आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात लोह जमा झाले तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांच्या शरीरातून मासिक पाळीच्या दरम्यान दररोज सरासरी एक मिलिग्रॅम लोह बाहेर पडते. साधारणत: वयस्क व्यक्तीचे अशा प्रकारे लोह क्षती झाले तर दररोज एक मिलिग्रॅम लोह शोषून घेतले जाते. यामुळेच शरीरात लोहाचे अतिरिक्त प्रमाण जमा होत नाही. जेव्हा शरीरातून मोठ्या प्रमाणात लोह कमी होते, तेव्हा लोहाचे शोषण्याचे प्रमाणही वाढते. परंतु ज्यांना हेमोक्रोमॅटोसिसचा त्रास असेल त्यांच्या आतड्यातून दररोज जास्त प्रमाणात लोह शोषून घेतले जाते.
हेमोक्रोमॅटोसिस म्हणजे काय?
हेमोक्रोमॅटोसिस आयर्न मेटाबॉलिज्मचा अानुवंशिक बदल आहे. हेमोक्रोमॅटोसिसमध्ये रुग्णाच्या शरीरातून लोह बाहेर निघण्याऐवजी जमा होऊ लागते. ज्या अवयवाच्या टिश्यूमध्ये लोह जमा होऊ लागते, त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये गडबड होऊ लागते. यामुळे अारोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात.

कारणे : हेमोक्रोमॅटोसिस अानुवंशिक रोग आहे. तो आईवडिलांच्या गुणसूत्रातून म्युटेशनद्वारे होतो. ते शरीरातील लोह नियंत्रित करण्याचे काम करतात.

लक्षणे आणि आरोग्य समस्या : लोहाचे प्रमाण सांधे, लिव्हर आणि टेस्टिकल व हृदयात जमा होते. याचा परिणाम अवयवावर जाणवतो. ज्या महिलांना अशा रोगांचा त्रास असेल त्यांच्या शरीरात लोह साचण्याचा संग्रह पुरुषांच्या तुलनेत हळूहळू होतो. कारण मासिक पाळी आणि स्तनपानाच्या वेळी त्यांच्या शरीरातून लोह जास्त प्रमाणात बाहेर पडते. यामुळे त्यांच्यात हेमोक्रोमॅटोसिसमुळे अवयवाच्या नुकसानीची लक्षणे पुरुषांच्या तुलनेत दहा वर्षे नंतर दिसून येतात. पुरुषांमध्ये यामुळे त्वचेचा रंग बदलतो. टेस्टिकलमध्ये लोह साचल्याने ते आकुंचित होतात. त्याने नपुंसकताही येऊ शकते.

अंडाशयात लोह साचल्यास इन्सुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे मधुमेह होऊ शकतो.

हृदयाच्या मांसपेशींमध्ये लोह जमा झाल्याने कार्डिओमायोपॅथी होऊ शकते. यामुळे हृदयक्रिया बंद पडण्याची शक्यता वाढते. लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयाचे ठोक अनियमित पडतात. याला अरदिमिया असे म्हणतात.

लिव्हरमध्ये लोह जमा झाल्यास लिव्हर सोरायसिस आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

फुप्फुसात लोह साचल्यास श्वास घेण्याचा त्रास जाणवतो. एंडोक्राइन ग्रंथीमध्ये लोह जमा झाल्यास हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.

प्रतिबंधात्मक उपचार : याला प्रतिबंध करण्यासाठी योग्य उपचार स्क्रीनिंग करणे हा आहे. एकदा एका व्यक्तीमध्ये हेमोक्रोमॅटोसिसची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यास रुग्णाच्या सर्व बहीण-भावांनी आणि नातेवाइकांनी स्क्रीनिंग करून घ्यावी. जर त्यांनाही हा रोग आढळला तर त्यावर त्वरित उपचार करून घ्यावा. हेमोक्रोमॅटोसिसचा सर्वात प्रभावी उपचार म्हणजे हाताच्या शिरेतून रक्त काढणे. अशा प्रकारे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. एक किंवा दोन आठवड्यांत रक्ताचे एक युनिट काढता येते. यामध्ये जवळपास २५० मिलिग्रॅम लोह असते. हळूहळू ही प्रक्रिया दाेन किंवा तीन महिन्यांत एकदा केली जाते. यात लोह जमा झाल्याने ज्या अवयवावर परिणाम झालेला असतो त्याची कार्यप्रणाली सुधारते. नियमितपणे रक्तदान करणे हेमोक्रोमॅटोसिसवर उपचार ठरते. एका अभ्यासात ही गोष्ट सिद्ध होते की, ज्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असेल त्यांनी नियमितपणे रक्तदान करावे. त्यांची इन्सुलिन आणि डायबेटिसची काळजी संपेल. ज्यांना अॅनिमिया किंवा हृदयाशी संबंधित गुंतागुंतीमुळे रक्त काढता येत नसेल तर त्यासाठी किलॅशन उपचार आहे. यात शरीरातील लोह काढण्यासााठी काही औषधे दिली जातात.
वस्तुस्थिती- काही अभ्यासांनुसार, टॅनिनयुक्त चहा प्यायल्याने शरीरात लोह साचण्याचे प्रमाण कमी होते, असे म्हणतात.
लेखक हे पीडियाट्रिक्स सल्लागार, इमेटोआँकॉलॉजी, इम्युनोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, नवी दिल्ली येथील आहेत.