आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक समस्यांमुळे अमेरिकेला चिंता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांची आकलनशक्ती तपासणार्‍या पीसा (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) चाचणीचे ताजे निष्कर्ष हाती आले आहेत. त्यात अमेरिकेची कामगिरी फारशी चांगली नव्हती, असे दिसून आले आहे. प्रा. जे. ग्रीन यांनी सांगितल्याप्रमाणे या चाचण्या रोरशाक या स्विस मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या चाचण्यांसारख्याच आहेत. या चाचणीत शाईच्या ठिपक्यात व्यक्तीला आकलन झालेल्या चित्रावरून तिच्या व्यक्तित्वाचे विश्लेषण केले जाते. पीसा चाचणीमध्ये लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे चित्राची कल्पना करतात. शिक्षणात नैपुण्य दाखवणार्‍या कोणत्याही देशाने अमेरिकेसारखा या चाचणीचा ध्यास घेतलेला दिसून येत नाही, असे अमेरिकन फेडरेशन आॅफ टीचर्सच्या रँडी वँगर्टन यांनी म्हटले आहे. कोणीही या निर्णयाप्रत कसा काय पोहोचू शकतो हे समजणे मात्र अवघड होऊन बसले आहे. गणित, विज्ञान आणि लिहिलेले वाचणे या तिन्ही प्रकारात पहिल्या चार क्रमांकांवर शांघाय (चीन), सिंगापूर, हाँगकाँग, तैवान किंवा जपानी विद्यार्थीच होते. जगभराच्या तुलनेत कदाचित या देशांमध्ये सर्वाधिक चाचणी केंद्रित व्यवस्था अस्तित्वात आहे.
पीसा चाचणी घोकंपट्टीवर आधारित नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील अडचणी सोडवण्याच्या योग्यतेवर केंद्रित आहे, हाच खरा चिंतेचा विषय आहे. (मी स्वत:ही एक नमुना चाचणी दिली आहे. तुम्ही सुद्धा http: // www.oecd.org/pisa/test या संकेतस्थळावर जाऊन तुमची योग्यता तपासू शकता.) अमेरिकेतील शाळकरी मुले शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित व पारंपरिक धाटणीच्या टीम्स (ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स अँड सायन्स स्टडी) सारख्या अन्य प्रमुख आंतरराष्ट्रीय चाचण्यात चांगली कामगिरी करतात, ही वस्तुस्थिती आहे. दक्षिण कोरिया किंवा जपानच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शिकवण्याची अमेरिकी पद्धत रट्टेघाशीवर जास्त आधारित आहे, असा तर याचा अर्थ नाही ना? विचारसरणी आणि वैयक्तिक स्वार्थ या गोष्टी बाजूला ठेवून या बाबींची तटस्थपणे मीमांसा केली तर अमेरिकेला घाबरून जाण्याचे कारण नसले तरी चिंता करण्यासारखी स्थिती नक्कीच आहे.
शिक्षणात उत्कृष्टता हे राष्ट्रीय यशाचे एकमेव सूत्र नाही, हे येथे आधी स्पष्ट केले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या टीकाकार डायन रॅविच यांनी अमेरिके ने आंतरराष्ट्रीय परीक्षा आणि चाचण्यांत खूपच चांगली कामगिरी कधीच केलेली नाही, तरीही अमेरिकन अर्थव्यवस्थेने अशा चाचण्यांत भरपूर गुण मिळवणार्‍या देशापेक्षाही सरस कामगिरी के ली, असे अधोरेखितच करून ठेवले आहे. का? तर अमेरिकेची विलक्षण लवचिक मुक्त अर्थव्यवस्था, नवे शोध आणि उद्यमशील परंपरा, गतिशील समाज आणि बाहेरून आलेले विद्वत्जन आणि कार्यसंस्कृतीचा फायदा मिळतो. अमेरिकेचे हे सामर्थ्यच या चाचण्यांतील सुमार कामगिरीला वरचढ ठरते. याशिवाय अर्थव्यवस्थेत उत्साह आणि नवी झळाळी आणण्यासाठी उच्च शैक्षणिक गुणवत्तेच्या फारच थोड्या लोकांची गरज भासते, हे अनेकदा सप्रमाण सिद्ध झाले आहे. कोणत्याही देशातील आघाडीच्या पाच टक्के लोकांच्या आर्थिक संपन्नतेचा आणि बुद्ध्यांकाचा संबंध असल्याचे या क्षेत्रातील नामवंत हायनर रीडरमॅन आणि जेम्स थॉमसन यांनी केलेल्या संशोधनांत आढळून आले आहे. ड्यूक विद्यापीठाचे जोनाथन वाय यांचा निष्कर्ष असा की, अमेरिकेचे क्षेत्रफळ विस्तीर्ण असल्याकारणाने येथील आर्थिक व उद्योगातील आघाडीवर असलेले एक टक्क ा लोकही आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव पाडू शकतात.
