आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांवर ट्रम्पसंबंधी बातम्यांचा भडीमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुका नसतानाही एखाद्या व्यक्तीचा माध्यमांमध्ये किती प्रचार होऊ शकतो हे पाहण्यासाठी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे उदाहरण घेता येईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जवळपास सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत असतात. दैनिके, न्यूज चॅनल असो वा नियतकालिके.. माध्यमांनी त्यांना दूर ठेवण्याचे ठरवले तरी ते शक्य नाही. कारण प्रत्येक माध्यमांत ट्रम्प यांनी कायमची जागा व्यापली आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते दिसतातच.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी अनेकांना खूप काही माहीत असेल. यात आणखी एक सत्य म्हणजे इतिहासात सर्वाधिक चर्चित व्यक्ती अशी ट्रम्प यांची ओळख असेल. ट्रम्प यांनी जवळपास सर्व माध्यम प्रकाशनांमध्ये स्वत:ची कायमची जागा मिळवली आहे. या प्रकाशनाचा राजकारणाशी काही संबंध असो वा नसो. माझंच उदाहरण घेतो. आठवडाभरापासून मी ट्रम्प यांच्या बातम्यांपासून दूर राहण्याचे ठरवले होते तरीही ट्रम्प यांचा उल्लेख नसलेली एकही बातमी मला दिसली नाही. 

सध्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून खूप विचित्र आणि धक्कादायक बातम्या येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल टी. फ्लेन यांचा राजीनामा आणि नवे कामगारमंत्री अँड्रयू एफ. पुज्डर यांच्यासाठी मोठी समस्या उभी करणारी ऑपेरा विन्फ्रेच्या शोमधील टेप. विन्फ्रे यांच्या टीमने ही टेप अमेरिकेच्या संसदेकडे पाठवली आहे. यात श्रममंत्र्यांच्या पत्नीने आपल्याला घरी मारले जाते हे कबूल केले आहे. मी बातम्यांपासून दूर राहू शकत नाही. मी ऑनलाइन न्यूज वर्ल्डवर खूप वेळ घालवला.
 
ट्रम्प नसलेल्या बातम्या शोधण्यासाठी भरपूर शक्ती पणाला लावली. आजच्या वृत्त माध्यमांमध्ये काही नवे शिकण्यासारखे मिळते का, हे मला पाहायचे होते. पण माझा हा प्रयत्न एक प्रकारे अपयशी ठरला. पूर्णपणे ट्रम्पमुक्त असलेले एकही माध्यम मला सापडले नाही. या एकाच व्यक्तीचे एवढे कव्हरेज होत आहे की, यामुळे बाकीच्या बातम्या झाकोळून गेल्या आहेत. याचे एकमेव आणि मुख्य कारण म्हणजे सोशल मीडिया. 

एखादी गोष्ट एवढी रंगवून सांगितली जाते की जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलीच पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे कव्हरेज जास्त असले पाहिजे हे मान्य, पण त्याच्या ‘ओव्हरडोस’मुळे इतर गोष्टी मागे पडू नयेत हेही तितकेच खरे. आजही मी ट्रम्प यांचे नाव नसलेल्या बातम्यांच्या शोधात असतो. चुकून त्यांचा उल्लेख असलेली बातमी दिसली तरी मी लगेच स्क्रोल डाऊन करून ट्रम्पविरहित बातम्या वाचतो. मी युरोपातील प्रसिद्ध ठिकाणे किंवा विज्ञान, अर्थकारणाविषयीच्या वेबसाइट पाहतो. डिग किंवा रेडिटच्या साइट्स पाहतो. पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या राजीनाम्याची बातमी दुर्लक्षित करू शकलो नाही.  
 
बातम्याच नव्हे, तर इतर कार्यक्रमांतही ट्रम्प यांनी जागा व्यापली आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्येही ट्रम्प किंवा त्यांच्याविरोधात संदेश दिसतात. आता उरले होते फक्त पुरस्कार वितरण सोहळे. ग्रॅमी किंवा गोल्डन ग्लोब. तिथेही ट्रम्प-ट्रम्प-ट्रम्प. मग स्पोर्ट््सकडे वळलो. तिथेही एनबीए टुर्नामेंटमध्ये ट्रम्प. सुपर बॉलमध्ये ट्रम्प. स्नॅपचॅट किंवा इन्स्टाग्रामवर ते नसतील असे वाटले. पण तिथेही आहेतच. ऑनलाइन रिटेल स्टोअरदेखील ट्रम्प यांच्या नावाची उत्पादने खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.  

ओबामा-क्लिंटन यांच्यापेक्षाही पुढे अमेरिकेतील इतर अध्यक्षदेखील चर्चेत राहिलेले आहेत. मात्र जिवंतपणी एवढे चर्चेत राहण्याचा मान ट्रम्प यांनाच दिला पाहिजे. आता प्रख्यात आणि कुख्यात अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींची यादी करूयात. बराक ओबामा, ओसामा बिन लादेन, बिल क्लिंटन, रिचर्ड निक्सन, मायकल जॅक्सन, मुहंमद अली किंवा अॅडॉल्फ हिटलर इत्यादी. या सर्वांपेक्षा ट्रम्प यांचे माध्यमांवर अधिक वर्चस्व आहे. 
 
ब्लॉगपासून ट्विटरपर्यंत, इव्हिनिंग न्यूजपासून द न्यूयॉर्क टाइम्सपर्यंत मीडिया कंटेंटचा डेटा गोळा करणारी मीडियाक्वांट ही संस्था प्रत्येक विषयाच्या सामग्रीची तुलना जाहिरातींशी करते. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी या संस्थेचा विक्रम मोडीत काढला. या महिन्यात ट्रम्प यांचे कव्हरेज ५,५५५ कोटी रुपयांएवढे होते. कंपनीचे प्रमुख विश्लेषण अधिकारी पॉल सेनाटोरी यांच्या मते, मागील चार वर्षांतील एकाही महिन्यात एखाद्या व्यक्तीचे सर्वाधिक कव्हरेज एवढे नव्हते. त्याच चार वर्षांत ओबामा यांच्या कव्हरेजचे एका महिन्याचे मूल्य १,३६० कोटी ते ३,४०० कोटी रुपये एवढे होते, तर हिलरी क्लिंटन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान जुलै २०१६ मध्ये सर्वाधिक २,९२४ कोटी रुपयांचे कव्हरेज मिळवले होते. व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचा फुटबॉलर टॉम ब्रॅडी आणि किम कर्दाशियन यासारख्या व्यक्तींचे मीडिया कव्हरेज (ट्रम्प आणि त्यानंतर ओबामांचे वगळता) तुलनेने खूप मागे आहे. मागील महिन्यात या १००० व्यक्तींचे एकूण कव्हरेज ४,९०२ कोटी रुपयांपर्यंत होते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे खरोखरच इतिहासातील असामान्य राष्ट्राध्यक्ष आहेत हेच म्हणावे लागेल.
 
बातम्या आणखी आहेत...