आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरींच्या ऐतिहासिक विजयाने महिलांमध्ये नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नामांकन मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी हिलरी क्लिंटनच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरला आहे. मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांनी विजय यात्राही काढली. येथपर्यंत पोहाेचणाऱ्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत; पण सर्वच महिलांना हा त्यांचाही सन्मान असल्याचे वाटत नाही.

या विजय यात्रेत क्लिंटन यांनी दिलेल्या भाषणांचे टीव्ही चॅनेल्स आणि स्मार्टफोनवर प्रसारण होत होते. लाइव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या कंपन्यांनी हिलरीची वाक्ये वारंवार प्रसारित केली. मात्र, सर्वच महिलांना यामुळे आनंद झालेला नाही, असे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजले. हिलरीच्या बाबतीत महिलांचे विचार भिन्न आहेत. इतर महिलांसाठी त्या प्रेरणा ठरू शकतील, असे कोणी म्हटले तर काही महिलांना ते योग्यही वाटत नाही.

त्यांच्या मते, हिलरी क्लिंटन परिवारांशी संबंधित त्या राष्ट्रीय बातम्या आम्हाला आजही आठवतात. लॉस एंजलिस येथील म्युझिक इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मार्गारेट क्रॅमर(४८ )यांनी म्हटले, निवड निश्चितच ऐतिहासिक आहे. मी स्वत: हिलरीची समर्थक आहे. बर्नी सँडर्ससारख्या नेत्याला त्यांनी मागे टाकले, यावर विश्वास बसत नाही. तथापि तुम्हाला कोण मतदान करत आहे, याने काही फरक पडत नाही. ज्यांना त्यांचे कार्य, विचार आवडतात, असेच लोक त्यांना मतदान करतात. हिलरी क्लिंटन यांची योग्यता आहे. पण नैतिकदृष्ट्या त्या पात्र नाहीत, असे मला वाटते.

डेमाेक्रॅटिक पार्टीचे रणनीतिकार हिलरी रोझॅन यांनी म्हटले, संपूर्ण देश त्यांना ओळखतो, असे मानले जात होते. त्या देशातील सर्वच लोकांचे विचार बदलू शकत नाही. अध्यक्षपदासाठी जेव्हा तुम्हाला नामांकन मिळते तेव्हा देश तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहत असतो. तुमच्याप्रती लोकांचे विचारही बदलतात. लोकांना तुम्ही अावडू लागता. तथापि वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित महिलांनी सांगितले, आमच्या पूर्वी जशा होत्या तशाच भावना आजही आहेत. डेनेव्हरमध्ये डॉक्टर क्लिंटनचे उत्साही समर्थक जॅकी स्टर्न बेलॉव्हे (५८)यांनी सांगितले, मी विजय यात्रेत लोकांमध्ये उत्साह आनंद पाहिला. तसाच रागही व्यक्त झालेला पाहिला. एक डॉक्टर या नात्याने मी लोकांना भेटण्यासाठी भरपूर वेळ दिला होता. "काही चांगल्या कामात लोकांचे अडथळे तर येणारच' असे मला वाटते. बर्नी सँडर्सची समर्थक महिलेने म्हटले, ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. एक महिला टॉप ऑफ तिकीट पोहाेचू शकते, हे सिद्ध झाले आहे.