आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Kapil Tiwari Article On Information And Knowledge

ज्ञान आणि माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञान आणि माहितीमध्ये खूप मोठे अंतर आहे. जो शिकलासवरलेला नाही, त्यालाही ज्ञानी म्हटले जाते. मीरा आणि कबीर यांची उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे, माहिती मिळवण्यासाठी तरी अक्षराची जाण तर असावीच लागते. माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट होणाऱ्या काळात असे सांगितले जाते आहे.
शब्दांचेही एक विश्व असते. त्यांचाही प्रवास असतो. कधी माणसाला अर्थबोध होण्यासाठी प्रकाशाप्रमाणे चमकणारे काही शब्द प्रदीर्घ जीवन प्रवासात जसे थकतात आणि त्याचे अर्थ विझलेल्या ताऱ्याप्रमाणे निखळून पडून हरवून जातात. नव्या जीवनाच्या अाशेने पुन्हा अर्थाच्या प्रकाशात उजळण्यासाठी ते गुपचूप प्रतीक्षा करत असतात.

माहिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराच्या युगात माहितीने ज्ञानाची जागा घेतली आहे. विज्ञान, शिक्षण, शोध, उद्योग आणि व्यवसाय- मनोरंजनाबरोबरच कला आणि बौद्धिक चर्चेतही माहिती-प्रसारण आणि संदर्भाच्या स्वरूपात प्रयोगात आणले जात आहेत. आपल्या काळातील वैशिष्ट्यांना "एक नाव' देणारे लोक याला "प्रसारण क्रांती' किंवा "ज्ञानाचा विस्फोटा'चा काळ असे म्हणत आहेत. ते योग्य सांगत असतील. कारण "ज्ञानाचा विस्फोट' आपल्या परंपरेत कधी दिसला नव्हता. आता "याहू डॉट कॉम' आणि "गुगल'पासून "दीक्षा' घेऊन एक आधुनिक जग आपल्यासमोर आहे. त्यांनी कोट्यवधी माहितीचे भांडार असलेल्या ज्ञानाला "विस्थापित'केले आहे. अथवा ते स्वयं एक "ज्ञाना'चा पर्याय बनले आहे.

ज्याप्रमाणे शासन विकासासाठी विस्थापितांचे पुनर्वसन करते. त्याचप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाची "माहितीची सत्ता'आपल्या परंपरेच्या ज्ञात ज्ञानाचे थोडेबहुत का होईना पुनर्वसन करते की नाही. तरीही ती एखाद्या ओसाड-अनोळखी जागेवरसुद्धा नवे जीवन आरंभ करण्यास तयार आहे. ज्ञानामुळे कोणाला उपजीविका मिळत नाही. यामुळे शिक्षणाच्या जगात त्याला काही स्थान उरले नाही. माहितीप्रमाणेच त्याचे तंत्र बनवता येत नाही. यामुळे त्याच्यासाठी आधुनिकतेचे दार बंद आहे. जर धावपळीच्या जगाचे काम माहिती आणि त्याच्या तंत्रज्ञानाने चालू शकते तर ज्ञानाची गरजच कोणाला आहे? त्याने तर काही दशकातच जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. माणूस तत्त्वत: बदलत नाही. जग बदलते. आपल्याला न बदलताच जग बदलते हे किती सुविधाजनक आहे!

ज्ञान "आपल्याला बदलण्याचे' आव्हान आहे. ते आपले अंतस्थ, आपली चेतना, विचार, जीवनाचे रंग-ढंग, श्रद्धा, सर्व बदलते. हाच खरा बदल आहे. याचे भय वाटते. शास्त्राच्या जगात, ज्ञानाची परंपरा झाली. साधनेचे अनुभव आणि अनुभूतीने लोकांना ज्ञान मिळणे शक्य झाले. जीवनाच्या पाठशाळेत जीवनाचा अभ्यास हेच ज्ञान आहे. जेथे माणूस स्वत: बदलतो व त्याचे जगही बदलते. ज्ञानानेच असे आश्वस्त केलेले आहे की, ते म्हणजे विद्वत्ता आणि पांडित्य नव्हे. किंवा कूळ, गोत्र, जात धर्म आणि औपचारिक शिक्षणासाठी लाचार नाही. ते तर कबीरासारख्या व्यक्तीमध्ये असू शकते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. मीरासारख्या महिलेस असू शकले असते. ती शास्त्र, परंपरेतून आलेली नव्हती. ते "सत्या'चे अनुभव आणि "प्रेमा'च्या सखोलतेचे जग आहे. ज्यामध्ये आमच्या प्रामाणिक आणि समग्र रूपात सामील होण्याची गरज आहे. "शिक्षण' आणि "विद्वते'ची नव्हे. तेथे अशा कोणत्याही प्रतिभेला प्रवेश नाही, जे सत्याचे अनुकरण करत नाही. सत्य निष्ठारहित प्रतिभा जीवन आहे. त्याच्या यथार्थ संबंधात अर्धसत्यानेही भागते. ते खोट्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे. अशा प्रतिभाशाली लाभासाठी बुद्धी, प्रतिभेची चाणाक्ष मंडळी गुंतवणूक करतात. ते जेथेही असतात तेथे स्वत: एक "सत्ता' होतात.

ज्ञान सच्चा माणसाची मागणी करत असते. जो सत्यासाठी मृत्यूलाही जवळ करतो. ज्ञानाच्या परंपरेत अशा साहसवीरांनी निर्मिती केली आहे. ते धूर्ताचे नव्हे, धाडसी लोकांचे जग आहे. तो बदलण्यासाठी सर्वप्रथम स्वत:ला सादर करतो. तेव्हा तो दुसऱ्यासही बदलण्याचा आग्रह करतो. परंतु ते नष्ट केले जाऊ शकत नाहीत.
लेखक मध्य प्रदेश आदिवासी आणि लोककला अकादमीचे सदस्य आहेत.