आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-टुरिस्ट व्हिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. शर्मिष्ठा शर्मा - Divya Marathi
डॉ. शर्मिष्ठा शर्मा
व्हिजिटर्स इंटरनॅशनल स्टे अॅडमिशन, असा व्हिसा या शब्दाचा अर्थ आहे. हा लॅटिन शब्द चार्टा व्हिसापासून तयार झाला. याचा अर्थ कोणाही व्यक्तीला एखाद्या देशात फिरण्यासाठी कायदेशीर अनुमती असते, ज्याची कागदपत्रे पाहणे जरुरी आहे. व्हिसा मर्यादित कालावधीसाठी असतो अाणि तो पासपोर्टवर दिला जातो. प्रत्येक देशाचे वेगवेगळे व्हिसा कायदे असतात. भारत सरकारने नुकतेच व्हिसाच्या नियमात अनेक बदल केले आहेत. यात ई-टुरिस्ट व्हिसाचा समावेश आहे. याला व्हिसा ऑन अरायव्हल असे म्हटले जाते. ही संकल्पना कशा प्रकारे काम करते हे समजून घेऊया-
हिमांशी भांबरी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गेल्या दहा वर्षांपासून ती जपानमध्ये असते. तिची ओशिन नावाची एक मैत्रीण आहे. ओशिनला भारतभ्रमण करायचे आहे. दोघींनाही वाटते, दिवाळीत एक आठवड्यासाठी भारतात यावे. ई-टुरिस्ट व्हिसांतर्गत अोशिन भारतीय व्हिसासाठी जपानहून अर्ज करेल. यासाठी तिला भारतीय कमिशनला येण्याची गरज नाही. त्याचबरोबर व्हिसासाठीची फी ती ऑनलाइन भरू शकते. एकदा स्वीकृती मिळाली की, अोशिनला भारत यात्रा करण्यासाठी ई-मेलवर उत्तर येईल. याच्या प्रिंटआऊटवर ती भारतात येऊ शकते. भारतात आल्यानंतर तिला ही कागदपत्रे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना दाखवावी लागतील. या दस्तऐवजास त्यांनी मंजुरी दिल्यानंतर भारतात फिरण्याची परवानगी देईल. व्हिसा आॅन अरायव्हल एक महिन्यासाठी वैध असतो. यात एका दस्तऐवजावर एकालाच येण्याची परवानगी असते. याचा कालावधी वाढवता येणार नाही.
ई-टुरिस्ट व्हिसा
सरकारने ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ हे नाव बदलून ‘ई-टुरिस्ट व्हिसा’ असे केले आहे. व्हिसा ऑन अरायव्हल नावामुळे पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे अनेक पर्यटक भारतात येऊन परत गेले होते. ई-टुरिस्ट व्हिसा आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देण्यात येतो. पर्यटन, एखादा मित्र वा नातेवाइकांना भेटण्यासाठी, अल्पावधीत वैद्यकीय उपचार वा एखाद्या व्यावसायिक दौऱ्यासाठी येण्याची परवानगी मागणाऱ्यांना भारतात हा व्हिसा देण्यात येतो. पासपाेर्टचा कालावधी भारतात येण्याच्या दिवसापासून सहा महिने असतो. पासपोर्टवर इमिग्रेशन अधिकाऱ्याद्वारे मारण्यात येणाऱ्या ठप्प्यांसाठी दोन कागद वेगळे हवेत. आंतरराष्ट्रीय पर्यटकाजवळ परतीचे वा पुढील प्रवासाचे तिकीट असणे गरजेचे आहे. ई-व्हिसाची सुविधा असलेल्या १५० देशांत पाकिस्तानचा समावेश नाही. पर्यटकाजवळ पाकिस्तानी पासपोर्ट असेल आणि तो मूळ पाकिस्तानी नागरिक असल्यास त्याला भारतीय कमिशनमध्ये नियमित व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. इमिग्रेशन विभागाने देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, कोची, तिरूअनंतपुरम आणि गोवा या ९ विमानतळांवरील ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

व्हिसाचे प्रकार
पर्यटकांसाठी अनेक प्रकारचे व्हिसा उपलब्ध आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.
१. टुरिस्ट व्हिसा : भारतात फिरायला येणाऱ्यांसाठी टुरिस्ट व्हिसा देण्यात येतो. या व्हिसावर कोणीही व्यक्ती भारतात सहा महिने राहू शकते. व्हिसाचा कालावधी संपत असल्यास आणि पर्यटकाला मुक्काम वाढवायचा असेल तर कालावधी संपण्याच्या महिनाभर आधी तिला पुन्हा नवा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे ४५ दिवसांत तिला मंजुरी मिळू शकते.

२. नोकरीसाठी व्हिसा : हा व्हिसा परदेशी नागरिकांना दिला जातो. ज्या लोकांना भारतात एखाद्या नोंदणीकृत संस्थेसाठी किंवा संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे किंवा स्वैच्छेने सेवा किंवा इंटर्नशिपसाठी येऊ इच्छितात त्यांना हा व्हिसा देण्यात येतो. हा व्हिसा एका वर्षासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टच्या अवधीपुरता देण्यात येतो. अशा प्रकारचा व्हिसा घेण्यासाठी रोजगाराचा पुरावा भारतात काम करणाऱ्या कंपनीकडून घेण्यात येतो. यात प्रामुख्याने अटी देण्यात आलेल्या असतात. एखाद्या कर्मचाऱ्यास वर्षाला २५ हजार डॉलर वेतन देण्यात येत असेल तर त्याला या अटी नमूद करणे अनिवार्य असते. हे नियम खानसामा, भाषांतरकार, इतर भाषाविषयक शिक्षक किंवा परदेशातील उच्चायुक्त अथवा दूतावासातील लोकांसाठी शिथिल आहेत.
३. स्टुडंट व्हिसा : अशा प्रकारचा व्हिसा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत अभ्यास करणाऱ्यांना देण्यात येतो.
४. बिझनेस व्हिसा : भारतात व्यवसाय करणाऱ्यांना हा व्हिसा देण्यात येतो. हा वेतनापेक्षा वेगळा असतो. कारण, या व्हिसासाठी अर्ज करणारे एखाद्या संस्थेसाठी काम करून पैसे कमावत नसतात. ज्या लोकांना अशा प्रकारचा व्हिसा हवा असतो, त्यांना ज्यांच्यासाठी हा व्यवसाय करत आहेत त्यांचे पत्र दाखवावे लागते. त्याचबरोबर भारतात कोणत्या ठिकाणी व्यवसाय करू इच्छितात, त्याचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. येथे राहिल्यानंतर खर्च कसा भागवणार याचा उल्लेख करणेही आवश्यक आहे. हा व्हिसा ६ महिन्यांपर्यंत वैध असतो. भारतात येऊन ज्यांना संयुक्त व्यापार करावयाचा आहे त्यांच्यासाठी १० वर्षांपर्यंत व्हिसा देण्यात येऊ शकतो.
५ कॉन्फरन्स व्हिसा : भारतात कॉन्फरन्स इत्यादीमध्ये सहभाग नोंदवण्यास आलेल्यांना हा व्हिसा देण्यात येतो. सरकारने एखाद्या संमेलनाचे आयोजन केले असेल तर हा व्हिसा देण्यात येतो. एखादी खासगी परिषद असल्यास बिझनेस व्हिसाची गरज लागते.
६. जर्नलिस्ट व्हिसा : हा व्हिसा पत्रकारांना देण्यात येतो. भारतातून वार्तांकन, फोटोशूट किंवा माहितीपट बनवणाऱ्यांसाठी तीन महिन्यांचा व्हिसा देण्यात येतो.
७. रिसर्च व्हिसा : संशोधक किंवा प्राध्यापकांना हा व्हिसा दिला जातो. याची प्रक्रिया दीर्घ असते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे अर्ज करावा लागतो. तेथून मंजुरीस ३ महिनेही लागू शकतात.
८. मेडिकल व्हिसा : भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिसा देण्यात येतो. विशिष्ट प्रकारचे आजार, उदा. अवयव प्रत्यारोपण, न्यूरोसर्जरी, सांधे बदलणे किंवा प्लास्टिक सर्जरीसाठी व्हिसा देण्यात येतो.
९. ट्रांझिट व्हिसा : भारतात ज्यांना ७२ तासांपेक्षा जास्त थांबायचे नसेल त्यांना हा व्हिसा देण्यात येतो, अन्यथा टुरिस्ट व्हिसा आवश्यक आहे. यात एअरलाइनचे कन्फर्म तिकीट आणि पुढील प्रवासाचा तपशील द्यावा लागतो.
१०. एक्स(एन्ट्री) व्हिसा : एक्स व्हिसा वरील कोणत्याही वर्गात न मोडणाऱ्यासाठी दिला जातो. यात स्वयंसेवक येतात. तरीही २०१० नंतर एक्स व्हिसा खालील लाेकांनाच देतात.
भारतीय मूळ असलेले परदेशी नागरिक
एखादे मूळ भारतीय किंवा भारतीय नागरिकांची परदेशात राहणारी पत्नी किंवा मुले.
जो परदेशी नागरिक भारतात येतो आहे किंवा नोकरी किंवा व्यवसायानिमित्ताने त्याला दीर्घ कालावधीचा व्हिसा देण्यात आलेला आहे, तर त्याची पत्नी आणि मुलेसुद्धा या वर्गात येतात. यासाठी जे भारतीय आपल्या देशात परत येऊ इच्छितात त्यांना अशा व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. तथापि एक्स व्हिसावर येथे नोकरी करता येत नाही. याचा कालावधी वाढवता मात्र येतो.
डॉ. शर्मिष्ठा शर्मा
सहयोगी प्राध्यापक,
इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन इन टेक. अँड मॅनेजमेंट, नवी दिल्ली.
बातम्या आणखी आहेत...