आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fareed Zakaria Article About America Tea Party, Divya Marathi

अमेरिकेत टी पार्टीचा अडेलतट्टूपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी-कधी मला मध्यमार्गी म्हटले जाते. बुद्धिमत्ता किंवा गुणांवर राजकारणातील दोन्ही गटांपैकी कोणाचीही मक्तेदारी नाही. परंतु अनेकदा वस्तुस्थिती कोणत्या तरी एकाच बाजूच्या दिशेने झुकते, असेही कधी-कधी होते, त्यावरून यात नेमका कोणता राजकीय पक्ष दोषी आहे, हा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.

नागरिकत्व बहाल करण्याच्या मुद्द्यावर काय झाले? या वादावर तोडगा शक्य आहे. बहुसंख्य अमेरिकन नागरिक अवैध मार्गाने देशात आलेल्या व्यक्तींना नागरिकत्व बहाल करावे या मताचे आहेत; परंतु यासाठी काही मापदंड अशा लोकांना पूर्ण करण्याची अट घातली जावी. सीएनएनच्या ताज्या जनमत सर्वेक्षणात 81 टक्के अमेरिकी नागरिकांनी याला पाठिंबा दिला. सीमेवर गस्तयंत्रणा मजबूत करावी, असे मतही त्यांनी नोंदवले. अमेरिकेच्या दोन्ही सदनांत रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाने सुधारणांच्या व्यापक पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजनुसार नागरिकत्व प्रदान करण्यासाठी 13 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी निश्चित करण्यात आला. याला कार्यान्वित करण्यासाठी सक्तीने पावले उचलणे गरजेचे आहे. याला डेमोक्रॅट पक्षाचेही समर्थन आहे.

रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाला पूर्ण जाणीव आहे की, टी पार्टीतील रिपब्लिकन्स याला मंजुरी देणार नाहीत. विरोधी पक्षातील सगळे रिपब्लिकन्स बराक ओबामा प्रशासनावर टीका करण्याची संधीच शोधत असतात. त्यामुळे 30 जानेवारीला या पार्टीच्या नेत्यांनी नागरिकत्व बहाल करण्याच्या सर्व शक्यता रद्द करण्याचा नवा प्रस्ताव संमत केला. या लोकांनी नागरिकत्वासाठी किती काळ प्रतीक्षा केली याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना केवळ काम करणे आणि कर भरण्याची कायदेशीर कागदपत्रे प्रदान करण्यात येतील. टी पार्टी (हा राजकीय पक्ष उजव्या आणि लोकानुनयी धोरणांचा पुरस्कार करणारा पक्ष आहे.) आंदोलनकर्त्यांनाही ही फार मोठी संधी आहे. पण यामुळे मार्गातील अडथळे दूर होतील असे वाटत नाही. कायमस्वरूपी दुहेरी नागरिकत्व देण्यासाठी डेमोक्रॅट सहमत नाहीत. बहुसंख्य अमेरिकन नागरिकही याचा विरोध करत आहेत.

सीएनएनच्या जॅक टेपर यांच्याशी झालेल्या संवादात बराक ओबामांनी या प्रस्तावाला मान्यता देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘सभापती जॉन बोहेनर आणि पॉल रायनसारखे प्रतिनिधी नागरिकत्व बहाल करण्याच्या मुद्द्यावर एक सक्षम विधेयक असावे, या मताचे आहेत.’ प्रस्तावाविषयी वैयक्तिक प्रतिक्रिया विचारली असता ओबामांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘माझ्या टेबलवर काय येणार आहे यासंदर्भात आत्ताच अनुमान काढणे कठीण आहे.’ डेमोक्रॅटिक पक्षातील बर्‍याच लोकांना नैतिक वा राजकीय कारणांसाठी हा प्रस्ताव मान्य नाही. ओबामांच्या औदार्यामुळे ते चकितच झाले आहेत. जॉन बोएनर काही दिवसांनी म्हणतीलही नागरिकत्व बहाल करण्याविषयीचे विधेयक पूर्णपणे रद्द झाले आहे. याचे जनतेलाही आश्चर्य वाटायला नको.

