आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅग्लेरिया : मेंदूतील अमीबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅग्लेरिया इन्फेक्शन एक दुर्मिळ संक्रमण आहे. यामुळे मेंदूत जीवघेणा आजार होऊ शकतो. हे संक्रमण एक प्रकारच्या सूक्ष्मजीव अमीबामुळे (प्रोटोझुआची प्रजाती) होते. हा अमीबा उष्ण ताज्या पाण्याचे स्रोत असलेले झरे, नदी, उष्ण झरे इत्यादींत आढळून येतो. याशिवाय हा सूक्ष्मजीव चिखल, दगडाच्या भेगा, अस्वच्छ जलतरण तलाव आणि स्पा, अस्वच्छ विहिरी, खराब नाले, पॉवर प्लँटमधून निघालेले घाण पाणी, अॅक्वेरियम, माती, घरातील धूळ इत्यादींमध्येही आढळून येतो. अमीबाच्या अनेक प्रजातींपैकी एक प्रजाती, नॅग्लेरिया फावलॅरी याची माणसाला लागण होते. साधारणपणे हा आजार उन्हाळ्यात होतो. जगात लाखो लोकांना नॅग्लेरियाची लागण होते. मुले आणि तरुण याचे बळी ठरतात. हा सूक्ष्मजीव खाऱ्या पाण्यात नसतो. यासाठी स्वच्छ जलतरण तलावात पाेहणे कधीही चांगले.
नॅग्लेरिया म्हणजे काय? : नॅग्लेरिया एक प्रकारचे संक्रमण असून ते नॅग्लेरिया फॉवलॅरी नावाचा अमीबा निर्माण करतो. हा अमीबा नाकावाटे मेंदूत पोहोचतो. प्रायमरी अमीबिक मॅनिंगोसेफॅलायटिस नावाचा आजार मेंदूला होतो. हा आजार झाल्यानंतर मेंदूत सूज येते. त्याच्या पेशींना हानी पोहोचवते. हा आजार मेंदूची गंभीर हानी करू शकतो. याची लागण झाल्यानंतर एका आठवड्याच्या आतच रुग्णाचा मृत्यू ओढवतो. यावरून हा रोग किती घातक ठरू शकतो, याचा अंदाज येईल.
लक्षणे : याची लागण झाल्यानंतर दोन ते १५ दिवसांच्या आतच याची लक्षणे दिसून येऊ लागतात. लागण झाल्यानंतर श्वास घेणे किंवा चव घेण्याच्या क्षमतेत बदल होणे, ताप येणे, अचानक खूप डोके दुखू लागणे, मान आखडणे, उजेड किंवा प्रखर प्रकाश सहन न होणे, मळमळ होऊन उलटी येणे, भूक न लागणे, द्विधा अवस्था असणे, चकरा येणे, ग्लानी येणे, झटके येणे, स्मृतिभ्रंश होणे आदी लक्षणे रुग्णात दिसून येतात. गंभीर अवस्था झाल्यास रुग्ण कोमातही जातो. लक्षणांत वेगाने वाढ होते. यासाठी ताप किंवा डोकेदुखी अशी दुसरी लक्षणे दिसून येऊ लागतात. अशी लक्षणे दिसून येण्यापूर्वी तुम्ही उष्ण किंवा ताज्या पाण्यातून पोहून आला असाल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क करा.
तपासणी : इमेजिंग टेस्ट- या तपासणीत सीटी स्कॅन आणि एमआरआय करतात. चाचणीद्वारे मेंदूत आलेली सूज आणि तेथे होणारा रक्तस्राव याबाबत माहिती घेता येते.
सीटी स्कॅन - यात वेगवेगळ्या कोनांतून मेंदूचा एक्स -रे काढला जातो. त्यायोगे योग्य अवस्थेची माहिती मिळते.
एमआरआय - रेडिओ वेव्हज आणि स्ट्राँग मॅग्नेटिक फील्डद्वारे एमआरआय मशीन मेंदूच्या पेशीची विस्तृत अशी चित्रे घेते आणि मेंदूत झालेल्या नुकसानीची माहिती देते.
स्पायनल टॅप - रुग्णाच्या कण्यातील खालच्या दोन हाडांत म्हणजे लंबर व्हर्टिबामध्ये सुई टाकून स्पायनल फ्लूड काढले जाते. त्यानंतर या फ्लूडची मायक्रोस्कोपद्वारे तपासणी केली जाते. या तपासणीत रुग्णाची स्पायनल कॉर्ड आणि मेंदूच्या आजूबाजूच्या फ्लूडच्या स्थितीची माहिती घेतली जाते. स्पायनल टॅपद्वारे सेरेब्रल स्पायनल फ्लूड प्रेशरची मोजणी केली जाते. सूज असलेल्या पेशीची माहिती घेतली जाते.
उपचार : या आजारात सुरुवातीच्या काळात आजाराचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे खूप महत्त्वाचे असते. या दरम्यान उपचार केल्यानंतर रुग्ण बरा होतो. या आजारात उपचारादरम्यान सर्वप्रथम अँटिफंगल ड्रग अँफॉटेरिसिन बी दिले जाते. शरीरातील अमीबा मारण्यासाठी हे औषध रुग्णाच्या नसेतून किंवा स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला सुईद्वारे टाकले जाते. रुग्णांची अवस्था गंभीर बनल्यास रुग्णाला मायलॅफॉसिन नावाचे औषध दिले जाते. या औषधाबराेबरच दुसरे औषध दिले जाते. तसेच मेंदूवरील सूज कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
डॉ. जयदीप बन्सल
न्यूरॉलॉजी, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली