आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमेद वाढवणारे यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाने अल्पावधीत आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली. २४ वर्षांनी इंग्लिश भूमीत इंग्लंडविरोधात वनडे मालिका जिंकत इतिहास घडवून टीकाकारांची तोंडेच बंद केली.
सध्या सुरू असलेल्या इंग्लंडच्या दौऱ्यात कसोटी क्रिकेट मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीयाच्या कामगिरीवर यथेच्छ टीका करणाऱ्यांना एजबॅस्टन वनडे व अन्य वनडेंमधील भारताचा विजय पाहता क्रिकेट किती बेभरवशाचे आहे याचे भान आले असेल. अगदी काही दिवसांपूर्वीच लॉर्ड््सवरील सामना वगळता अन्य कसोटी सामन्यांतील धोनी व त्याच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास ढेपाळलेला दिसत होता. सलग पाच दिवस खेळून जिंकण्याची ईर्षाच हरवलेला हा संघ वनडे मालिकेतही सुमार खेळ करून नांगी टाकेल असे वाटले होते. पण घडले उलटेच. याच खेळाडूंनी आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा करत २४ वर्षांनी इंग्लिश भूमीत इंग्लंडविरोधात वनडे मालिका जिंकत इतिहास घडवून टीकाकारांची तोंडेच बंद केली. याबद्दल संघाचे अभनिंदन करावे लागेल. कारण बहुतांश क्रिकेट समीक्षकांनी भारतीय संघातील खेळाडूंच्या वाईट कामगिरीचे खापर खेळाडूंच्या वर्तनावर, बीसीसीआयच्या कारभारावर फोडले होते. पण आता वनडे मालिकेतील निखळ विजय कोणत्या भूमिकेत पाहायचा हे समीक्षकांना ठरवावे लागेल. खरे तर धोनीच्या संघातील अनेक खेळाडूंचा इंग्लंडमधील हा पहिलाच दौरा होता. त्यांना इंग्लंडमधील हवामान, खेळपट्ट्या यांची ओळख नसल्याने चुका होणारच होत्या आणि त्या झाल्याही. पण अखेर कोणत्याही खेळाचे विशिष्ट तंत्र असते व शेवटी त्याचा आधार घ्यावाच लागतो. एजबॅस्टन वनडे व अन्य वनडेमधील निर्विवाद विजय हे भारतीय खेळाडूंच्या तंत्रशैलीचे यश आहे. सातत्याने होणारे आयपीएल सामने, वनडे मालिका खेळून भारतीय संघ एखाद्या यंत्रमानवासारखा झाला आहे. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, रायडू, जाडेजा, शमी, अश्वनि, रैना हे खेळाडू वनडे सामन्यांमध्ये नैसर्गिक खेळ करत असतात. त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता एखाद्या पराभवामुळे प्रश्नांकति करण्याची घाई आपल्याकडे अाहे. पण आता इंग्लिश भूमीतील यश निश्चतिच भारतीय संघाला उमेद देणारे आहे. वनडे क्रमवारीत संघाचे अव्वल स्थान आहेच व या स्थानाला साजेशी अशी कामगिरी भारतीय संघाने केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवरची ही उमेद वाढवणारी कामगिरी आहे.