आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा हाडांची झीज होते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा हाडांची झीज होऊ लागते आणि ती संपतात त्याला अव्हॅस्कुलर नॅक्रोसिस असे म्हणतात. हाडांची झीज आणि सांधे वेगळे हाेण्याने त्या भागात रक्तपुरवठा होत नाही. हा आजार कोणासही होऊ शकतो. परंतु ३० ते ६० वर्षे वयातील लोकांना असा त्रास जाणवू लागतो.
अॅव्हॅस्कुलर नॅक्रोसिस म्हणजे बोन टिश्यू हाडांच्या पेशी मरणे. या पेशींना पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचत नाही. याला ऑस्टियानॅक्रॉसिस असेही म्हटले जाते. ज्यांनी पूर्वीपासून स्टिरॉइडचा वापर केला आहे, दारू सेवन केली असेल त्यांना अशा आजाराचा धोका आहे.
लक्षणे: काहीलोकांना सुरुवातीला या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र थोडे जरी वजन उचलले तरी सांधे दुखू लागतात. शेवटी अवस्था इतकी बिकट होते की झोपून राहिल्यावरही सांधे दुखणे चालूच राहते. या आजारात दुखणे मध्यम किंवा खूप जास्त असते. ते हळूहळू वाढते. हिपला अव्हॅस्कुलर नॅक्रॉसिस झाल्यानंतर पिंडऱ्या, जांघ आणि नितंब दुखू लागतात. हिपशिवाय या आजारात खांदे, गुडघे, हात आणि पायांवर परिणाम होतो.
कारणे: सांधेकिंवा हाडामध्ये दुखणे, सांध्यात कसल्याही प्रकाराची जखम किंवा समस्या म्हणजे, सांधे निखळल्याने त्याजवळील रक्तवाहिन्यांना हानी पोहचू शकते.
रक्तवाहिन्यांतफॅट्स जमा होणे : काहीवेळा रक्तवाहिन्यांत फॅट्स जमा होऊ लागते. यामुळ वाहिन्या आकुंचित होऊ लागतात. यामुळे हाडांपर्यंत रक्त पाेहोचत नाही. याशिवाय काही अनभिज्ञ कारणांमुळेही आजार बळावतो.

रिस्कफॅक्टर : हाडाचीघनता वाढण्यासाठी दीर्घकाळापासून औषधी घेतल्याने केवळ कॅन्सर रुग्णांच्या जबड्यांना नॅक्रॉसिस होण्याचा धोका वाढतो. पॅन्क्रियाटिस, मधुमेह, गोचर्स डिसीज, एचआयव्ही/ एड्स, सिस्टिमॅटिक लुप्स अॅरिथमायटोसिस आणि सिकल सेल, सेल अॅनिमियासारखे आजार होण्यानेही अव्हॅस्कुलर नॅक्रोसिस होण्याचा धोका असतो. हाडातील चमक कमी होऊ लागते. अशा वेळी ऱ्हुमॅटोलॉजिस्ट किंवा आॅर्थोपेडिक सर्जनला दाखवावे.
तपासणी: सांध्याचीतपासणी केल्यानंतर डॉक्टर इमेजिंग टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या टेस्टमध्ये सांध्याचा एक्स-रे , एमआरआय सीटी स्कॅन केले जाते. सुरुवातीच्या काळात एक्स-रेचा रिपोर्ट सामान्य येतो. एमआरआय आणि सीटी स्कॅन हाडांची विस्तृत इमेज समोर आणतात. यामुळे डॉक्टरांना यात होणारे बदल समजतात.
मेडिकेशनथेरपी : अव्हॅस्कुलरनॅक्रोसिस सुरुवातीच्या काळात या लक्षणांना नाहीसे करण्यासाठी औषधे आणि थेरपीचे साह्य घ्यावे लागते. याअंतर्गत रुग्णांना दुखणे कमी करण्यासाठी रक्तवाहिन्यांतील अवरोध दूर करण्यासाठी औषधे दिली जातात. रुग्णांच्या हानी झालेल्या हाडांवर पडणारा भार दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय, हाडांना मजबुती आणण्यासाठी अलेंड्रॉनेट थेरपीचे साह्य घ्यावे लागते. एक प्रकारच्या बायस्फॉस्फोनेटची गोळी घ्यावी लागणार आहे. तर रुग्णांना या आजारापासून सुटका मिळू शकते. अलेंड्रॉनेटचा वापर ऑस्टिओपोरॉसिस उपचारासारखा केला जातो. यामुळे हाडांची झीज थांबते. या औषधांच्या सेवनाने काही आठवड्यांतच दुखण्यापासून आराम मिळतो. हे औषध सकाळी उपाशीपोटी एक किंवा दोन ग्लास पाण्यात घ्यावे लागते. या गोळीमुळे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांनाही आराम मिळतो. हे औषध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी नसेल तर उपयोगी पडत नाही. यासाठी तीन वर्षांपर्यंत कॅल्शियम आणि व्हिटामिट डीचे सप्लिमेंट घेत राहावे. या आजाराने खूप गंभीर स्वरूप धारण केल्यास शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया करताना हाडांच्या क्षतिग्रस्त भागाच्या जागी रुग्णांच्या शरीरातील अन्य ठिकाणाचे हाड लावण्यात येते.
(लेखक, पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल, मुंबई येथे ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमालॉजीचे प्रमुख आहेत.)