आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About America And China Dispute On South China Sea, Divya Marathi

अमेरिकेला ठेंगा दाखवून चीनची मनमानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण चीन सागराच्या प्रश्नावर अमेरिकेने वारंवार विरोध दर्शवून, मन वळवण्याचा प्रयत्न करूनही चीनवर त्याचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही. दक्षिण चीन सागरच्या बाबतीत आम्ही अन्य देशांचे ऐकणार नाही, असे चीनने स्पष्टपणे बजावले आहे. इतकेच नव्हे तर अनेक बेटे असलेल्या या स्थानावर रडार यंत्रणा, लाइटहाऊस, मिलिटरी बराक, बंदरे, हवाई धावपट्ट्या तयार केल्या. या बेटांना मोठ्या प्रमाणावर विजेची गरज भासणार आहे. पण त्यांचे नॅशनल ग्रीड येथून हजारो किलोमीटर दूर अंतरावर आहे, त्यामुळे हे शक्य होणार नाही. यावर चीनने उपाय शोधून काढला असून येथे तरंगते अणुऊर्जा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातून विजेची गरज भागवली जाईल.

चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री काॅर्पोरेशनने अशा प्रकारचे जहाज बांधण्याची तयारी सुरू केली आहे. यावर दोन अणुऊर्जा संयंत्रे बसवण्यात येणार असून येथून अनेक बेटांना विजेचा पुरवठा करता येणार आहे. या कंपनीचे प्रमुख लियू झेगुओ यांनी सांगितले, फ्लोटिंग पॉवर स्टेशनची मागणी खूप जास्त आहे. चायना अॅटाॅमिक एनर्जी अॅथाॅरिटीचे संचालक शू दाझे यांनी बीजिंगमध्ये याअाधीच स्पष्ट केले : याचा संबंध चीनच्या "मेरीटाइम पॉवर' होण्याशी आहे. त्यांच्या मते, चीनची अणुऊर्जा क्षमता वाढवणे हा देशातील पंचवार्षिक योजनेचा एक भाग आहे. याची पूर्तता २०२० मध्ये करण्यात येणार आहे. अन्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या अणू संयंत्रांची निर्मिती सुरू आहे. तथापि, तरंगत्या अणुऊर्जा केंद्राची निर्मिती करणारा चीन जगातील पहिला देश नाही. १९६० च्या दशकात अमेरिकेने त्यांच्या दुसऱ्या महायुद्धातील जहाजांवर अणुऊर्जा रिअॅक्टर बसवले होते. याचा वापर पनामा कालव्याच्या परिसरात वीज पोहोचवण्यासाठी करण्यात आला. याव्यतिरिक्त १९५५ मध्ये समुद्रयानावर अणुऊर्जा होती. त्यानंतर अणू रिअॅक्टरच्या मदतीने अमेरिका आणि रशियांनी त्यांच्या जहाजांना वीजपुरवठा केला होता. दक्षिण चीन सागरात वादळे येतात. त्यामुळे तरंगते अणू संयंत्र वादळाच्या वेळी दुसरीकडे नेता येईल, असे चीनला वाटते. हे अणुऊर्जा केंद्र चालवण्यासाठी कोणत्या जहाजाचा वापर करण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चीनच्या नॅशनल न्यूक्लिअर सुरक्षा आस्थापनाशी संबंधित अधिकारी तांग बो यांच्या मते, फ्लोटिंग रिअॅक्टरसाठी सुरक्षेसंबंधी योजनेवर जवळपास काम पूर्ण होत आले आहे. यात काही धोका नसेल असे नव्हे. काही शास्त्रज्ञांच्या गटांच्या अणुसुरक्षा प्रकल्पांशी संबंधित अणुशास्त्रज्ञ डेव्हिड लोचबाऊम यांनी म्हटले की, तरंगत्या जहाजावर जर कोणत्या प्रकारची अणुसंबंधी दुर्घटना झाली तर रिअॅक्टरच्या कोअरमधून निघणारे तरल पदार्थ वाहून गेल्यानंतर जो रेडिओ अॅक्विट निघेल, त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीवर होईल. अशा स्थितीत पाण्याच्या पृष्ठभागावर रिअॅक्टर कोअरपासून निघणारा तरल पदार्थ जहाजात पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवणे जरुरी आहे. कारण तो थंड होण्यास पाण्याची आवश्यकता असते. परंतु एखाद्या दुर्घटनेच्या वेळी तसे करणे योग्य नाही.
© The New York Times