आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्तीरोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत हत्तीरोगाचे पूर्णपणे उच्चाटन झालेले आहे. येथे फायलेरिअॅसिसचा शेवटचा रुग्ण १९२० मध्ये आढळला होती. विकसनशील देशात मात्र आजही तो आढळतो. भारतातील शहरी भागात अशी प्रकरणे कमी असली तरी मागास भागात या आजाराच्या खुणा आढळतात.

हत्तीरोगाला वैद्यकीय भाषेत लिम्फॅटिक फायलेरिअॅसिस असे म्हणतात. हा एक परजीवी आजार असून तो काळ्या माशा आणि डासाच्या रक्तात संक्रमित होतो. फायलेरियाचे बहुतांश आजार वॉवकेरिया नावाच्या परजीवीद्वारे होतात. विविध प्रकारचे आठ धाग्यासारखे निमॅटोडस(कृमी/किडे) असतात. ते फायलेरिअॅसिसला कारणीभूत ठरतात. फायलेरिअॅसिसला खालील प्रकारे वर्गीकृत केले जाते.

लिम्फॅटिक फायलेरिअॅसिस : यालासाधारणत: एलिफॅन्टॅसिसच्या नावाने ओळखले जाते. हा वेदनादायक आणि विकृती करणारा रोग आहे. हा लिम्फॅटिक सिस्टिमवर परिणाम करतो. यात लिम्फनोड्स (लसिकेत आढळून येणाऱ्या गाठी)चा समावेश आहे. गंभीर प्रकरणात अशा प्रकारचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये एलिफॅन्टॅसिस वाढतो. यामुळे शरीराचा काही भाग अधिक प्रमाणात सुजतो.

सबक्युटॅनिअस फिलॅरिअॅसिस : हात्वचेच्या आतील थरावर परिणाम करतो. याच्या संसर्गामुळे सबक्युटॅनियस पेशी मिळतात. याच्या सूक्ष्मजीवापासून हत्तीरोग होतो.

सेराऊसकॅव्हिटी फायलेरिअॅसिस : हापोटाच्या सेराऊस कॅव्हिटीवर परिणाम करतो. याचा संसर्ग पोटाच्या सॅरस कॅव्हिटीमध्ये होतो. याच्या सूक्ष्म जिवाणूमुळेसुद्धा हत्तीरोग होतो.
कारणे: हारोग धाग्यासारख्या निमॅटोड कृमीच्या तीन जातींपासून होतो. याला फिलॅरिई- वॉवकेरिया बॅनक्राॅफ्टी, ब्रुिगया मालाई आणि ब्रुगिया टिमॉरीच्या नावाने ओळखला जातो. ही कृमी मानवाच्या लिम्फॅटिक सिस्टिममध्ये घरटे तयार करतात. यामुळे इम्युन तंत्राने परिणाम होतो. कारण हा याचा प्रमुख भाग आहे.

फायलेरिया डासाद्वारे पसरतो. जेव्हा एक डास अळ्यांच्या संसर्गजन्य स्तरावर असतो आणि एखाद्या व्यक्तीचे रक्त शोषतो तेव्हा परजीवी त्या व्यक्तीच्या त्वचेवर जमा होतात. तेथून त्वचेत प्रवेश करतात. या अळ्या तेथून लिम्फॅटिक वाहिन्यांमध्ये जातात आणि ते १२ महिन्यांच्या काळात वयस्कर कृमीमध्ये विकसित होतात. यामुळे लिम्फॅटिक वाहिन्यांमध्ये पसरतात. ते वर्षानुवर्षे मानवाच्या शरीरात राहतात. तेथे त्यांची संख्या वाढते. ते त्वचेच्या खालील रक्तवाहिन्यांत पोहोचतात. जेव्हा एखादा डास याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चावतो तेव्हा ते शरीरात प्रवेश करतात. या प्रकारे संसर्गाचे हे चक्र स्थापित होते.

लक्षणे: या रोगाचा प्रारंभ झाल्यानंतर कोणतेही लक्षण दिसून येत नाही. यामुळे लोकांना असा आजार झाल्याचे माहितीच होत नाही. तसे या रोगाने ग्रस्त असलेल्या पीडित लोकांमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.

> इडेमा हा सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. यात त्वचा आणि त्याच्या खालील पेशी सुजून मोठ्या होतात.
> काही वेळा गुप्त अंगावर सूज येते. त्वचा खरखरीत होऊन हत्तीच्या त्वचेसारखी वाटू लागते. } खाज, त्वचेवर पुरळ आणि सांध्यात दुखणे किंवा अार्थरायटिस होणे.
> पोटदुखी, हे लक्षण मुख्यत्वे राऊस कॅव्हिटी फायलेरिअॅसिसमध्ये दिसून येते.
> लिम्फॅटिक फायलेरिअॅसिसमुळे ताप येऊ शकतो. किडनीला नुकसान पोहचते. लैंगिक आणि मनोवैज्ञानिक समस्याही येऊ शकतात.

उपचार: रक्ताच्यानमुन्यातून किंवा त्वचेचा नमुना घेऊन याची चाचणी करता येते. हत्तीरोग आयुष्यभर राहू शकतो. उपचार केले नाहीत तर ही परिस्थिती आणखी बिकट होते. तथापि याचा उपचार संसर्ग होताच सुरू व्हावा. परंतु त्वरित उपचार शक्य नाही. कारण प्राथमिक स्तरावर या रोगाचे निदान होत नाही. तरुण कृमी मारणे आणि परजीवीचे जीवनचक्र रोखण्यासाठी औषधी सेवन करावी लागते. तथापि, औषधे वयस्कर कृमींना मारू शकत नाहीत. यावर कोणतीही लस निघालेली नाही.

पोलिओनंतर फायलेरिऑसिस म्हणजे हत्तीरोगास अपंगत्वाचे दुसरे मोठे कारण मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने २०२० पर्यंत जगभरात याचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात आजही हा आजार दिसून येतो. याच्यासाठी कोणती लस उपलब्ध नाही, हा अडचणीचा भाग आहे.

जगभरातील ५८ देशांतील १.२८ अब्ज लोक लिम्फॅटिक हत्तीरोगाने पीडित आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली अाहे.
(लेखक: संचालक, आर्थोपेडिक विभाग, बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली.)
बातम्या आणखी आहेत...