Home | Editorial | Columns | editorial bird article

पक्ष्यांच्या स्वातंत्र्याची स्वप्ने

diyya marathi team | Update - Jun 04, 2011, 04:32 AM IST

पक्ष्यांना पिंजर्‍यता बंदिस्त करून ठेवणे म्हणजे त्यांच्या आकाशात उडण्यावर बंदी घालणे.

 • editorial bird article

  पक्ष्यांना पिंजर्‍यता बंदिस्त करून ठेवणे म्हणजे त्यांच्या आकाशात उडण्यावर बंदी घालणे. हे सरळ सरळ पक्ष्यांच्या जन्मसिद्ध अधिकारावर आक्रमण असून ते न्यायतत्त्वाला धरून नसल्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने दिला. या निर्णयाचे मी स्वागत करतो. कारण या निर्णयामुळे बंदिस्त असलेल्या हजारो पक्ष्यांना उडण्यास मोकळे आकाश मिळाले आहे. ते स्वातंत्र्याची नवी अनुभूती घेत आहेत. पक्ष्यांना पिंजर्‍यता बंदिस्त करण्यासंदर्भात माझी स्वत:ची एक भूमिका आहे. मला वाटते की, ज्या पक्ष्यांना एखाद्या घरात रोज दाणा-पाणी मिळत असेल किंवा तेथे त्यांची देखभाल होत असेल अशा घरात त्यांनी राहण्यास काहीच हरकत नाही. माझ्या परिचयातील अनेक व्यक्ती अशा आहेत की जे अनेक जातीचे पक्षी-प्राणी पाळत आहेत. याबाबत सांगायचे झाल्यास मी सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल लतीफ यांचे उदाहरण देईन. हैदराबादमध्ये एका आलिशान बंगल्यात लतीफ राहतात. त्यांच्या बेडरूमचा दुसरा दरवाजा थेट बागेत उघडतो. बागेत त्यांनी डझनभर तितर पाळले आहेत. सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी बागेत फेरफटका मारण्यासाठी ते येतात तेव्हा हे तितर त्यांच्या अवती-भवती येत असतात. मग ते त्यांना खाण्यास काहीतरी देतात. या तितरांवर आजूबाजूच्या बंगल्यांमधील मांजरांचा डोळा आहे. ते शिकारीच्या उद्देशाने बंगल्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण लतीफ यांनी तितरांच्या संरक्षणासाठी पिंजरे बांधले आहेत. तितरांचे खाणे-पिणे, फिरणे झाले की ते त्यांना पिंजर्‍यता नेतात. आपला मालक एवढय़ा प्रेमाने आपली काळजी घेतो, संरक्षण करतो याचा आनंद तितरांना किती होत असेल, हे सांगायला नको.
  असेच एक उदाहरण आहे ते माझे परिचित गृहस्थ आणि माजी आयएएस अधिकारी कमलनयन सिंह यांचे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर कमलनयन सिंह आपल्या पत्नीसोबत चंदिगड येथे राहतात. पण दर उन्हाळ्यात ते उत्तराखंडमधील कसौली येथे त्यांच्या बंगल्यात राहतात. या बंगल्यात त्यांनी चकोर, तितर आणि अनेक कुत्री पाळली आहेत. जेव्हा ते येथे येतात तेव्हा ते सर्व सुटी या पक्षी-प्राण्यांसोबत घालवतात. या बंगल्याची देखभाल एक नोकर करतो. पण या पक्ष्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतेही आक्रमण येथे केले जात नाही. किंबहुना कमलनयन सिंह येथे नसतानाही हे पक्षी आनंदाने या बंगल्यात राहतात. हे सगळं पाहिल्यावर माझ्या मनाला बरं वाटतं. गुजरात हायकोर्टाचा हा निकाल मी या नजरेतून बघतो. अत्यंत समजून-उमजून न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पक्षी आणि माणसाचं नातं सनातन आहे, गहिरं आहे. त्यामुळे पक्ष्यांचा विचार करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
  ना ईश्वर, ना स्वर्ग, ना नरक
  प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज हे 69 वर्षांचे आहेत. केम्ब्रिज विद्यापीठात ते शिकवतात. या जगात ज्या काही मोजक्या ‘जीनियस’ व्यक्ती आहेत त्यांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 21 वर्षांचे असताना त्यांना एका गंभीर आजाराने घेरले. त्या वेळी डॉक्टरांनी ते अधिक काळ जगू शकणार नाही, असे भाकीत केले होते. गेल्या वर्षी हॉकिंग्ज यांचे ‘द ग्रँड डिझाइन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात ते म्हणतात, गेली 49 वर्षे मी मृत्यूच्या शंकेने जगत आहे; पण मला मृत्यूचे भय नाही किंवा मला लवकर मरायचेदेखील नाही. एका पत्रकाराला मुलाखत देताना ते म्हणाले, ‘माझा ईश्वर, स्वर्ग, नरक या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही.’

  हॉकिंग्ज यांच्या म्हणण्यात तसे नवे काही नाही. कारण 200 वर्षांपूर्वी मिर्झा गालिब यांनीही असेच काहीसे म्हटले होते,
  ‘हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन,
  दिल को खुश रखने को गालिब
  ये खयाल अच्छा है!’
  याचा अर्थ असा की, स्वर्ग नाही याची मला खात्री आहे; पण मनाला थोडासा दिलासा, खुश करण्यासाठी ‘स्वर्ग असणे’ हा विचार चांगला आहे.
  एक उर्दू शायरदेखील असे म्हणतो,
  हकायत-ए-हस्ती सुनी तो दरमियां से सुनी,
  ना इब्तिगा की खबर है
  ना इंतिहा मालूम !
  याचा अर्थ आपण जे ऐकलं आहे ते केवळ ऐकलं आहे. पण त्याचा प्रारंभ किंवा अंत आपल्याला माहीत नाही.
  जेव्हा मी लिहिणे सुरू केले, तेव्हापासून मी असेच काहीतरी लिहीत आलो आहे. माझे जे मित्र जीवन आणि मृत्यू या गूढ प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असतात. त्यांना मी म्हणतो, अज्ञानाला स्वीकारा. मला जीवन-मृत्यूबाबतची उत्तरे माहीत नाहीत, असे जाहीर करून टाका.
  माझे तुझ्यावर प्रेम आहे
  काही दिवसांपूर्वी पत्नी सविंदरसोबत मी एका पबमध्ये गेलो होतो. स्कॉचचे काही पेग रिचवल्यावर मी तिला म्हणालो, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे.’
  सविंदरने हे ऐकल्यावर मला उत्तर दिले नाही; पण उलट प्रश्न विचारला. ‘हे तू बोलतो आहेस की स्कॉच बोलत आहे?’
  सविंदरच्या अशा अनपेक्षित हल्ल्यानंतर मी जरा सावध झालो आणि विचारात पडलो; पण लगेचच तिला उत्तर दिले, ‘सविंदर, मीच बोलत आहे. पण, हे मी तुला उद्देशून नाही तर स्कॉचला उद्देशून बोललो आहे.’

  खुशवंत सिंग

Trending