आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तीचे स्वरूप आणि साधनेचे पर्व अनुग्रह शक्ती आणि तिरोधान शक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्ञान परंपरेत लीला या शब्दाचा पहिला प्रयोग आगम या तांत्रिक साहित्यामध्ये झाला आहे. त्याची प्रस्तावना अशी आहे की, हे जग शक्तीचा संकोच आणि प्रसाराची लीला आहे, आगम तांत्रिक साहित्यामध्ये परब्रह्माच्या दोन शक्तींचा उल्लेख आहे.- एक त्यांची अनुग्रह शक्ती आणि दुसरी तिरोधान (नकारात्मक) शक्ती.
सृष्टीच्या जन्म आणि प्रसारातील अनुग्रहित (कृपा) शक्तीच्या लीला तर अचाट असतात. महाप्रलयात याचे तिरोधान (नकारात्मक रूप) शक्ती सक्रिय असतात हे आपण पाहतो, अनुभवतो. आगम तांत्रिक साहित्यातील प्रस्तावना अशी आहे की, शिवशक्तीची समरस होण्याची स्थिती भंग झाल्यानंतर अज्ञात कारणाने शक्तीला स्वातंत्र्याचा बोध होतो आहे. आणि ते शिवाच्या हृदययापाशी पृथक (वेगळे) होऊन बाहेर येऊन जाते. सृष्टीच्या या प्रकट आणि विस्ताराचे हे रूप सूक्ष्म सृष्टीचे असते. यात पंचतत्त्वांसह तीन गुणांनी युक्त आणि काल व क्षेत्राचे त्रित्वामधील विभाजित वेळ आणि क्षेत्राचा अभाव असतो. याला ज्ञान परंपरा परा प्रकृतीच्या रूपात आपण व्याख्यीत करतो.

अपरा प्रकृती, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश तत्त्व तथा सत्त्व, रज आणि तम गुणांची एक समष्टी होते आहे. ज्यात काल भूत, भविष्य आणि वर्तमान रूपात तथा लांब आकारमान (क्षेत्र लंबाई), रुंदी आणि खोलीच्या निकषात विकसित होत असते. यात प्राणमय सत्तेचा अकल्पनीय विस्तार आहे. जिथे जीवन लाखो योनी आणि विविध प्रजातींमध्ये विस्तारित होते. ज्यात प्रत्येक प्राणिमात्राचे सत्तेचे-जीवनाचे परिघ-वर्तुळ (उत्कर्षाचे) जीवनाचा कालखंड आणि परिसर यातच त्याचा जन्म आणि मृत्यूच्या साखळीने बांधले गेलेले आहे. सर्व जग सृष्टी, या अर्थाने शक्तीच्या विस्ताराचे कल्पनातीत जीवन रूप आहे. ज्यात अधिष्ठात्री स्वरूप मात्र भगवती पराम्बा (अंबा) हीच आहे.

आगम शास्त्राच्या दोन्ही रूपात अर्थात शैवागम आणि शाक्तागममध्ये शिव शक्ती आराधनेची विविध रूप, पद्धती आणि अनुष्ठान तथा तत्संबंधीच्या मंत्रांचा एक विशाल संसार रचला गेला आहे. शास्त्रात आणि लोकांमध्ये शक्तीच्या पूजा भक्तीचे जेवढी रूपे आज प्रचचलित आहेत ती तत्त्वत : आगम तांत्रिक साहित्याचे विविध विधींचीच रूपे आहेत.

शारदीय व चैत्र नवरात्रात अनुष्ठानपूर्वक त्यांच्या विग्रहाची स्थापना आणि पूजनाच्या परंपरेच्या आध्यात्मिक रूपाच्या सहच संपूर्ण भारतवर्षात ही एक महान, सांस्कृतिक उत्सव परंपरेच्या रूपात स्थापित झाली आहे. शक्तीच्या तत्त्वदर्शनापासून ते पौराणिक कथांच्या विस्तारापर्यंत आणि नवरात्रीच्या पूजन अनुष्ठानापासून ते एका सांस्कृतिक उत्सवापर्यंत भारतीय दर्शन, साधना आणि संस्कृती रचनेच्या विविधतेच्या रूपात शक्तीच्या रूपाने ज्ञान, साधना व उत्सवापर्यंतची एक दीर्घ यात्रा केलेली आहे. याला केवळ काळ क्रम आणि त्याच्या प्रभावाचे कारणच म्हणले पाहिजे. वर्तमानात शक्तीचे तात्त्विक रूप गौण होऊन गेले आणि यावर एका उत्सवधर्मी संस्कृतीचे रूप स्वार झालेले आहे. आगम तांत्रिक साहित्य संमत दहा महाविद्यांच्या रूपाची भक्ती आणि त्याच्या आनुष्ठानिक पावित्र्यात कमतरता भासत आहे.

सृष्टिव्यापी शक्तीच्या मातृस्वरूपाची धारणा आणि त्यातील तत्त्वरूपाचे आकलन न करता वा ते न समजून घेता फक्त उत्सवधार्मिकतेला काही अर्थ नाही वा त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. अस्तित्वाच्या पातळीवर स्वयं आपल्या शक्तींच्या समग्रता आणि चराचर अस्तित्वात व्याप्त शक्तीच्या विराट स्वरूपापर्यंत यास (शक्ती) समजून घेणे अत्यावश्यक आहे. स्वयं मनुष्याच्याजवळ काया(शरीर), मन आणि अंतर्गत असलेल्या शक्ती अमर्याद आहेत, कार्यरत आहेत. त्याला सीमाच नाहीत. त्या शक्तींच्या जागृती आणि ऊर्ध्वगमनाच्या प्रयत्नाशिवाय आपण ना की, अपरा प्रकृतीच्या शक्ती आणि न ही शुद्ध परा प्रकृतीच्या शक्तींच्या स्वरूप आणि कार्याच्या समग्रतेला समजू शकाल.

मात्र प्रत्येक स्थितीत आम्हाला आरंभ स्वत:पासूनच करावा लागेल. जर आम्ही एक मनुष्याच्या रूपात आपल्या शक्तींची ओळख आणि त्याचा विस्तार करणे जाणत नसाल तर जगत शक्तीचा आधार आणि अनुग्रहास कसे समजून घेणार.

शक्तीचा आधार निश्चित करणे वा निर्माण करणे शक्तीच्या आव्हान आणि अवतरणाच्या (कृती) पूर्व फार आवश्यक आहे. अन्यथा त्यात धोके फार आहेत. म्हणजे शक्तीचा गैरवापर वा नकारात्मक वापराचा धोका, असे म्हणता येईल.

आमचं सौभाग्य हे आहे की, आम्ही एका अशा आध्यात्मिक ज्ञान आणि साधना परंपरेच्या वारशात जन्मलो आहोत. जिथे ईश्वर आमच्यासाठी मातृरूपदेखील आहे. या विश्वात मातेचा अनुग्रह आणि कृपेला समजून घेण्यासाठी प्रत्येक मनुष्याकडे एक छोटा बिंदूस्वरूपातील का असेना एक वास्तव अनुभव आणि अनुभूती आहे. विराट मातृसत्तेप्रती समजण्यासाठी आपल्या शरणागतीसाठी हा आपला अनुभव एक द्वार होऊ शकते.
(मप्र आदिवासी आणि लोककला अकादमीचे माजी संचालक.)