आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पात ठोस धोरण दिसत नाही, वाचा तज्‍ज्ञ काय म्‍हणतात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. गिरधर पाटील - Divya Marathi
डॉ. गिरधर पाटील
राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच उद्याेग, शेती अाणि कर या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण इथे देत अाहाेत.
सत्ताधाऱ्यांना ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्नच समजले नाहीत
अर्थसंकल्प म्हटला म्हणजे राज्यातील एकंदरीत अर्थव्यवस्थेला, शेती व उद्याेगाला एक निश्चित िदशा देणारे धाेरण त्यातून स्पष्ट हाेणे अपेक्षित असते. परंतु अाजकालचे अर्थसंकल्प हे िनवडणुकीच्या जाहीरनाम्याप्रमाणे केवळ काही घटकांना मदती जाहीर करण्यासाठीचे अाहेत की काय, असा प्रश्न पडताे. महसुली तूट कमी न करता राहिलेल्या शिलकीतून राज्यावरील कर्जाचे व्याज भरता भरता जनसामान्यांसाठी काय देऊ शकताे? अशा मानसिकतेतून हा अर्थसंकल्प अाला अाहे. सर्वांना खुश करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सवलती एकत्र करून माेठी मदत केल्याचा अाव अाणला असला तरी शेतीच्या गंभीर प्रश्नांना सरळ सरळ हात घालू शकेल अशा ठाेस परिणामकारक काेणत्याच याेजना, धाेरणे या अर्थसंकल्पात िदसून येत नाहीत. २५ हजार काेटी शेतीसाठी िदल्याचे अर्थमंत्र्यांनी जरी म्हटले असले तरी शेतीच्या गंभीर प्रश्नांना भिडणाऱ्या काेणत्याच ठाेस याेजना यात नाहीत. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत येणाऱ्या याेजना एकत्र करून ही तरतूद करण्यात अालेली अाहे. या सरकारचे शेतीबद्दलचे अाकलन केवळ सिंचन, पाणी यांच्याभाेवतीच घुटमळत असल्याचे िदसते अाहे. शेतमालाचे बाजारात जाऊन मूल्यवर्धन हाेते, त्याची किंमत ठरते, नफ्याचा भाग ठरताे, त्याचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात नाही. शेतमाल बाजारात अावश्यक सुधार, साठवणूक, वाहतूक, िवतरण व्यवस्था िकंवा अायात-निर्यात याबाबतचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात नाही. अाज सगळीकडे जाे शेतकरी अात्महत्येच्या पातळीवर अालेला अाहे, त्याला राेखता येऊ शकेल व त्याला तत्काळ साहाय्यभूत ठरतील अशा काेणत्याच तरतुदी, याेजना यात नाहीत. केंद्रीय बजेटची छाप यात नाही. कर्जबाजारी सरकार व शिल्लक अाहे त्यातील वाटण्याचा प्रयत्न यातून केलेला िदसताे अाहे. राज्यातील या सत्ताधाऱ्यांना राज्यातील ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्नच समजलेले नाहीत, असे िदसते अाहे.
- डॉ. गिरधर पाटील
कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, "अभय' सुरू; मात्र उद्योगांना अपेक्षित सवलती नाहीत.... "एफएमपी'मुळे व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर नजर.....
बातम्या आणखी आहेत...