आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे आजार किंवा मृत्यू झाल्यास...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज रुग्णालयामध्ये किंवा एखादा रुग्ण बरा न झाल्यास किंवा त्याचा आजार बळावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईक, रुग्णालय किंवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दोष देतात. अशा अनेक प्रकरणांवर न्यायालयांनी सुस्पष्ट निर्णय दिले आहेत. जर डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवला असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे; परंतु कोणत्या बाबींना निष्काळजीपणा मानला जातो, याचा स्पष्ट फरक दर्शवला आहे. कोणत्याही प्रकारचा आरोप करण्यापूर्वी "मेडिकल निग्लिजन्स' म्हणजे निष्काळजीपणाचा अर्थ काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
"निग्लिजन्स' किंवा निष्काळजीपणा वा दुर्लक्ष शब्दाचा वापर न्यायशास्त्रात औद्योगिक क्रांतीच्या अाधीपासून वापरात आहे; परंतु हा शब्द औद्योगिक क्रांतीनंतरच जास्त प्रचलनात आला. तथापि या शब्दाचा अर्थ आपल्या कर्तव्याचे पालन न करणे, असा आहे. या व्याख्येत तीन गोष्टी येतात. एक, ज्याची तक्रार केली जात आहे, त्याने कायद्यानुसार आपल्या कर्तव्याचे पालन केले आहे का? दुसरी, केल्या जाणाऱ्या कर्तव्याचे उल्लंघन आणि तिसरी, उपेक्षा केल्याने झालेले नुकसान.
डॉक्टरी पेशापुरते बोलायचे झाल्यास, ही बाबत मानवतेशी संबंधित आहे. एखादा जखमी, आजारी पीडिताची सेवा करण्यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही. डॉक्टरी पेशात इतरांपेक्षा जास्त मान मिळतो; परंतु अलीकडच्या काळात ही मूल्ये कमी झाल्याचे आढळून येते. कित्येकदा उपचार आणि तपासणीमध्ये तक्रारी आढळून येतात. अशा प्रकारे अनेक डॉक्टरांविरोधात कोर्टात प्रकरणे चालू आहेत. अशा परिस्थितीत एक नवी शब्दावली तयार होते आहे. मेडिकल निग्लिजन्स म्हणजे चिकित्सकीय उपेक्षा. जो काेणी त्याच्याकडून कोणाची उपेक्षा, दुर्लक्ष किंवा चूक केली असेल तर त्याला मेडिकल निग्लिजन्स मानले जाते. यात उपचार एका मानकाचा स्तर खाली येतो. एखाद्या रुग्णास डॉक्टरमुळे आजार किंवा त्याच्या मृत्यूचे प्रमाण न्यायालयात गेले आहेत, त्यात बहुतांश प्रकरणांत डॉक्टरांची चूक आढळून येते.
आता लोक यासंदर्भात अधिक जागरूक झाले आहेत. हेल्थकेअर कन्झ्युमरिझम ही नवी संकल्पना रुढ होते आहे. मेडिकल निग्लिजन्सच्या कक्षेत हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सर्व प्रोफेशनल्सनासुद्धा या कक्षेत आणले गेले आहे. आरोग्याची तपासणी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्याला कोणत्या गोष्टी हव्या आहेत याची काळजी हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या प्रोफशनल्सनांसुद्धा घ्यावी लागणार आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एम. एस. चौगुले विरुद्ध जी. एम. टेलिकॉम प्रकरणात म्हटले आहे की, चिकित्सेचा व्यवसाय आणि त्याचे प्रोफेशनल्स, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कक्षेत आहेत. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने याला अधिक विस्तृत करत सक्षम बनवला आहे.

