आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई आणि कर तुमच्या गुंतवणुकीचे शत्रू... तरीही तुम्ही पैसे वाचवू शकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे तुमच्या खिशाला चाट तर बसतेच; परंतु तुमच्याकडून केलेल्या गुंतवणुकीवरही याचा विपरीत परिणाम होतो. जर तुम्ही यामागचे तत्त्वज्ञान समजून घेतले आणि कराचे गणित मांडले तर तुम्ही सहज तुमची गुंतवणूक वाचवू तर शकताच, त्याचबरोबर तुमच्या पैशातही वाढ होईल. जर तुमचा सर्वाधिक खर्च शिक्षणावर होत असेल तर २० वर्षांपर्यंत मुलांना मोठे करण्यात होणाऱ्या खर्चांनंतरही तुम्ही कशा प्रकारे पैशांची बचत करू शकता, हे जाणून घ्या.

गेल्या काही वर्षांपासून आपण घरखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहोत. दररोज महागाई वाढतेच आहे आणि बचत संपून जाते आहे. गरजेच्या वस्तू, शिक्षणाचा खर्च, कर्ज आणि ईएमआय इत्यादी भरता भरता काही वाचवू शकतो, अशी परिस्थितीच नसते. बहुतांश वेळा आपणास फायनान्सकडे लक्ष देणे भाग पडते. या सर्व गोष्टी महागाईमुळेच अडचणीच्या वाटू लागतात. थोड्याफार प्रमाणात महागाई वाढत असेल तर समजू शकतो; परंतु त्यात वाढ झाल्यास आपली बचत संपून जाते. यामुळेच देशातील चलनावर परिणाम होतो. आपली चांगली अार्थिक परिस्थिती बिकट होत जाते; परंतु जर कराचे प्रमाण जास्त असेल तर यावर अधिक परिणाम जाणवतो. जर तुम्ही कर वाचवू शकत नसाल तर अशा गुंतवणुकीमुळे आपलेच नुकसान होऊ शकते. याचा तुम्ही महागाईशी संबंध जोडाल तर आणखी नुकसान होते.
बचतीवर परिणाम
निवृत्त झाल्यानंतर जर तुमच्यावर कोणते कर्ज नसेल किंवा हप्ते भरावे लागत नसतील तर तुम्ही आरामात राहू शकता. मुलांच्या भवितव्यासाठी चांगले नियोजन असावे, घर किंवा कार खरेदी करणे इत्यादी चिंता सर्वसामान्यांना सतावत असतात. या इच्छाच माणसाचे खर्च वाढवत असतात. यामुळे घरखर्चावर परिणाम होतो. ज्या प्रमाणात तुमच्या प्राथमिकता किंवा गरजा बदलल्या तर खर्चाचे प्रमाणही बदलते. आयुष्याच्या उमेदीच्या काळात तुमचा खर्च जास्त असतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढत असतो. जर महागाई वाढली तर त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तुम्हाला तितका पैसा जवळ ठेवावाच लागतो. यामुळे बचत शिल्लक राहत नाही.
खाली दिलेल्या टेबलनुसार महागाईतही तुम्ही पैसे कसे वाढवू शकता हे दाखवले आहे-
खर्च आता वर्षाला (रुपयांत) महागाईचा दर २० वर्षांनंतर दरवर्षाचा खर्च घरखर्च ४००००० ७% १५४७८७४
शिक्षण १०००००० १०% ६७२७५००
सेवानिवृत्तीनंतर १००००० ७% ६७२७५०

जेव्हा तुम्ही बचत करू लागता तेव्हा ती अशा प्रकारची वाटते
लक्ष्य पैसा किती किती आवश्यक दरवर्षी परतावा
लागेल वर्षांत मासिक बचत टक्केवारी
शिक्षण ६७२७५०० २० वर्षे ६८०० १२
शिक्षण ६७२७५०० १५ वर्षे १४१३५ १२
शिक्षण ६७२७५०० ८ वर्षे ४२८४३ १३
(सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार तसेच फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य.)