ओबामा प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करेलच यावर त्यांचा विश्वास नाही; परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की, ओबामा प्रशासन नागरिकत्व कायदा अमलात आणण्याच्या इच्छाशक्तीने कामाला लागले आहे. 2012 मध्ये त्यांनी चार लाखांपेक्षा अधिक लोकांची स्वदेशी रवानगी केली. 2002 च्या तुलनेत ही संख्या अडीच टक्क्यांहून जास्त आहे. 2002 मधील प्रक्रियेदरम्यान प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीमागे 13 लोकांना वैध नागरिकत्व बहाल करण्यात आले होते; परंतु 2012 मध्ये हेच प्रमाण 2:5 असे होते. ओबामा प्रशासनाच्या या सक्तीच्या अंमलबजावणीमुळे आणि मंदीने अवैध मार्गाने अमेरिकेत येणार्‍यांची संख्या वाढली नाही. याविषयीची व्यापक माहिती ‘न्यूयॉर्क’ मासिकाचे डॅन एमिरा यांनी संकलित केली आहे. यानुसार ओबामांनी कार्यकारी अध्यादेश काढून ते अमलात आणले आहेत.

भारतात केंद्र प्रशासनाने अध्यादेश क रण्यासारखाच तो अध्यादेश आहे. कर्जवितरणाची मर्यादा नव्याने बदलल्याने स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. हार्वर्ड युनिव्हर्र्सिटीच्या स्काचपोल डेमोक्रसी पत्रिकेत प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधातील काही मुद्दे लक्षवेधी आहेत. टीकाकार अनेक वर्षांपासून टी पार्टी संपुष्टात येईल असे म्हणत आहेत; परंतु रिपब्लिकन पार्टीतील सदस्यांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे बहुजनांचा पाठिंबा आणि रिपब्लिकन पार्टीत कोणतीही एकाधिकारशाही नसणे.

स्कॉचपोलच्या आणि वॅनेसा विल्यम्सने टी पार्टीवर पुस्तक लिहिले आहे. यादरम्यान शेकडो मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या. आर्थिक रूढिवादी मानसिकता असल्याने बहुजनांमध्ये टी पार्टीविषयी आस्था आणि विश्वास आहे, असे भासवले जाते. परंतु वास्तविकता तशी नाही. अवैध मार्गाने अमेरिकेत येणार्‍यांवर कठोर कारवाई, डेमोक्र ॅट्सचा विरोध आणि खर्च कपात यामुळे टी पार्टीला तळागाळातून सुरक्षितता, आरोग्यसेवा, ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणार्‍या सुविधा या सगळ्यांचे ते लाभार्थी आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट केल्यामुळे एक अमेरिकन नागरिक म्हणून आपला हक्क असल्याची त्यांची भूमिका आहे. या सर्व विविध भूमिका पाहता अमेरिकेने महत्त्वाचा निर्णय घेणे अशक्य वाटते आहे. नागरिकत्वाचा मुद्दा आता अशा स्तरावर गेला आहे की, वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारून त्यामध्ये सुधारणा करण्यात आली पाहिजे. अमेरिकन जनता यावर सहिष्णू आहे. कायदे कसे अमलात येतील ते पाहिले पाहिजे. अमेरिक न चेंबर ऑफ कॉमर्सने याला समर्थन दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञान कंपन्या तर या विधेयकासाठी उतावीळ झाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे नेते विधेयकाच्या बाजूने आहेत, तरी ही समस्या केवळ काही टोकाची भूमिका घेणार्‍या रूढिवादी लोकांमुळे निर्माण झाली आहे.
फरीद झकेरिया
(लेखक ‘टाइम’ मॅगेझिनचे संपादक आहेत. )