आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी दुष्काळाचा इतर देशांनाही फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत दुष्काळाचे सावट आणखी गडद होत आहे. महाद्वीपावरील 39 टक्के जमीन दुष्काळाच्या छायेत आहे. 1956 नंतर प्रथमच इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इलिनॉयस आणि इंडियानात मक्याची 45 टक्के पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
2012 मध्ये सर्वाधिक उष्णता असल्याने हा विक्रमच होत आहे. वातावरणातील हे बदल कायम राहिले तर लवकरच अमेरिकेतील अन्न-धान्याच्या किमती गगनाला भिडतील. गरीब देशांमध्ये परिस्थिती याहून हलाखीची होईल. जगभरात अन्नधान्याचे दर 2004 पासून सातत्याने वाढत आहेत. 2007, 2010 मध्ये अन्नधान्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेकडील अनेक देशांमध्ये दंगल उसळली होती. अरब देशांमध्ये क्रांतीची ठिणगी पडण्यामागे अन्नधान्याच्या वाढत्या दराची मुख्य भूमिका होती. दुष्काळी परिस्थितीमुळे मक्याची कणसे आणि सोयाबीनचा पुरवठा कमी झाला आहे. आता परिस्थिती आणखी बिघडू शकते.
दुष्काळाचा पहिला फटका शेतक-याला बसतो. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. चीनसह अनेक देशांमध्ये धान्याची निर्यात वाढल्याने अमेरिकी शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षात अमेरिकी कृषी उत्पन्नाने 5,39,000 कोटींची विक्रमी पातळी गाठली होती. पीक विम्यामुळे शेतक-यांना संपूर्ण नुकसानभरपाई मिळेल. चालू वर्षात 85 टक्के पेरण्यांखालील क्षेत्र विम्यांतर्गत आले.
मक्याचे पीक घेतलेले शेतकरी यातून बचावतील; परंतु पशुपालन करणा-यांना आपल्या जनावरांना पोसण्यासाठी मोठी रक्कम मोजून मका विकत घ्यावा लागणार आहे. काही जणांनी तर आतापासूनच आपले पशू विकण्यास सुरुवात केली आहे. मका हाच अमेरिकी फूड पिरॅमिडचा महत्त्वाचा आधार आहे. यामुळे हॅम्बर्गरप्रमाणे अनेक वस्तू महागतील आणि याच दुष्काळाचा मोठा फटका डळमळीत झालेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेवरही पडेल.
महागाईच्या आगीत होरपळतोय इस्रायल - पंतप्रधान नेतेन्याहू
अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक देशांमध्ये असंतोष वाढत आहे. इस्रायलमध्ये श्रीमंत-गरिबांमधील दरी रुंदावत आहे. महागाई आणि सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती बिघडत असल्याने या विरोधात अनेकांनी आत्महत्या केली आहे. मागील आठवड्यात तेलअवीवमध्ये 57 वर्षीय मोशे सिलमॅनने पेटवून घेत आत्महत्या केली. यानंतर व्हीलचेअरवरच एका अपंग व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. मागील वर्षात वाढत्या असमानतेमुळे तेलअवीवमध्ये चार लाख जणांनी निदर्शने केली होती. आर्थिक सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांच्यावर यामुळे दबाव वाढला आहे.