अमेरिकेने बौद्धिक संपदा तयार करताना आपल्या देशातील एक टक्का व उर्वरित जगातील एक टक्का लोकांना आकर्षित केले आहे. या बौद्धिक संपदेच्या जोरावर अमेरिकेने नव्या सुधारणा, आर्थिक विकास आणि देशाला सर्वच क्षेत्रांत गती दिलेली आहे. बौद्धिक संपदा हे अमेरिकेच्या आर्थिक विकासाचे इंजिन आहे, तरीही अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर असलेला मध्यमवर्ग आणि त्याखालोखाल असणार्‍या कमी उत्पन्न गटातील लोकांचे उत्पन्न गेल्या तीन दशकांपासून स्थिर आहे. त्याला कारण तंत्रज्ञानामधील प्रगती आणि जागतिकीकरणामुळे कमी होत चाललेले मध्यमवर्गाच्या नोकरीचे प्रमाण हे आहे. त्यामुळे अमेरिकेतील परिस्थिती हलाखीची होत चालली आहे.
या चाचणीचे खरे मूळ कारण ‘राइज आॅफ रेस्ट’ म्हणजे समाजातील उर्वरित गटाच्या उत्थानात आहे. गेल्या काही दशकापासून अमेरिकेची स्थिती याबाबतीत कमकुवत झाली आहे. परिस्थितीत घसरण झालेली नसली तरी सुधारणाही झालेली दिसत नाही. यादरम्यान दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसारखे देश वेगाने आगेकूच करत आहेत. आता चीन, व्हिएतनाम आणि पोलंड या देशांची कामगिरीही चांगली ठरत आहे. या देशांमध्ये कामगारांच्या प्रगतीचा मेळ हा त्यांना मिळणार्‍या शैक्षणिक संधीशी निगडित आहे. कामगारांकडून वाढणारे उत्पादन हे त्यांना मिळणार्‍या कौशल्यावर अवलंबून असते. याला कारणे अनेक आहेत, पण स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास अमेरिकेच्या विरोधात जिंकण्यासाठी हे देश ईर्षेने खेळत आहेत. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनांच्या मते शांघाय आणि मॅसाच्युसेट्स (अमेरिकेत सर्वाेत्तम कामगिरी करणारे राज्य) या दोन शहरांदरम्यान फरक हा अमेरिकेतील दोन वर्षांच्या शालेय गणितातील फरकाएवढा आहे. दीर्घकालीन शालेय शैक्षणिक अभ्यासक्रम शिकणारा शांघायचा मुलगा जेव्हा 15 वर्षांचा होतो तेव्हा त्याने अमेरिकेच्या 15 वर्षांच्या मुलांच्या तुलनेत दोन वर्षे अधिक खर्च केलेले असतात. बराक ओबामा यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, अमेरिकी समाजाचे स्थिर असलेले उत्पन्न ही देशापुढची खरी समस्या आहे. सध्याची परिस्थिती पाहता कॅनडा आणि युरोपच्या तुलनेत अमेरिकन नागरिकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढण्याची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक संधी नव्याने निर्माण करणेच योग्य ठरेल. तुम्ही किती खर्च करता त्यावरून तुमची कामगिरी कशी राहते हे कळत नाही, हे विविध चाचण्यांद्वारे सिद्ध झाले आहे. अमेरिकेत सगळ्यात जास्त खर्च केला जातो त्या तुलनेत आशियाई देशात खर्च कमी असतो. साधारणपणे अमेरिकेत सर्वात हुशार आणि सर्वात ‘ढ’ विद्यार्थ्यात मोठा फरक आहे. सर्व सुविधांपासून वंचित असणार्‍या विद्यार्थ्यांवर सर्वात कमी पैसा खर्च केला जातो, त्याच्याकडे दुर्लक्ष होते, ही यादृष्टीने भूषणावह बाब नव्हे. चांगली कामगिरी करणारे बहुतांश देश गरीब विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. त्यांच्याकडे लक्षही पुरवत आहेत. स्थानिक उत्पन्नाच्या करातूनच अमेरिका शिक्षणावर खर्च करते, हेच यामागचे कारण आहे. त्यामुळे उत्पन्नाचे थांबलेले चक्र ही समस्या वाढवते आहे. आघाडीवर असणारे 1 टक्का लोक देशाला पुढे नेण्यासाठी आर्थिक वृद्धीदर कायम ठेवतील अशी शक्यता आहे. परंतु आर्थिक उत्पन्न थांबलेल्या अवस्थेत असणार्‍या मध्यम वर्गाच्या बोजामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याचीच शक्यता जास्त आहे. अमेरिकेत छोटे व बडे भांडवलदार वर्ग ते अर्धकुशल व कमी उत्पन्न गटातील लोक किंवा ज्यांना प्रगतीची आस नाही यांच्यातील संघर्ष हाच खरा अमेरिकेच्या राजकारणातील बृहद प्रश्न आहे.