आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटफूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॅटफूटची समस्या १० पैकी ४ लोकांना जाणवते. हा त्रास बहुतांश महिलांमध्ये अधिक असतो. कारण त्यांचे सांधे ढिले असतात. दीर्घकाळ उपचार न केल्याने भविष्यात पायाच्या पंज्यांमध्ये आर्थरायटिसचे कारणही बनू शकते.

जन्मत:च सर्वच मुलांचे पायाचे पंजे सपाट असतात, पण वाढत्या वयात त्याचे पॉश्चर बदलते. ते चालायला शिकतात. त्यांच्या मांसपेशी मजबूत होत असतात. ९-१० वर्षांच्या वयात पायांचा विकास होतो. सामान्यत: पायाच्या पंज्यात आर्च हाेण्याने शरीराचा भार घोट्यावर आणि पंज्यावर एकाच वेळी पडतो. त्यामुळे आपण धावपळ करू शकतो. फ्लॅटफूट असल्याने शरीराचा संपूर्ण भार पायावर विभागला जातो.

यामुळे जास्त काळ उभे राहण्याची आणि हिंडण्याफिरण्याची समस्या निर्माण होते. यामुळे पिंडऱ्याच्या मांसपेशीमध्ये दुखणे सुरू होते. यामुळे सपाट पायाची समस्या अाणखी गंभीर होते. हा त्रास १० मधील ४ लोकांना असतो. चपटे तळवे म्हणजे, फ्लॅटफूट प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात.

१) फ्लेक्झिबल, २) रिजिड
फ्लेक्झिबल फ्लॅटफूटमध्ये साधारणत: पायाचा आकार चांगला दिसतो; पण दबाव पडल्यानंतर पायांचे संतुलन राहत नाही. पाय चपटे होतात.

रिजिड फ्लॅटफूटमध्ये पंजाचा आकार समतल असतो. चपट्या तळव्याची समस्या जेव्हा मूल चालू लागते तेव्हा दिसून येते. ज्या मुलांमध्ये आर्चचा योग्य विकास होत नाही, त्यांच्यात जास्त चालल्यानंतर पायात दुखणे िकंवा थकवा येणे अशा तक्रारी असतात. त्यावर दीर्घकाळ उपचारच केले नाहीत, तर पुढे चालून पंज्यात आर्थरायटिसचे कारण होऊ शकते. रिजिड फ्लॅटफूटमध्ये दुखणे अधिक वाढल्याने सर्जरी करावी लागते.

कारणे : फ्लॅटफूट असल्याने सांधे ढिले असतात. त्यामुळे वजन वाढल्यामुळेही असे होते. पायात एक प्रकारची विशिष्ट नस असते, जिला टिबिया पोस्टेरियर असे म्हणतात. ती पायाच्या आर्चला संतुलित ठेवते. ती खूप सूज किंवा लठ्ठपणामुळे फाटते. यामुळे फ्लॅटफूटची समस्या निर्माण होते.

लहानपणी पायातील दोन हाडे जोडली गेली तर ज्याला टॉर्सल कोअॅलिशन असे म्हणतात. यामुळे पाय कडक आणि सपाट होतात

फूट आर्थरायटिस, हा पायाच्या मागील बाजूस किंवा मध्यभागी असतो. साधारणत: यात ठणक असते. तो मार लागल्याने किंवा अन्य कारणानेही होऊ शकतो.

कधी-कधी पायाला मार लागणे किंवा फ्रॅक्चर होणे, सपाट तळवे असल्याने होऊ शकते. लिगामेंट्स तुटल्याने किंवा कमकुवत झाल्याने हाडे एकमेकांशी जखडून राहण्याऐवजी ढिली होतात.

याशिवाय लठ्ठपणा, पायात किंवा घोट्यास मार लागणे, रुमेटाइड आर्थरायटिस आणि वय वाढणे तसेच डायबिटिस इत्यादी कारणामुळे काही लोकांत अशी लक्षणे दिसून येतात.
मुख्यत: चालताना पायात किंवा घोट्यात दुखणे.
पळताना दुखणे.
घोट्याच्या आतील बाजूस सूज येणे
कधी कधी पायाचे तळवे किंवा आतून मुंग्या येणे अथवा सुन्नपणा जाणवणे असे होऊ शकते. कारण घोट्याचे मज्जातंतू खेचले जातात किंवा दबतात.
निदान : एक्स-रे पाहून फ्लॅट फूटबाबतची स्थिती कळते. यात फ्लॅटफूटचे आर्थरायटिस हे एक लक्षण मानले जाते, तेही कळते. एमआरआय आणि सीटी स्कॅनद्वारे यासंदर्भात माहिती मिळण्यास उपयुक्त ठरते.
उपचार : दुखत नसल्यास यासाठी उपचार घेणे गरजेचे नाही. पण पाय सपाट असेल, पण लवचिक असेल तर साधे इन्सोल आणि फिजिओथेरपीद्वारा ठीक करता येते. समस्या केवळ नसा असामान्य असल्याने निर्माण होत असेल तर फिजिओथेरपीद्वारा ठीक करता येते. आर्च सपोर्ट (आर्थोटिक उपकरणे)मुळे हाेणाऱ्या दुखण्यास आराम मिळतो. जर औषधे आणि खास बूट काम करत नसतील तर सर्जरी करणे आवश्यक आहे.
उपचार घेताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार घेणे किंवा औषधी घेणे आरोग्यासाठी घातक ठरते. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार सुरू करावेत.

डॉ. प्रदीप मुनोत
आॅर्थोपेडिक सर्जन
specialising knee, foot & ancal surgery,
ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्ट, मुंबई