आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Kapil Tiwari Editorial About New Year 2016 And Traditional, Divya Marathi

नववर्ष, काळावर "चर्चा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जीवन परंपरा आणि संस्कृतीमध्ये "काळ आणि काळाचे नावीन्य' या एेवजी "काळामध्ये जीवनाचा उत्सवधर्म आणि निर्मितीची' परंपरा आहे. जीवनाच्या नव्या पंखांना तिथीचा अाधार हवा आहे का? स्मृती आणि कल्पना याच शिल्लक उरतात. मग मानवी जीवन जगा किंवा पुन्हा विचार करा.

भारतीय संवत्सर बदलत असताना एखादी लोकजागृती किंवा त्याचा उत्सव साजरा करणे हा योगायोग तर नक्कीच नाही. जी मंडळी आपल्या देशातील शक आणि विक्रम संवतला एक भारतीय संवत परंपरा मानतात. त्यांनी भारतीय जीवन परंपरेत या तिथीला कसल्याही उत्सवाचे आयोजन केलेले नाही, या वस्तुस्थितीवर विचार केला पाहिजे.

एक जानेवारीस नवे वर्ष आरंभ झाल्यानंतर तो साजरा करण्याची पद्धत येथील ब्रिटिशांच्या काळापासूनच सुरुवात झाली. हळूहळू ती शहरी भागात एक नवे संवत्सराप्रमाणे साजरे होऊ लागले. हाच आता शहरी भारतीय जीवनाचा अर्थ बनला आहे. येशूच्या अवतारास अाधार मानून पश्चिमेकडे "इतिहासाचा काळ' दोन भागांत विभागला जातो. त्यात जीवनाची एक परंपरा जी येशूच्या आधी दुसरी त्यानंतरचा काळ आहे. इस पूर्व आणि इस नंतरचा काळ हाच पाश्चिमात्य इतिहासाच्या कालखंडात काळाला पाहण्याची दृष्टी आहे. यालाच अाधारभूत मानून इतिहासाची दृष्टी मागील दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास हाच अधिकृतपणे लिहिलेला प्रामाणिक, दस्तऐवज वैज्ञानिकदृष्ट्या विश्वसनीय मानते. या आधीचे मानवी जीवन आणि काळ साधारणत: ऐतिहासिक पुराव्यांच्या अभावामुळे किस्से, कपोलकल्पित कथा, मिथक आणि पौराणिक काळ बनला.

या दृष्टिकोनामुळे त्या जातीय परंपरा आणि संस्कृतीचे यथार्थ जीवन बोध तसेच रचना ठोस ऐतिहासिक पुराव्याच्या अभावामुळे एकप्रकारची कपोलकल्पित, पौराणिक आणि स्वैर अशी कल्पना मानली गेली. भारतासारख्या देशात येथील सांस्कृतिक परंपरा आणि जीवन खूप प्राचीन आहे. यालाच आधार मानून पौराणिकतेत आणि कथा गोष्टींमध्ये तसेच काही ऐतिहासिक, प्रामाणिक इतिहास उरला आहे.

भारत आणि एका अर्थाने कोणत्याही पौर्वात्य देशाने एखाद्या महान अवताराला अाधार मानून जगाच्या काळाला दोन भागांत विभाजित केले नाही. राम, कृष्ण, बुद्ध, महावीरसारख्या अवतार आणि महान संतांचे तसेच सिद्धपुरुषांच्या जन्माने किंवा अवताराने काळाचे विभाजन झाले नाही. भारतीय जीवन दृष्टी काळाला एक आणि अखंड मानते. ती आपल्या गतीमध्ये रेखांकित न होता वर्तुळ आहे. तसेच क्षण हा याचा अाधार आहे आणि क्रम याचे केंद्र. त्याची दृष्टी काही अशी आहे की, जी वेळ आणि काळाला नव्हे तर जीवनाच्या नवेपणाला स्थापन आणि खंडन करते. काळ नवाही नसतो किंवा जुनाही. काळ जीवनात नवा असतो. भूतकाळाच्या रूपात तो जुना जगण्याचा अर्थाने तो वर्तमान आणि आशेच्या स्वरुपात तो भवितव्य आहे.
भूतकाळाशी निगडित त्यातच वसलेली मानव चेतना जडलेली आणि अतितगामी किंवा पुनरुत्थानवादी असते. एका अर्थाने यात काळ नव्हे तर माणूसच व्यतीत होत असतो. वेळ तर गेली याची दुसरी बाजू पण आहे. ती भविष्यकाळाची आहे. तो अद्याप आलेला नाही, परंतु ज्यांच्या वर्तमान आणि त्याचे जीवन घालवले जाते. वर्तमानाचा एक भाग भूतकाळाच्या स्मृतीसाठी आणि एक भाग भविष्याच्या अाशा आणि तयारीमध्ये जातो. मात्र जीवन आपल्यासाठी "जीवनाचा एक वर्तमान' मागते. तो हाच आणि आताचा क्षण आहे,
वर्तमानात जगणे एका अर्थाने जीवन कला आहे. भूतकाळाच्या स्मृती आणि भविष्याच्या आशंकापासून मुक्त अशी चेतनाच वर्तमान जगू शकते. काळाचे नवेपण फक्त येथे असते. भारताची इतिहास चेतना काळाचे लेखन नव्हे तर काळामध्ये जीवनाचे सार असल्याने आणि त्यालाच वास्तव इतिहास मानण्याची प्रथा आहे. याला कधी इतिहासाप्रमाणे लिहिता येणार नाही. ते फक्त जीवनाचे आख्यान असू शकते. जर जीवनाचे शिक्षण आणि जगलेल्या जीवनाच्या साराचे काही मूल्य असेल तर ते इतिहासाहून अधिक मौल्यवान आहे. सुदीर्घ काळात मनुष्य जीवनाच्या साराचा हा दृष्टिकोन आपली खरी "समय चेतना' असू शकतो.

(मध्य प्रदेश आदिवासी आणि लोककला अकादमीचे माजी संचालक)