आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Critic Jay Prakash Choukse Articles About Shah Rukh Khan's

शाहरुख खानच्या "मन्नत' बंगल्यावर गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानचा "मन्नत' बंगला एकेकाळी ऐतिहासिक वारशांसाठी प्रसिद्ध असलेली इमारत होती. त्याने हा बंगला इतक्या महाग किमतीत विकत घेतला की, त्याची ऐपतही तेवढी नसावी. परंतु त्याने धाडस केले आणि आज घराच्या किमती इतक्या गगनाला भिडत चालल्या आहेत की, शाहरुख खानलाही हा बंगला विकत घेणे कदाचित शक्य होणार नाही. शाहरुख खानने मुंबईत सुरुवातीच्या काळात तो बेघर असताना उपाशी राहून दिवस काढले आहेत, हे सर्वांना ज्ञात आहेतच. त्याने कदाचित "आबुदाना ढूंढते हैं, अाशियाना ढूंढते हैं' हे गाणेही गुणगुणले असावे.
तसे पाहता मुंबईत स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येणा-या प्रत्येक माणसाला या मायानगरीत आपले स्वत:चे छोटे का होईना घर असावे, अशी इच्छा असणे साहजिकच आहे. अशी अनेकांची स्वप्ने गलिच्छ झोपडपट्ट्यातच विरून जातात. सुमारे २० लाख लोक फूटपाथवर रात्र काढतात. तज्ज्ञांच्या मते, २१ व्या शतकातील सर्वांत मोठे आव्हान ओस पडणाऱ्या शाळा किंवा शाळांचा अभाव आहे आणि ही दयनीय अवस्था पैशाअभावी झालेली नाही. प्रामुख्याने, सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे आणि लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे शासनयंत्रणेलाही वाटत नाही. आहे तशी परिस्थिती कायम राहावी असे वाटत असल्यानेच पैसा नसल्याचे कारण पुढे करावे लागते. खाप पंचायती या बेशिस्त समाजव्यवस्थेतचे अस्तित्व टिकून राहावे म्हणूनच त्या प्रेम अभिव्यक्त करणाऱ्यांच्या विरोधात असतात. त्यासारखेच हे उदाहरण ठरावे. कारण प्रेमामुळे युगुलांच्या मनात बंडखोर वृत्ती जागी झालेली असते. असो. संघर्षाच्या काळात अजिज मिर्झा यांचा बँड स्टँड येथे असलेला फ्लॅट शाहरुख खानचे स्वप्न होते. यशस्वी होऊन याच भागात आपले घर असावे, ही इच्छा शाहरुख खानच्या संघर्षाच्या काळातच प्रबळ झाली असावी.
"मन्नत' च्या बाहेर त्याने सिमेंटचा रॅम्प बनवला असून पावसाच्या पाण्यामुळे या बंगल्याच्या पायाला धोका निर्माण होऊ नये. तसेच त्याला भेटण्यास येणाऱ्या लोकांच्या कार तेथे उभ्या करता याव्यात. या रॅम्पमुळे आजूबाजूचे रस्ते नदीसारखे झाले. लोकांच्या तक्रारीची कोणी दखल घेईनासे झाले कारण अापले अधिकारी बड्या व्यक्तीवर कारवाई करण्यास कचरतात. असो. भाजप खासदार पूनम महाजन यांच्या तक्रारीवरून येथील रॅम्प काही दिवसापूर्वीच तोडण्यात आला. तसे तर कोणतेही अवैध बांधकाम तोडले जाण्याच्या घटनेचे स्वागतच केले पाहिजे. अनेक बड्या लोकांचे वरळी येथील अवैध बांधकाम पाडण्यात आले.
अशी प्रकरणे अर्धमेल्या सापासारखी रेंगाळतच असतात. शाहरुख खानला मन्नत घेतेवेळी अनेक कायदेशीर लढाया कराव्या लागल्या. अंगात चिकाटी असल्याने तो फारशी चिंता करत नाही. परंतु या कामात त्याने काेणता अडथळा अाणला नाही. एका सामान्य नागरिकाप्रमाणे त्याने तो रॅम्प तोडू दिला. येथपर्यंत हे प्रकरण सर्वकाही ठीक आहे असे वाटत होते. पण या गोष्टीमुळे या मौन बाळगलेल्या कारवाईला वेगळीच पुष्टी देतो. जमिनीत असणाऱ्या पाण्याचे पाट नेहमी संथ गतीने वाहत असतात, परंतु काही परिस्थिती त्यांना वर उसळून येण्यास भाग पाडतात.
jpchoukse@dbcorp.in