आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लायबोर्ड प्रोफेशनल्सचा स्टंट व्हिडिओ नेटवर हिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉटर स्पोर्ट्समध्ये काही दिवसांपूर्वीच समावेश करण्यात आलेल्या फ्लायबोर्डची लोकप्रियता खूप वाढली आहे. अमेरिकेच्या नॅशविलेची मोंटगोमेरी बेल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी व्हिसल स्पोर्ट्सच्या फेसबुक पेजवर नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. पाच दिवसांत त्याला आठ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले व ४,९०० लोकांचे लाइक मिळाले. ९,८०० पेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अकॅडमीचे विद्यार्थी फ्लायबोर्ड प्रोफेशनल आहेत. त्यांनी कम्बरलँड नदीत स्टंटचा व्हिडिओ तयार केला केला होता. त्यामध्ये एक विद्यार्थी पुलाच्या वरून डिस्क फेकतो आणि खाली असलेले विद्यार्थी त्याला पाण्याच्या साहाय्याने झेल घेतात. अशाच प्रकारे एक विद्यार्थी जेट स्कीवर नदीच्या काठावर लावण्यात आलेल्या नेटवर बॉल टाकतो.
फ्लायबोर्डच्या आव्हानांचा सामना करणारे कुडी गार्डनर म्हणतात की, जेट स्कीमुळे तुम्ही पाण्याच्या वर येता आणि तरफ फिरू लागतात. हे जेवढे सोपे वाटते तेवढे नसते. त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नाहीतर अपघातही होऊ शकतो. व्हिसल कंपनी तलावांमध्ये असे कार्यक्रम घेते. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी कंपनीने कम्बरलँड नदीची निवड केली. याच्या मागे आमचे शहर दिसत असल्याने आम्हाला आनंद झाला. हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावरच हिट होत नसून अमेरिकेच्या राष्ट्रीय चॅनलवरूनही दाखवण्यात आला आहे.
फ्लायबोर्डचा शोध २०१२ मध्ये फ्रेंच वॉटरक्रॉफ्ट रायडर फ्रँकी जपाटा यांनी लावला होता. त्याचे डिझाइन असे तयार करण्यात आले होते की, पायलट पाण्यातून बाहेर येऊ शकेल आणि हवेत त्यांचे संतुलन कायम राहील. फ्रान्सच्या औद्योगिक संपदेच्या राष्ट्रीय संस्थानने त्यांना याचे पेटंट प्रदान केले आहे. }wkrn.com