आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात काैटुंबिक हिंसाचाराला सशर्त मान्यता, संसद सदस्य म्हणाले, पारंपरिक मूल्यांना अनुरूपच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय, पतीने स्वत:च्या पत्नीला केलेली मारहाण हा गुन्हा अाहे? अनेक देशांमध्ये या विषयावर वादंग हाेण्याचे काही कारण उरलेच नाही. मात्र रशिया त्यास अपवाद ठरला असून संसदेतील (ड्युमा) सदस्यांनी या अाठवडाभरातच काैटुंबिक हिंसाचाराला सशर्त मंजुरी दिली. त्यातील अट म्हणजे, अशी मारहाणीची घटना पुन्हा घडू नये, तसेच गंभीर स्वरूपाची किंवा शारीरिक नुकसान उद्भवू नये अशी ठेवण्यात अाली. अर्थातच हे परिवर्तन म्हणजे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकार परंपरावादाकडे झुकत चालले असल्याचे द्याेतक ठरते.

काैटुंबिक हिंसाचाराला मान्यता दिल्यामुळे कुप्रथांना वैधता मिळेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला. इथे अन्ना सेंटर ही संस्था हिंसाचार राेखण्यासाठी काम करते. या संस्थेचे अांद्रेई सिनेलनिकाेव म्हणाले, या माध्यमातून रशियन नागरिकांमध्ये हा संदेश जाईल की, काैटुंबिक हिंसाचार हा गुन्हा नाही. या मुद्यावर २०१६ साली चर्चा सुरू झाली हाेती. त्यावेळी कमी हिंसक स्वरूपाच्या ‘बॅटरी’ हल्ल्याला गुन्ह्याच्या यादीतून वगळले हाेते. युराेप अाणि मध्य अाशियातील तीन देशांमध्ये रशिया सामील अाहे. जिथे काैटुंबिक हिंसाचाराविरुद्ध विशेष असा कायदा नाही. मागच्या वर्षी संसद सदस्यांनी ‘बॅटरी’ला गुन्हा न ठरवता काैटुंबिक हिंसाचारप्रकरणी दाेन वर्षाची शिक्षा कायम ठेवली हाेती. 

त्यामुळे नागरिक सुखावले हाेते. परंतु रशियन प्रतिगामी चर्चने कडवा विराेध केला. तर पुराेगामी गटांचा युक्तिवाद असा की, अापल्या मुलांना मारहाण करणाऱ्या माता-पित्यांना कठाेर दंड करणे चुकीचे ठरेल. विविध प्रकारच्या गटांकडून येणाऱ्या दबावाखाली हे विधेयक सादर केले गेले. त्यात अधिक नुकसान न पाेहाेचवणाऱ्या (बॅटरी) घटनेसाठी ३० हजार रुबल दंड, समाजसेवा किंवा १५ दिवसांचा कारावास अशी शिक्षेची तरतूद करण्यात अाली. याप्रकरणी पीडित व्यक्तीवर पुरावे सादर करण्याची तसेच गुन्हा समाेर अाणण्याची जबाबदारी टाकण्यात अाली असून काैटुंबिक हिंसाचाराची पहिली घटना घडल्यानंतर वर्षभरातच पुन्हा असा प्रकार घडला तर फाैजदारी खटला चालवता येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...