आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Dattu Bhoknal Eligible For Rio Olympic

पाण्याला घाबरणारा दत्तू झाला रियाे ऑलिम्पिकचा रोव्हर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील चांदवड तालुक्यातील तळेगावच्या दत्तू भाेकनळ या युवकाने राेइंगच्या सिंगल स्कल प्रकारात थेट रिअाे अाॅलिम्पिकमध्ये पात्र हाेण्याची कमाल करून दाखवली अाहे. दक्षिण काेरियात चमकदार कामगिरी करीत अाॅलिम्पिकमध्ये धडक मारली. क्रीडा क्षेत्राची काेणतीही पार्श्वभूमी नसताना अाणि या क्षेत्रात करिअरचा विचारदेखील कधीही केलेल्या दत्तूची कामगिरी विस्मयचकित करणारी अाहे. दाेन महिन्यांपूर्वीच कविता राऊतने मॅरेथाॅनमध्ये चमकदार कामगिरी करीत रिअाे अाॅलिम्पिकची पात्रता फेरी गाठली अाहे.

दत्तूचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. तळेगाव रोहीतील संत ज्ञानेश्वर शाळेत शिकणाऱ्या दत्तूची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला आठवीनंतर शाळा सोडावी लागली. वडील एका लहान जमिनीच्या तुकड्यावर कुटुंब चालवत होते. दुष्काळग्रस्त भाग असल्याने कोरडवाहू पिके घेतली जात होती. यात कुटुंबाचा खर्चही भागत नव्हता. यामुळे लोकांच्या विहिरी खोदण्याचे काम ते करत असत. दत्तू त्यांना या कामी मदत करायचा.
दुर्दैवाने दत्तूच्या वडिलांना २०११ मध्ये कॅन्सरचे निदान झाले. हाडाच्या कॅन्सरने त्यांचा बळी घेतला. तेव्हा दत्तूवर आभाळ कोसळले. दोन लहान भाऊ आणि विधवा आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी लहानग्या दत्तूवर आली. शेती आणि विहिरी खणण्याऐवजी एखादे नियमित उत्पन्न आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकते, हे त्याने जाणले. यादरम्यान तो दहावी उत्तीर्ण झाला. त्या काळात सैन्यात भरती चालू झाली. त्या परीक्षेत तो यशस्वी ठरला. तांत्रिकी सेवेसाठी त्याची निवड झाली. मुंबई इंजिनिअरिंग ग्रुप आणि खडकी सेंटरवर ट्रेनिंगच्या दरम्यान खेळामध्ये भाग घेणे आवश्यक असल्याने नौकानयनाकडे आकर्षित झाला. पुण्यातील सैन्याच्या तळावर जेव्हा त्याने वॉटर स्पोर्ट््सच्या सुविधा पाहिल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर तेथे पाण्याची उपलब्धता पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो तर दुष्काळी भागातून आलेला असल्याने इतके पाणी आपण गावाकडे घेऊन गेलो तर ती किती चांगले होईल? असे त्याला वाटायचे. त्याला लहानपणापासून पाण्याची भीती वाटत होती. परंतु येथे पाण्याच्या भीतीबरोबरच एक आकर्षणही वाटे. दत्तूची फूट इंच उंची आणि भरदार शरीरयष्टी पाहूनच वॉटर स्पोर्ट््समध्ये जाण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. दत्तूने पाण्याची भीती वाटत असल्याचे त्याच्या कोचला प्रारंभी सांगितले. तेव्हा आर्मी रोइंग नोडचे काेच कुदरत अली यांनी म्हटले, नौकेत स्वार तर हो, सगळी भीती पळून जाईल.

दत्तू नौकेत स्वार झाला खरा; पण नौका उलटली. पाण्यात पडल्याने पाण्याची भीती दूर झाली. आणखी दोन वेळा नौका उलटली; पण आता तो पाण्याला घाबरत नव्हता. त्याची मेहनत पाहून त्याला नॅशनल कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्याला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित इस्माईल बेग यांचे मार्गदर्शन लाभले.

