आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांच्या छळाविरोधात जग एकवटले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युलिनमध्ये श्वानांचा छळ केल्याची छायाचित्रे इंटरनेटवर आली आहेत. जगभरातील नामवंत कलावंतांपासून राजकीय मंडळींनी पशुकल्याण संघटनांना पाठिंबा दर्शवला आहे.

चीनच्या युलिन शहरात क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या डॉग फेस्टिव्हलची तयारी जोरात सुरू झाली आहे. जगातील अन्य कोणत्याही देशात श्वानांचा असा छळ कोठेही करण्यात येत नसावा. याचे अधिकृत शीर्षक "डॉग मीट फेस्टिव्हल' असे आहे. याला जगातील पशू कल्याण संघटनांनी विरोध दर्शवला आहे. प्रथमच सर्वजण एकत्रित आले आहेत. चीन सरकारने यावर बंदी आणली पाहिजे, असे त्यांनी बजावले आहे. या सदस्यांनी एक याचिका तयार केली असून १.१ कोटी लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ही याचिका लंडन येथील चिनी दूतावासात दाखल करण्यात आली आहे. चीन सरकारवर दबाव आणण्यात ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनलची महत्त्वाची भूमिका ठरली आहे.

वॉशिंग्टन येथील ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनलचे चीनचे पॉलिसी अॅडव्हायझर पीटर जे. ली यांनी सांगितले, युलिन प्रशासनाच्या बीजिंग येथील कार्यालयात अशीच एक याचिका दाखल करण्यात आली आहे. चायना अॅनिमल राइट्स समूहाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. याचिकेची प्रत चीनच्या हेल्थ अँड फूड सेफ्टी रेग्युलेटर्सला रजिस्टर्ड पोस्टाने पाठवण्यात आली आहे. ली यांनी सांगितले, यासंदर्भात अनेक वादविवाद सुरू असताना, युलिन शहरात २०१० पासून दरवर्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. युलिन शहरात गुआंगशी झुआंग राज्य स्वायत्त आहे. या फेस्टिव्हलदरम्यान रेस्तरांमध्ये कुत्र्यांचे मांस खाण्यास देतात. फेस्टिव्हलचे समर्थन करणारे काहीतरी थातूरमातूर कारणे देतात. ही आमच्या देशाची संस्कृती असल्याचे सांगतात. कुत्र्यांचे मांस खाणे म्हणजे इतर मांसाहारी पदार्थाप्रमाणेच असल्याचेही ते सांगतात. २१ जूनपासून फेस्टिव्हलची सुरुवात होत असून युलिन शहरात या फेस्टिव्हलची तयारी जोरात सुरू झाली आहे. फेस्टिव्हल बंद करण्यासाठी बीजिंगपासून लंडनपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. युलिनमध्ये श्वानांचा छळ केला जाणारी छायाचित्रे इंटरनेटवर आली आहेत. जगभरातील नामवंत कलावंतापासून राजकीय मंडळींनी पशू कल्याण संघटनांना पाठिंबा दर्शवला आहे. लंडन येथील चिनी दूतावासात गेल्यानंतर अमेरिकी अभिनेत्री कॅरी फिशन आणि ब्रिटिश अभिनेत्री जेनी सीग्रोव्ह या संघटनांसाेबत होत्या. त्यांनी सोबत त्यांचे पाळीव श्वान घेतलेले होते.

चीनमध्ये श्वानाबद्दलची लोकांची भावना बदलत अाहे. कुत्र्यांना माणसांचा चांगला मित्र मानले जाते. चीनमधील सरकारी वृत्तपत्र "पीपल्स डेली'मध्ये चीनच्या अकादमी ऑफ सोशल सायन्सच्या कायद्याचे विद्यार्थी छांग जिवान आणि त्यांच्या दोन सदस्यांनी एका पाहणीतून अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, देशातील ६४ टक्के नागरिकांना कुत्र्यांचे मांस खाण्यावर बंदी आणली पाहिजे असे वाटते. मग युलिनमध्ये कुत्री कोठून आणली जातात? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यासंदर्भातील संशोधन अहवालात म्हटले की, ही कुत्री एकतर चोरीची असून गैरमार्गाने ती पोहाेचवली जातात.

यादरम्यान, पीटर जे. लिली यांनी म्हटले, २१ जून रोजी फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी त्यांच्या मोहिमेत जगभरातील लाखों लोक सहभागी हाेतील. चीन सरकारने फेस्टिव्हल बंद केल्यास त्यांची प्रतिमा जगभरात उजळ होईल. ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनलच्या वेबसाइटवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना उद्देशून लिहिले आहे की, फेस्टिव्हल बंद करून तुमच्या नेतृत्वगुणांचा परिचय देऊ शकता. नागरिकांबरोबरच पशूंचेही हित जोपासाल, हा संदेश जाईल. तसेच प्रगतिशील चीनची प्रतिमा अशा घटनामुळे मलीन होणार नाही.
©The New York Times
चीनमधील युलिन शहरात गेल्या वर्षांपासून भरत असलेल्या "डॉग फेस्टिव्हल' ला जगभरातून विरोध सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये कुत्र्यांचा छळ केला जातो, यामुळे हा विरोध होतो आहे. जगातील पशुप्रेमी संघटना, राजकीय मंडळी आणि चित्रपट कलावंतांनी फेस्टिव्हल बंद करण्यासाठी चिनी सरकारवर दबाव आणला आहे. यासाठी एक याचिकाही दाखल करण्यात आली असून श्वानांचा होत असलेला छळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी फेस्टिव्हल बंद करण्याचे धाडस दाखवावे, असे म्हटले आहे.
युलिनमध्ये कुत्री एक तर चोरीची असून गैरमार्गाने ती पोहाेचवली जातात.