आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Problems For China's Economy Extend Far Beyond Currency

चलनाचे अवमूल्यन करून चीन आर्थिक संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दिवसांत चलनाचे ४.४ % अवमूल्यन करून आपल्याकडे परिस्थितीतून बाहेर पडण्याचे पर्याय आता नसल्याचे चीनने सिद्ध केले आहे. तीन महिन्यांपूर्वीपासूनच त्यांची स्थिती बिघडत चालली होती. आता परिणाम दिसायला लागले आहेत. चिनी चलनाच्या अवमूल्यनामुळे काही काळ अनेक देशांच्या शेअर बाजारावर परिणाम झाला. पण ते सावरले. असे यासाठी झाले की चीनने अर्थव्यवस्थेत तेजी दाखवून आपल्या गुंतवणूकदारांनाही संभ्रमित केले होते. त्यांनी आपल्या चलनाला डाॅलरच्या तुलनेचे दाखवून गुंतवणुकीची वातावरणनिर्मिती केली.
नील गॉफ/पीटर एव्हिस, अर्थव्यवस्था तज्ज्ञ
मागील दहा वर्षांत चीनमध्ये जे बदल झाले ते यापूर्वी कधी नव्हते. चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण झाली वा त्यांना चलनाचे अवमूल्यन करावे लागले तरी गुंतवणूकदारांना फारसा फरक पडणार नाही, हेही खरे आहे. त्यांना मागील अनेक वर्षांपासून चीनची परिस्थिती माहीत आहे आणि ते याचा सामना करू शकतात. अधिकृत भाषेत चिनी चलनाला रॅन्मन्बी म्हटले जाते. पण युआन, झाओ व फेन चर्चेत आहे. फेनचे चलन संपले आहे. झाओचा उपयोग अंतर्गत कारभारात केला जातो. जागतिक कारभारात मात्र युआन चालते. चीनच्या चलनात चढउतार नवे नाहीत. कारण हे तिथे रोजच चालते. अधिकृतरीत्या रोज सकाळी चलनाची किंमत ठरवली जाते. त्यानंतर काय करायचे हे गुंतवणूकदारांवर अवलंबून असते. कोणत्याही परिस्थितीत दोन टक्क्यांपेक्षा जास्त फरक असू शकत नाही. परंतु तीन दिवसांत ४.४ टक्क्यांची घसरण दशकात पाहिली नाही.'

स्विर्त्झलंडची इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी यूबीएसचे सीईओ जॉर्ग ओ मॉरिशल यांच्या मते चीनच्या धोरणातील बदलांमुळे मागील दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी स्थिती आली आहे. ही परिस्थिती गुंतवणूकदारांत भीती निर्माण करणारी आहे. कोणताही गुंतवणूकदार एका वर्षात दोन टक्के घसरणीचा भार सहन करू शकतो, एका दिवसात दोन टक्क्यांचा नाही. न्यूयॉर्कच्या डेलटेक अॅसेट मॅनेजमेंटचे सीईओ अतुल लेले यांच्या मते हे सर्व चीन आणि चिनी लोकांच्या चुकीचे परिणाम आहेत. त्यांनी त्यांच्या चलन वाढवून जगासमोर सादर केले. डॉलरच्या बरोबरीत आणण्याचे प्रयत्न केले. वास्तवात तसे काही नव्हते. येणाऱ्या काळात युआनचे अधिक अवमूल्यन होईल याची जाणीव चीनच्या गुंतवणूकदारांना झाली तर त्यांच्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होईल.

१० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या देशात अर्थतज्ज्ञ या परिस्थितीतून कसे बाहेर यावे यावर विचार करीत आहेत. कारण चिनी कंपन्यांमध्ये बाहेरील गुंतवणूकदारांचा बराच पैसा गुंतलेला आहे. जर ते परिस्थितीवर नियंत्रण नाही मिळवू शकले तर गुंतवणूकदारांचा विश्वास गमावून बसतील. चलन आणि अर्थव्यवस्थेला फुगवून दाखवण्याला कृत्रिम अर्थव्यवस्था म्हणतात. ही स्थायी राहू शकत नाही. कोणत्याही देशाच्या चलनाच्या अवमूल्यनामुळे तेथील उत्पादनांच्या किमती कमी होतात, ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. सद्य:स्थितीत चीनची उत्पादने अनेक देशांत निर्यात होतात. खासकरून आशिया आणि युरोपमध्ये. चिनी चलनाच्या अवमूल्यनामुळे आशियाच्या बाजाराचे फारसे नुकसान होणार नाही. कारण गुंतवणूकदार त्यावर अवलंबून नाहीत. एवढे जरूर आहे की, त्यांच्या उत्पादनाच्या किमती कमी होतील आणि खरेदीदार देश आणि ग्राहकांचा लाभ होईल. असे यासाठीही होईल की, कारण मागील वर्षी चीनचा विकासदर ७.२ टक्के होता. तो या वर्षीच्या तिमाहीत घटून ६.८ टक्के झाला. २०१६ मध्ये तो ६.३ टक्के वा त्यापेक्षाही खाली घसरू शकतो. विदेशी चलन गुंतवणूक बाजारातील हस्तक्षेप कमी करणे हा चीनसाठी परिस्थिती सुधारण्याचा उत्कृष्ट पर्याय आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले आहे. चीन सरकार आपल्या चलनात लवचिकता कधी आणेल हे अजून स्पष्ट झालेले नाही.
चीनचे अधिकारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर रॅन्मिन्बी हे चलन व्यवहारात आणण्याची मान्यता देण्यासाठी दबाव आणीत आहेत. म्हणजे कोणताही देश त्याचा उपयोग करू शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहारात उपयोग होऊ शकेल अशी सध्या चारच चलनांना मान्यता आहे. यात डाॅलर, युरो, पाउंड व येनचा समावेश आहे. अमेरिकेची मल्टिनॅशनल बँकिंग अँड फायनान्शियल फर्म वेल्स कॅपिटल मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक धोरण अधिकारी जेम्स डब्ल्यू पाल्सन म्हणतात, चीनच्या अधिकाऱ्यांनी शेअर्सच्या विक्रीत हस्तक्षेप केला. परिस्थिती यामुळेच बिघडली आहे. अवमूल्यनामुळे त्यांची परिस्थिती आणखी खराब होईल. मी सरळसरळ सांगू शकतो की, त्यांच्याकडे चलनाचे अवमूल्यन करण्याशिवाय मार्गच उरला नव्हता. एखाद्या देशाच्या चलनाचे अवमूल्यन होते तेव्हा उत्पादनावरील गुंतवणूक कमी होते. आमची समजूत आहे की, अशा स्थितीत गुंतवणूकदार काळजी घेतील. कारण काही विशेषज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, चीन आपल्या चलनाच्या विनिमय दरात सुधारणा करील. हे केव्हा पाहायला मिळेल याबाबत काही स्पष्टता नाही. तरीही अर्थव्यवस्था जास्त कमकुवत होण्याच्या स्थितीत येईल तेव्हाच चिनी अधिकारी असे करतील.