इस्माईल बेग यांनी या कच्च्या हिऱ्याला पैलू पाडण्याचे कार्य सुरू केले. २०१४ मध्ये त्याची आशियाई खेळासाठी निवड झाली. तेथे तो व्या स्थानावर होता. परंतु पुढच्या वर्षी त्याने आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रजत पदक जिंकले. अथक परिश्रम आणि जिद्दीने त्याने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली.

नशीब दत्तूचे वारंवार परीक्षा पाहत होते. ऑलिम्पिक क्वालिफाइंग स्पर्धेत कोरियाला गेल्यावरसुद्धा त्याच्या आईला अपघात झाल्याचे समजले. तो काहीसा विचलित झाला; आईच्या अपघातामुळे दत्तूचे मन प्रशिक्षणात लागत नव्हते. तो घरी परत जाण्याचा विचार करु लागला. पण आईकडे जाण्याऐवजी तू येथे यश मिळवून गेलास तर आईला आनंद वाटेल, असे त्याचे काेच इस्माइल बेग यांनी समजावले. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर त्याच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. दत्तूची शरीरयष्टी तर मजबूत होतीच; पण मनाचा निश्चय त्याहून मोठा होता, हे दिसून येते.

दत्तुच्या या यशामुळे नाशिकरांबरोबरच सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आॅलिम्पिक स्पर्धेकडे लागले आहे. दत्तुच्या चमकदार कामगिरीची तमाम महाराष्ट्रवासियांना अपेक्षा आहे. तर दत्तुच्या जिद्दीची कथा देशवासियांना प्रेरणादायी आहे. त्याला आतापासूनच सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत.

अवघ्या चार वर्षांत गाठले शिखर
दत्तू २०१२ मध्ये सैन्यदलात सहभागी झाला. ताेपर्यंत त्याला राेइंगची माहितीदेखील नव्हती. मात्र, सैन्यदलात स्ट्रेंग्थ टेस्टमध्ये खांद्याची अाणि हातांची विशेष ताकद तसेच नाैकानयनपटूला हवे तसेच ‘फिजीक’ या बाबी हेरून त्याला हा खेळ निवडण्याची संधी मिळाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत दत्तूने राष्ट्रीय अाणि अाशियाईच्या पदकांसह थेट अाॅलिम्पिकच्या पात्रतेचे शिखर गाठले.
चांदवड हा मुळात दुष्काळी तालुका म्हणून अाेळखला जाताे. त्यामुळे जिथे दरवर्षी पिण्याची पाण्याची भ्रांत पडते, तिथे एखादा पाण्याशी निगडित खेळाचा अाॅलिम्पिकपटू घडू शकेल, ही कल्पना कुणीही करू शकत नाही. परंतु, दत्तूने हे अकल्पित वास्तवात अाणून दाखवले ते केवळ जिद्द अाणि प्रचंड मेहनतीच्या बळावर.

तळेगाव ते रिअाेचा प्रवास : २०१२ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याच्या शरीरयष्टीला साजेशा असलेल्या ‘नाैकानयन’ अर्थात राेइंग या प्रकारात त्याने अवघ्या वर्षभरात कमालीचे काैशल्य प्राप्त केले. राेइंग फेडरेशन अाॅफ इंडियाने भरवलेल्या राष्ट्रीय नाैकानयन स्पर्धेत पहिल्याच वर्षी त्याने पदक पटकावले. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीदेखील दत्तूने सुवर्णपदकाची कामगिरी करीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. द्राेणाचार्य पुरस्कार विजेते इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनामुळे दत्तूचा खेळ अधिकच बहरला. पुण्यातील सैन्यदलाच्या क्लबवर मग ताे अधिकच उत्साहाने सराव करू लागला. त्यानंतर चीनमध्ये झालेल्या अाशियाई स्पर्धेत २०१४ मध्ये राैप्यपदकाची कमाई करीत पुढचे ध्येय निश्चित केले. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेले प्राेत्साहन अाणि पाठिंब्याला त्याने प्रचंड कष्टाची जाेड देत त्याच्या कामगिरीचा अालेख उंचावता ठेवला अाणि खेळायला प्रारंभ केल्यानंतरच्या अवघ्या वर्षांच्या काळात दत्तूने थेट अाॅलिम्पिकच्या पात्रतेचे शिखर गाठण्याचा पराक्रम करून दाखवला अाहे.