आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात बधिर होणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हात सुन्न किंवा बधिर होणे, ठणक लागणे अशा बहुतांश लोकांच्या तक्रारी आहेत. रात्रीच्या वेळी हाताचे दुखणे खूप असह्य होते. संगणकावर सातत्याने काम करणे किंवा हात एकाच अवस्थेत दीर्घकाळ तसाच राहिल्याने कार्पल टनल सिंड्रोमचा त्रास होतो. महिलांमध्ये याचे प्रमाण तिप्पट आहे.

कार्पल टनल सिंड्रोम हात आणि मनगटात निर्माण होणारे दुखणे आहे. कार्पल टनल हाडे आणि मनगटातील अन्य पेशीद्वारे तयार झालेली संकुचित नलिका असते. ही नलिका आपल्या मीडियन नर्व्हचे संरक्षण करते. मीडियन नर्व्ह आपले अंगठे, मध्य आणि अनामिका बोटाशी जोडलेले असतात, परंतु कार्पल टनलमध्ये जेव्हा इतर पेशी म्हणजे लिगामेंटस आणि टेंडनवर सूज येते किंवा त्या फुगतात तेव्हा याचा प्रभाव मध्य पेशीवर पडतो. या दबावामुळे हात बधिर वाटू लागतो. साधारणत: कार्पल टनल सिंड्रोम हा काही गंभीर आजार नाही. उपचारानंतर दुखणे दूर होते. तुम्हाला दीर्घकाळापर्यंत हात किंवा मनगटात पुन्हा दुखणे येणार नाही.

कारण: एकाचहाताने सतत काम करत गेल्याने कार्पल टनल सिंड्रोमचा त्रास जाणवतो. हा त्रास साधारणत: ज्यांना मनगटे वाकवण्याबरोबरच पिंचिंग किंवा ग्रीपिंग करण्याची गरज भासते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचा तिप्पट धोका कार्पल टनलचा असू शकतो. महिलांमध्ये तो गर्भावस्थेत, मेनापॉज आणि स्थूलपणामुळे अधिक असतो.

यात संगणकावर काम करणारे, सुतारकाम, हमाल, मजूर, संगीतकार, मेकॅनिक इत्यादींना कार्पल टनल होऊ शकतो. माळी, शिंपी, गोल्फ खेळणारे आणि नाव चालवणाऱ्यांना कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो. कार्पल टनल सिंड्रोम अन्य कारणामुळेही होतो. मनगटाला दुखापत झाल्यास किंवा फॅक्चर किंवा मधुमेह, आर्थरायटिस किंवा थॉयराॅइडसारख्या आजारामुळेही तो होऊ शकतो.

समाधान: डॉक्टरांनीतपासल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताचा वापर कसा करावा याचा सल्ला देतील. ते काही तपासण्याही करतील.
या प्रक्रियेत सर्वात आधी एनसीव्ही चाचणी घेतली जाते. याला नर्व्ह कंडक्शन व्हेलॅसिटी टेस्ट असे म्हणतात. यात काही हलक्या विजेच्या तारा जोडून करंट दिले जाते. यात हाताला हलक्या मुंग्या आल्यासारखे वाटते. हात आणि भुजाच्या नाडीची तपासणी होते. तसेच मांसपेशीची तपासणी होते. यामुळे कार्पल टनल सिंड्रोमचा प्रभाव आहे की नाही, याचे निदान होते.

उपचार: जरकार्पल टनल सिंड्रोम एखाद्या प्रकारच्या चिकित्सकीय समस्येद्वारा उत्पन्न होत असेल तर डॉक्टर सर्वप्रथम त्यावर इलाज करतील. मग मनगटाला आराम देण्याचे सांगेल. तुम्ही हाताचा कसा वापर करता तो बदलण्यास सांगतील. मनगटाला स्पिलिंट घातल्यानंतर मनगटाची हालचाल करू शकत नाही, परंतु सामान्य क्रिया तर करू शकता. याचा वापर केल्याने रात्री हात दुखण्यापासून सुटका होते. मनगटावर बर्फ ठेवून त्याने मालिश करता येते. तसेच काही ओढ बसेल असे व्यायामही करू शकाल. जर आॅपरेशनची गरज नसल्यास मनगट खालच्या बाजूने ठेवल्यास आराम पडू शकतो.

काही प्रकरणात हा आजार नाहीसा करण्यासाठी ऑपरेशनची गरज असते. या ऑपरेशनमध्ये लिगामेंट मीडियन नर्व्ह दाबून कापली जाते. आॅपरेशननंतर काही आठवड्यात किंवा महिन्यानंतर सामान्याप्रमाणे मनगटाचा किंवा हाताचा वापर करू शकता. मात्र हात, मनगट आणि बोटांचा व्यायाम करणे आवश्यक असते.

व्यायाम केला नाही तर मनगट कडक होऊ शकते. कदाचित तुमचा हात निकामी ठरू शकतो. तुमचे दुखणे कमी होण्यासाठी आयब्रुप्रोफेन, (मॉट्रिन), नॅप्रोक्झेन(अॅलिव्ह), केटोप्रोफेन (आेरुडिस) किंवा अॅस्पिरिन घेऊ शकता. याबरोबरच डॉक्टर तुम्हाला कार्पल टनलमध्ये कोर्टीसॉन हे औषध इंजेक्शनसोबत देतात. यामुळे काही काळापर्यंत सूज, झुनझुनाट किंवा दुखणे कमी होते.
या आजाराला मीडियन नर्व्ह कम्प्रेशन असेही म्हणतात. भारतात दरवर्षी कोटीहून अधिक लोकांना हा आजार हाेतो.

(लेखक: संचालक न्यूरो अँड स्पाइन डिपार्टमेंट, सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली)