आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक समुपदेशन -काळाची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतत परीक्षा आणि स्पर्धा, शाळा व क्लासेसमुळे खेळ खेळायला बंदी, पालक मार्कावर देत असलेले टोमणे, मित्र आणि मैत्रिणींमध्ये सतत केली जाणारी तुलना यामुळे या नव्या उत्साही पिढीचे खच्चीकरण होत आहे.
समाजाचा सुसंवादी ताल सांभाळण्यासाठी बालके आणि किशोर वयोगटातील मुलामुलींच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जीवनातल्या विविध स्तरांवर गुंतागुंत वाढलेली असताना एक प्रचंड ऊर्जा घेऊन नवी पिढी एकविसाव्या शतकात पाऊल टाकत आहे. पण सतत परीक्षा आणि स्पर्धा, शाळा व क्लासेसमुळे खेळ खेळायला बंदी, पालक मार्कावर देत असलेले टोमणे, मित्र आणि मैत्रिणींमध्ये सतत केली जाणारी तुलना यामुळे या नव्या उत्साही पिढीचे खच्चीकरण होत आहे. पूर्व प्राथमिक गटापासून वेळेपूर्वीच प्रौढत्वाची समज आलेली असते. केवळ मुलांच्या मानसशास्त्राचा प्रश्न नसून शरीरविज्ञानीय तसेच मानस शरीर विज्ञानीय,असे त्याचे स्वरूप आहे. म्हणून बालक मार्गदर्शन केंद्रे अधिक सजग होणे महत्त्वाचे आहे. पालक-विद्यार्थी आणि समुपदेशक यांच्या संवाद आणि कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करून त्याचे श्रवण आणि चिंतन होणे महत्त्वाचे आहे.
मुलांना जीवनातील उत्कृष्टपणाकडे नेण्यासाठी त्यांच्यातील भावनिक मूल्यांशी संपर्क ठेवत सुसंवाद आणण्यासाठी कोणता मार्ग उपलब्ध आहे? आमची कुटुंबे एकत्रित कुटुंबापासून ते छोट्या आणि
न्यूक्लियर स्थितीकडे जात आहेत. आई-बाबा आणि दादा-ताई ही नियंत्रित कुटुंबाची संकल्पना आहे. पण बर्‍याच ठिकाणी तिचे स्वरूप केवळ आई वडिलांपैकी एक आणि दादा-ताईपैकी एक असे झाले आहे. त्यामुळे आधुनिकीकरणात आपण जागतिक झालो आहोत आणि कौटुंबिक पातळीवर एकाकी झालो आहोत. त्यामुळे समुपदेशनाची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. तळहातावरच्या मोबाइलभोवती आमचे कौटुुंबिक जीवन प्रदक्षिणा घालत आहे. बौद्धिक कसोट्यांच्या वेगात भावनिकदृष्ट्या संस्कारमुक्त बनलो आहोत. हे होऊ नये म्हणून विद्यार्थी -पालक संस्कार शिबिराचे आयोजन केले जाणे महत्त्वाचे आहे.