आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी निवडणुकीत हिलरींची दावेदारी कठीण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरुवातीला महिलेला उमेदवारी मिळेल, असे लोकांना वाटले होते. ते नाव डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या असलेल्या हिलरी क्लिंटन यांचे होते. सद्य:स्थितीत त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. याला त्या स्वत: जबाबदार आहेत.
फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटी आणि बोस्टन हेरॉल्डचे निवडणूक सर्वेक्षण हे सांगते की, २०११ ते २०१३ पर्यंत क्लिंटन यांची लोकप्रियता चांगली होती. तेव्हा हा अंदाज होता की त्या २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार असतील. वर्तमान स्थितीत बर्नार्ड सेंडर्स व उपराष्ट्राध्यक्ष जो बेडेन हे हिलरींच्या पुढे आहेत. वरमाँट येथून निवडून आलेले बर्नार्ड खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत. नामांकनपत्र सादर करणाऱ्यांच्या यादीत बर्नार्ड यांचे नाव आहे. त्यांची लोकप्रियता ४४, हिलरी क्लिंटन यांची ३७ टक्के आहे.


काही दिवसांपूर्वी निवडणूक तज्ज्ञ हिलरी क्लिंटन यांना हरवणे कठीण आहे, असे सांगत होते. मला आता असे नाही वाटत. सध्या बर्नार्ड सर्वात समोर आहे. त्यांच्या सभांना गर्दी होत आहे. तरीही होऊ शकते की, येणाऱ्या काळात ई-मेल स्कँडल पाहायला मिळेल. हे क्लिंटनकडून उघडकीस येऊ शकतात. दुसऱ्या बाजूचे सांगायचे, तर रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्फ आघाडी घेत आहेत. ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता नाही. यासाठी परराष्ट्र विभागाचा त्यांचा कार्यकाळ, प्रचाराच्या अंगाने त्यांचे कमकुवत नेतृत्व जबाबदार असल्याचे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

अशक्य काहीच नाही. यामुळे मी हे सांगू शकतो की, त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात यशस्वी होतील. असे यासाठी की, त्यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ डेमोक्रॅटिक पार्टी व समर्थकांची मते हवी आहेत आणि पार्टी आजही त्यांना पसंत करते; परंतु मागील सहा महिन्यांच्या तुलनेत त्या निवडणुकीच्या कमकुवत उमेदवार दिसून येतात. ही स्थिती पाहून बर्नार्डही हसत आहेत. ते क्लिंटनविरोधी, गोरे, जास्त शिकलेले व बरीच डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रातून येतात. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, अमेरिकी निवडणुकीत गोऱ्या लिबरलमुळेच विजय मिळत नाही. अल्पसंख्याक कृष्णवर्णीयांचेही समर्थन आवश्यक आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या राजकारणासाठी जो बेडेन हे एकमेव नेते चर्चेत आहेत. ते फ्रंट रनरही असू शकतात आणि कृष्णवर्णीय मतदात्यांना हिलरींसाठी मदतही मागू शकतात.