डॉ. लक्ष्मण बालकृष्ण जोशी विरुद्ध डॉ. त्र्यंबक बापू गोडबोले प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, डॉक्टराचे रुग्णाप्रति असलेले दायित्व स्पष्ट आहे. जी कोणी व्यक्ती एखादा वैद्यकीय सल्ला देते किंवा उपचार करते तेव्हा असे म्हटले जाते की, त्याला याचे ज्ञान आहे. तसेच कायदेशीरदृष्ट्या पात्र असतो. अशा प्रकारच्या कुशल लोकांची जेव्हा रुग्ण भेट घेतात तेव्हा ज्या व्यक्तीचा सल्ला घेतला जात आहे. त्याला उपचार कोणता करावा आणि कोणत्या प्रकारे देखभाल करणे गरजेचे आहे, याची माहिती त्यांना असते. रग्णांचे दायित्व सांभाळण्यात थोडीशी कमतरता जाणवल्यास रुग्णाकडे दुर्लक्ष केल्यावरून कारवाई करण्याचा अधिकार असतो.
प्रॅक्टिस करणाऱ्यांना त्या विधीचे प्रामाणिक ज्ञान असणे गरजेचे आहे. अचुतारो हरिभाऊ खोडवा विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मेडिकल प्रॅक्टिशनर्सची कुशलता प्रत्येक डाॅक्टरमध्ये वेगवेगळी असते. जर एखाद्या डॉक्टरने आपले कर्तव्यपालन करण्यात कुचराई केली नसेल तर न्यायालय त्याला उपेक्षा केल्याबद्दल दोषी मानू शकत नाही. जर मेडिकल प्रोफेशननुसार एखाद्या रुग्णावर उपचार केला आणि त्यानंतरही तो वाचू शकला नाही किंवा रुग्णासच हा आजार स्वत:मध्ये असलेल्या कमतरतेमुळे जडला असेल तर डॉक्टरला या प्रकरणी निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी मानता येत नाही.
स्प्रिंग मिडोज हॉस्पिटल अँड एएनआर विरुद्ध हरजोल अहलुवालिया अँड एएनआरच्या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयाने डॉक्टरांकडून केले गेलेले दुर्लक्ष आणि उपेक्षेसाठी काही नियम तयार केले आहेत.

१) सर्व वैद्यकीय कामकाजात जर एखादी चूक झाली असेल तर परिणामी दुर्लक्ष समोर येईल.
२) चुकीच्या औषधाचा वापर किंवा बेशुद्ध करताना चुकीचा गॅस वापरल्याने हाेणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रिन्सिपल ऑफ रेसिपा लोकुटुरंतर्गत ठेवण्यात येईल. रेसिपा लोकुटुर लॅटिन शब्द असून याचा संबंध डॉक्टरकडून केल्या गेलेल्या दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणाशी आहे.
३) जबाबदारी एकमेकांवर ढकलणे हे कारणसुद्धा काही परिस्थितीत निष्काळजीपणा मानला जाईल.

मेडिकल प्रोफेशन आता पूर्णपणे व्यवसायात बदलला गेला आहे. विनाकारण तपासणी, चुकीची औषधे, अनावश्यक ऑपरेशन संदर्भात खूप तक्रारी आहेत. वास्तविक वैद्यकीय व्यवसायात मानके बनवणे इतके सोपे नाही. तशात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सिद्ध करणे अवघड असते. कारण निष्काळजीपणा सिद्ध होत नाही. यामुळे कायद्यांतर्गत कारवाई करणे सोपे नसते.
जर एखाद्या डॉक्टरविरुद्ध तक्रार केली जात असेल तर खालील गोष्टींवर लक्ष देणे अावश्यक आहे. -
> जेव्हा एखादे रुग्णालय किंवा आरोग्यसेवा देणारा कोणाच्या उपचाराची जबाबदारी घेतो. तेव्हा ते त्या रुग्णालयातील डॉक्टरचे कर्तव्य असते.
> जर कोणती कुचराई झाली असेल व रुग्णालयाशी संबंधित सेवा देण्याबाबत दुजोरा देत नसेल.
> कुचराईमुळे रुग्णाचे शारीरिक नुकसान झाले तर हाच निष्काळजीपणा किंवा कुचराई याचे प्रमुख कारण समजावे.

नुकसान : विना नुकसान (मग ते पैशासंबंधी असो किंवा शरीरासंबंधात अथवा भावनात्मक) या अाधारावर तक्रार केली जाऊ शकत नाही किंवा वैद्यकीय सेवा देणाऱ्याने निष्काळजीपणा केला असे ठरवता येत नाही. नुकसान निष्काळजीपणा न करताही होऊ शकते. उदा. एखाद्याचा मृत्यू गंभीर आजाराने झाला असेल. थोडक्यात वैद्यकीय व्यवसायात निष्काळजीपणाचे प्रकरण जर वरील कोणत्याही दोन गोष्टींमुळे सिद्ध होत असेल तरच होऊ शकते.
(संदेश लॉ कॉलेज, मुंबई)
बातम्या आणखी आहेत...