Home | Editorial | Agralekh | editorial

भ्रष्टाचाराचा अंत ‘तुरंत’...

divya marathi team | Update - Jun 05, 2011, 03:57 AM IST

अहिंसा, शांतता याच मार्गाने जनता बदल घडवू इच्छिते. पण याचा अर्थ ही शांतता म्हणजे जनतेचा षंढपणा समजू नये. या देशातील जनतेला भगतसिंगांचा मार्ग अपरिचित नाही, हे लक्षात घ्यावे.

 • editorial

  अहिंसा, शांतता याच मार्गाने जनता बदल घडवू इच्छिते. पण याचा अर्थ ही शांतता म्हणजे जनतेचा षंढपणा समजू नये. या देशातील जनतेला भगतसिंगांचा मार्ग अपरिचित नाही, हे लक्षात घ्यावे.
  अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून आंदोलन केले ते यशस्वी झाले. भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केले त्यात यश मिळाले. का? मिळाले तर नेमके काय? हजारो- लाखो लोकांनी इ-मेल व फेसबुकवरून पाठिंबा दिला. पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार कमी झाला का? लोकपाल विधेयकाबाबत चर्चा सुरू झाली, पण हे विधेयक भिजत घोंगडे राहणार. जर मंजूर झालेच तर त्यातल्या तरतुदी निष्प्रभ असतील. सरकारने फसवले असे स्वत: अण्णा हजारे म्हणत आहेत. रामदेवबाबा यांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध उपोषणाची तलवार उपसली. हा सत्याग्रह अगर उपोषण कोणा एका रामदेवबाबा किंवा अण्णा हजारे यांचं नाही. या दोन नावांत हजारो-लाखो-करोडो जनतेचा चेहरा, भावना, संताप, उद्रेक, दडला आहे. या देशात हजारो लोक उपासमारीचे बळी आहेत. हजारो बालके कुपोषणाचे बळी आहेत. शेकडो शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्या गोष्टी कोळून प्यालेले आमचे नेते एका रामदेव बाबाच्या उपोषणाने काय द्रवणार? लाखो-करोडो लोकांचा आज मिळणारा पाठिंबा अत्यंत अल्पावधीत रोडावणार हे सरकारला माहीत आहे. कारण आम जनतेला पोट आहे.
  आम जनता खूप मोठ्या प्रमाणात भरडली गेली आहे. दैनंदिन जीवन जगणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. उद्वेग शिगेला पोचला आहे. बाबा रामदेव अगर अण्णा हजारे या दोन व्यक्तींच्या माध्यमातून साºया देशाने भ्रष्ट सरकार व भ्रष्ट सरकारी अधिकारी यांना संधी दिली आहे. ही संधी साधून भ्रष्टाचाराच्या रोगाने किडलेली व्यवस्था सुधारून पारदर्शक व जबाबदार व्यवस्था आणली जाऊ शकते पण आमचे राजकारणी व अधिकारी हे करणार नाहीत. त्यांना मानवी रक्ताची चटक लागली आहे. पण आता सामान्य माणूस गप्प बसणार नाही.एक सामान्य नागरिक म्हणून स्वस्थ न बसता आम्ही शस्त्र हाती घेऊ. हे न व्हावे. हा मार्ग आचरण्यास नेत्यांनी, सरकारने, अधिकाºयांनी जनतेस भाग पडू नये. आम्ही दंगलखोर नाही, आम्ही आतंकवादी नाही, आम्ही शांतता मार्गाचे पुरस्कर्ते आहोत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे बाबा रामदेव व अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य जनतेकडून मिळणारा पाठिंबा. पण शांतता षंढपणा ठरू नये हे आम्ही पाहणार. सरकार बाबांना मनवण्याचा प्रयत्न करते याला कारण बाबा व अण्णांमुळे सामान्य जनता जागरूक होत आहे, झाली आहे. या दोघांमध्ये सामान्य जनतेस जागरूक करण्याची क्षमता आहे. कारण त्यांना राजकारणात शिरून मंत्री व्हायचे नाही. दोघेही भारतातल्या त्रस्त जनतेचे चेहरे आहेत. बाबा मंत्र्यांशी चर्चा करायला गेले आणि अफवा पसरू लागल्या.
  मीडियाने ‘डील विथ रामदेवबाबा’ अशी भूमिका घेतली. त्या वेळी रामलीला मैदानावरून थेट प्रक्षेपणात लोकांनी सांगितले की कोणत्याच समझोत्यास ते तयार नाहीत. बाबांनी जरी समझोता केला तरी आता आम्ही मागे सरकणार नाही. उपोषण करणार. ठोस उपाय निश्चित वेळेत ही भूमिका बाबांशिवाय घेण्याबाबत लोकांनी तयारी दाखवली. त्यात बाबा आले आणि त्यांची ठाम भूमिका परत मांडली. बाबांना कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणी दबाव आणू शकत नाही. अशी ठाम भूमिका बाबांनी स्पष्ट सांगितली. याने लोकांच्या मनात या संदर्भात असणारी निश्चयी भूमिका अजून मजबूत झाली. आता बाबा अगर अण्णा यांना जरी माघार घ्यायची असली तरी ते आवाक्याबाहेर आहे.
  बाबांनी एक गोष्ट फार चांगली केली. मंत्र्यांबरोबर बैठक संपल्यावर बाबा महात्मा गांधी यांच्या स्मारकास भेट देण्यास गेले. तेथून भगतसिंगांच्या स्मारकास भेट देण्यास गेले. नेमके हेच सरकारने लक्षात घेतले पाहिजे. अहिंसा, शांतता याच मार्गाने जनता बदल घडवू इच्छिते. पण याचा अर्थ ही शांतता म्हणजे जनतेचा षंढपणा समजू नये. आम्हाला भगतसिंगांचा मार्ग अपरिचित नाही. त्या मार्गाचा अवलंब करण्यास जसे भगतसिंगांना त्या वेळच्या परिस्थितीने भाग पडले, तसे परत त्याच मार्गाचा म्हणजे सशस्त्र क्रांतीचा एकमेव मार्ग शिल्लक राहील असे काही सरकार अगर राजकारण्यांनी करू नये. सावध होण्याची वेळ आहे.
  हाताशी कितीही गुंड, सुपारीवाले, आंतरराष्टÑीय गुंड, कोणासही धरले तरी आता सामान्य जनता जागरूक झाली आहे. सामान्य जनतेसमोर कोणाचे काही चालत नाही. म्हणून समस्त सरकार, राजकारणी ,सर्व राजकीय पक्ष, सर्वांनी सावध होऊन जनतेचा कौल लक्षात घेऊन स्वार्थ सोडून आता देशाकडे पाहावे. जनतेला लुबाडणे बंद करावे. तुमची पार धुळीस मिळालेली इभ्रत किमान संपूर्ण नाही तरी काही प्रमाणात सावरण्याची संधी तुम्हास मिळाली आहे. एवढे केले तरी तुम्हाला थोडे प्रायश्चित्त केल्याचे समाधान मिळेल.
  डॉ. गोविंद आपटे
  अग्निहोत्र प्रचारक

Trending