Home | Editorial | Columns | editorial

'ग्रेस' हरवलेला 'ग्रीस'

divya marathi team | Update - Jun 03, 2011, 04:40 AM IST

रोमन साम्राज्यात प्राचीन ग्रीसचे राज्य समाविष्ट झाले तो काळ आहे ख्रिस्तपूर्व ६व्या शतकाचा.

 • editorial

  रोमन साम्राज्यात प्राचीन ग्रीसचे राज्य समाविष्ट झाले तो काळ आहे ख्रिस्तपूर्व ६व्या शतकाचा. त्याला हेनेलिस्टिक पिरियड असेही म्हणतात. याच कालावधीपासून ग्रीक तत्त्वज्ञांचा मोठ्या प्रमाणावर दबदबा निर्माण झाला. राजकीय तत्त्वज्ञान, नैतिक मूल्ये, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये ग्रीक विचारवंतांनी मूलगामी चिंतन व विचारमंथन केले.
  ग्रीस देशातील विद्वानांची परंपरा, तसेच तेथील सम्राट अलेक्झांडर यांचा भारतीयांना चांगलाच परिचय आहे. एकेकाळी त्रिखंडात नाव दुमदुमणा:या ग्रीस देशाची गेल्या तीन वर्षांत पार आर्थिक दुरवस्था झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही डॉलरकेंद्रित असून त्यामुळे अमेरिकेत २८ मध्ये आलेल्या मंदीचा तडाखा बहुतांश देशांना बसला. या वित्तीय संकटातून अमेरिका, भारतासारखे देश आता हळूहळू सावरत असले तरी ग्रीस हा युरोपीय देश अद्यापही घायाळ अवस्थेतच आहे. हे वित्तीय संकट इतक्या थराला पोहोचले आहे की युरो चलनाच्या व्यवहारकक्षेतून बाहेर पडण्याचा विचार ग्रीसने चालविला आहे. त्यावर विचार करण्यासाठी युरोपीय देशांच्या अर्थमंत्र्यांची एक गुप्त बैठकही नुकतीच पार पडली. ग्रीसवरील कर्जांचा बोजा वाढत चालला आहे. त्याची इतकी टेकीची अवस्था होण्यास कारणीभूत असलेल्या अनेक कारणांमध्ये अमेरिकेत आलेली मंदी हे एक कारण आहे. ग्रीसने आजवर दाखविलेली आर्थिक बेशिस्त आता त्याच्या बोकांडी बसली आहे.
  गûयापर्यंत बुडालेल्या माकडासारखी ग्रीसची अवस्था असून आपला जीव वाचविण्यासाठी तो आता हातपाय मारत आहे. युरोझोनमधून बाहेर पडून ड्रॅश्मा या पूर्वीच्या चलनातूनच भविष्यात पुन्हा सारे व्यवहार सुरू करावेत, या विचारापर्यंत ग्रीस येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांत डॉलरसमोर युरो चलन ठामपणे उभे राहू शकलेले नाही. आपला नीटसा विकास होऊ न शकण्यामागचे हेही एक कारण असल्याची ग्रीसची मनोभूमिका बनली आहे. समजा ग्रीस युरोझोनमधून भविष्यात बाहेर पडला तर त्याचे नेमके परिणाम काय होऊ शकतील याचा अंदाज अन्य युरोपीय देशांनी घेणे सुरू केले आहे. युरोपीय प्रसारमाध्यमे, राजकीय नेते यांच्या तोंडी सध्या याच विषयाची चर्चा आहे. ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याला ११ अब्ज युरोची आर्थिक मदत देण्याचे युरोपीय समुदाय व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ठरविले होते. मात्र, त्याआधी ग्रीस सरकारने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कडक उपाय योजण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार ग्रीसचे अध्यक्ष पापेंद्रू यांनी प्रशासकीय खर्च, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचा:यांवर होणारा खर्च यांमध्ये सुमारे ३ टक्के कपात केली होती. मात्र, या उपायांनी फायदा होण्याच्या एेवजी तो देश असंतोषरूपी ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन बसला.
  ग्रीसमध्ये गेल्या वर्षी सुमारे २ हजार लोकांना आपल्या नोक:या गमवाव्या लागल्या होत्या. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये सध्या अशी स्थिती आहे की, तेथील दर पाच दुकानांपैकी एक दुकान पुरेशा व्यवसायाअभावी, तसेच कर्मचा:यांना वेतन द्यायला पुरेसे पैसे नसल्याने बंद आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये नवीन गाड्यांच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली आहे. या सगûया परिस्थितीवरून एकच गोष्ट लक्षात येते की, या देशातील मंदीने अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. २१३ पर्यंत ग्रीसला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अब्जावधी युरोंचे बेलआऊट पॅकेज देण्यात येणार असले तरी त्या देशालाही आपली स्थिती सुधारण्यासाठी हातपाय हलवावे लागणारच आहेत. रेस्क्यू फंडपैकी अर्धी रक्कम ग्रीस सरकारने उभारली असून २१२ च्या उन्हाळी मोसमापर्यंत अजून ५५ अब्ज युरोची रक्कम जमवावी लागणार आहे. त्यासाठी भांडवली बाजारातून गव्हर्नमेंट बाँडच्या विक्रीद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी पापेंद्रू सरकारला उभारावा लागणार आहे. हे उद्दिष्ट साध्य झाले नाही तर ग्रीसला पुढील हिवाळी मोसमाच्या वेळेस कदाचित स्वत:ला दिवाळखोर राष्ट्र असे जाहीर करावी लागेल. या घडामोडींचा विपरीत परिणाम अन्य युरोपीय देशांवरही होऊ शकतो.
  ग्रीस सरकारने घेतलेल्या कर्जांपैकी सरकारी वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या प्रमाणात २१३ पर्यंत अजून ५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, तर खासगी वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम १८ अब्ज युरोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ग्रीसला देण्यात आलेल्या कर्जाची फेरआखणी करा किंवा या देशाला युरोझोनमधून बाहेर हाकला, अशी मागणी जर्मनीकडून वारंवार करण्यात येत आहे. या मागणीकडे कानाडोळा करणे शक्य नाही. ग्रीसने आर्थिक दुरवस्था दूर करण्यासाठी आपल्या पूर्वीच्या चलनातून व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी त्या देशातील नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यांपासून लावून धरली आहे. समजा, ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडल्यास त्याचा पहिला फटका हा आयर्लंड, पोर्तुगाल, स्पेन या देशांना बसणार आहे. कदाचित त्यामुळे युरो या चलनाचे अस्तित्वच संपुष्टात येईल की काय, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशी अनेक मते-मतांतरे व्यक्त करण्यात येत असली तरी एक गोष्ट मात्र साफ आहे की, ग्रीसला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर येण्यासाठी युरोपातील देश आणि अमेरिका व आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था या सर्वांचेच सहकार्य लागणार आहे, तरच ग्रीसची हरवलेली ग्रेस पुन्हा त्याला प्राप्त होईल.

  संमीर परांजपे

Trending