आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Kapil Tiwari Article On Two Patterns Of Life

गती, विस्ताराची दोन रूपके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीतेमध्ये कृष्णाने जगाच्या रचनेच्या "आधारा'स ऊर्ध्वमूळ "वृक्षा'च्या रूपकात व्यक्त केले होते. हा असा वृक्ष आहे की, ज्याचे मूळ वर आकाशाच्या दिशेने तर फांद्या आणि पाने खालच्या दिशेने आहेत. भगवंताकडून जीवनाची एक सुंदर आणि पूर्ण व्याख्या आणि त्याचे हे समग्र रूपक आहे.
माणसाकडून "वृक्ष' पृथ्वीच्या आधारासाठी वरती आकाशाकडे जातो आणि पसरतो. हे दृश्यमान जगताचे रूपक आहे, परंतु "दिव्यता' आणि "नश्वरता' दोन्ही दृष्टीने जीवनात पसरण्यास, विस्तारित होण्याचा अर्थात एका संपूर्ण रूपकासाठी "वृक्षा'लाच आपला आधार मानतात. "जीवन' आणि "जीवनाच्या अभिव्यक्ती' साठी दुसरा कोणता अभिप्राय त्याचा पर्याय होऊ शकत नाही.

जगात "जीवन रचने'चा आधार आहे "गती'. जीवनाचे परिवर्तन आणि निरंतरता त्याचा "स्वभाव' आणि यासाठी जगाचा एक महानियम आहे. येथे काहीच स्थिर आणि कायम असणार नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जीवनात "जीवनाच्या स्थापनेची' दीर्घ यात्रा करत "मृत्यू'चे त्यात विसर्जन करतो आहे. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट बदलणारी आणि नष्ट होण्याच्या नियतीशी बाध्य आहे. जीवनाचा ऋतू / परिवर्तनाचा हा एक महानियम आहे. याला "नदी'च्या प्रवाहाच्या अद्भुत रूपकात व्यक्त करण्यात आला आहे. क्षणभरही न थांबता अहिर्निश नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा प्रवास "समुद्रात विलीन' होण्यासाठी निरंतर चालू असतो.

भारतीय ज्ञान, संस्कृती आणि कला परंपरेत जीवनाच्या व्याख्येसाठी "वृक्ष' आणि "नदी'ला रूपक का म्हणावे? आणि अंकित केले गेले आहे, हे आपण सहजपणे समजू शकतो. भारतीय चेतनेच्या अर्थबोधात ते खोलवर रुजलेले आहे. नदीच्या किनाऱ्यावर घाटी संस्कृतीचे उत्थान पतनाची माणसाच्या आयुष्याची गाथा जशी आपण इतिहासात वाचतो, लिहितो किंवा स्मृतीमध्ये जपून ठेवतो, तशीच भारतात "ज्ञानाचे उन्मेष' आणि रचनेच्या प्रवासातही "सरस्वती' आणि "गंगे'च्या किनाऱ्यावर तप आणि साधनेपासून मिळवलेल्या ज्ञानाच्या एका परंपरेतही एक महान वारसा आणि त्याची स्मृती वसलेली आहे. जीवनात "ज्ञानाच्या अर्थबोधा'चा एक महान प्रवासही नदीच्या प्रवासासारखाच आहे.

जमिनीत अंकुरित होऊन ज्याप्रमाणे एका रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर होण्याच्या प्रवासात आकाशात वर जातो. त्याचप्रमाणे जीवनसुद्धा एका झाडाप्रमाणे मुळापासून फांद्या आणि पानात पसरत जाते. विस्तार ही त्याची "सृष्टी' आहे. हे झाले जीवनाचे मूलभूत गुण. दुसरी नश्वरतेच्या जगात देश-काल नियमांतर्गत निरंतर बदलणे आणि चालणे हा झाला त्याचा "स्वभाव.' जीवनाच्या या मूलभूत स्वभावालाच निरंतर प्रवाहमान नदीच्या रूपकात सांगण्यात आले आहे. ज्ञान परंपरेच्या "स्वभावा'स परिणामधर्म सांगतो की, हे त्यांच्या मुळाशी आहे. त्याचप्रमाणे काळाच्या मूळ स्वरुपात क्रमही आहे. याचा अर्थ बीजाप्रमाणे निसर्ग जीवनाच्या परिणामाशिवाय होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे क्रमाशिवाय काळ असू शकत नाही. क्रमाला एका क्षणाच्या रूपात म्हटले गेले आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. जो काळाचा आधार आहे. ज्ञानाच्या परंपरेत यासाठी तो नित्यक्षण आहे. तो कधीच खर्च होत नाही. परिणाम धर्मस्वभाव आणि त्याच्या प्राणमय जीवनात तो अकल्पनीय कालप्रवास किंवा जीवनाच्या इतिहासाची मूळ शक्ती आहे.

ज्ञान परंपरेच्या छायेत जी संस्कृती विकसित होते ते मनुष्य रचनेचे जीवन आहे. यात जीवन व्यवहारात ज्ञान स्वयं एक संस्कृती बनते. माणसाचे सृजन आणि जीवनाच्या अनुभवाचे प्रवासाचे सार आपल्या सोबत घेऊन परंपरा, रुपाकार आणि शैलीला चकित करणाऱ्या विविधतेत संस्कृती स्वयं निरंतर प्रवाहमान नदीच्या जीवन प्रवास आणि अनंत आकाशात पसरणाऱ्या जीवन वृक्षाची विशालतेसारखी आहे. केवळ जीवनासाठीही नव्हे होय, संस्कृतीच्या रचनेच्या प्रवासात भारताने नेहमी वृक्ष आणि नदीच्या रूपकातच स्वत:ला व्यक्त आणि पूर्ण केले आहे. बदलणे आणि नवाचार हेच त्याचे जीवन आहे. जीवनाच्या कल्पनीय विस्तारात स्वत:ला पसरवणे हाच निसर्ग आहे.
(लेखक मध्य प्रदेश आदिवासी आणि लोककला अकादमीचे माजी संचालक आहेत.)