचा समावेश आहे. ज्यांना गर्भधारणा टाळायची आहे, अशा रुग्णांना हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह दीर्घकाळापर्यंत देणे गरजेचे आहे. तसे पाहता हा या रुग्ण महिलांसाठी प्राथमिक उपचार आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांत अॅस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिरॉन हार्मोन असतात. ते ओव्हरीमध्ये असाधारण हार्मोन्स रिस्पॉन्सला रोखतात. यामुळे अँड्रोजनचा स्तरही नियंत्रित करावा लागतो. हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांमध्ये अँड्रोजन कमी असतो, त्या अधिक प्रभावी सिद्ध होतात.
अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात :

ज्या महिलांना पीसीओएस आहे, त्यांच्यात दोन गोष्टी नेहमी दिसून येतात -

> त्यांच्यात ओव्हेल्युशन (एग प्रॉडक्शन) होत नाही. यामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो. कधी कधी होतही नाही. कधी उशिरा पाळी येते. याला ओलिगोमेनेरिया असे म्हटले जाते. ओलिगोमेनोरिया असल्यास काही काळानंतर फ्लो खूप कमी असतो किंवा थांबतो. अशा प्रकारच्या रुग्णांना हार्मोनल टॅब्लेट घेणे आवश्यक आहे. यात काहींना नंतर इन्फर्टिलिटीची तक्रार असू शकते. हार्मोनच्या स्वरूपात अँड्रोजन जास्त प्रमाणात असल्याने शरीरावर केस उगवणे, मुरूम येणे किंवा डोक्यावरील केस गळणे अशा तक्रारी असतात.
> दोन ओव्हरीमध्ये एकाहून अधिक गळू असल्याने याला पॉलिसिस्टिक असे म्हणतात. अल्ट्रासाउंड तपासणीत पॉलिसिस्टिक ओव्हरीजच्या तीन गोष्टी समोर येतात. एन्लार्ज ओव्हरीज, अनेक छोट्या छोट्या फॉलिकल्स (कूपसारखे आकार असलेले) आणि वाढलेल्या स्ट्रॉमल इकाजेनिसिटी असतात. अशा परिस्थितीत ओव्हरीज वाढतात. याचा आकार ६ एमएलपर्यंत वाढलेला असतो. तरीसुद्धा बायोकेमिकल आणि पॅथॉलॉजिकल डायग्नोसिसमध्ये ३० टक्के रुग्णांत ही लक्षणे नसतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये अनेक फॉलिकल्स असतात. या फॉलिकल्स अर्ध्या से.मी. इतक्या असतात. रुग्णाच्या प्रत्येक ओव्हरीमध्ये कमीत कमी ५ फॉलिकल्स असतात.
(एमडी, डीएनबी, एफएमआयएस, एंडोस्कोपिक सर्जन (स्त्रीरोग), बेलव्यूक, क्रिटिकेअर, सूर्य रक्षा हॉस्पिटल, मुंबई.)
बातम्या आणखी आहेत...