आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For The Treatment Of Patients Hundreds Of Miles Short

रुग्णांच्या उपचारासाठी शेकडो मैल पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत - त्या भारत आणि अरब देशात शुद्ध पेयजल चळवळीत कार्यरत आहेत.
नागपूरमध्ये जन्मलेल्या जुलेखा यांचे वडील बांधकाम कंत्राटदार होते. घरात कशाचीच कमतरता नव्हती. मुलीने वैद्यकीय क्षेत्रात काम करून अरब देशात काम करावे, अशी वडिलांची इच्छा होती. वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या डॉक्टर झाल्या आणि संयुक्त अरब-अमिरात गाठले. ५० वर्षांपूर्वी १९६४ मध्ये त्या कुवेतमध्ये अमेरिकन मिशन हॉस्पिटलमध्ये काम करण्यास गेल्या. तेव्हा दुबईत पायाभूत सुविधा नव्हत्या. रस्तेही नव्हते. पती डॉ. इक्बाल डोळ्याचे डॉक्टर आहेत. जुलेखा दुबईच्या कुवेत हॉस्पिटलमध्ये पहिल्या महिला डॉक्टर होत्या. शारजा आणि आसपासच्या भागात छोटे-छोटे दवाखाने सुरू करावयाचे होते. त्यासाठी कोणाची तयारी नसल्याचे पाहून डॉ. जुलेखा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. या कामासाठी तासन््तास वाळवंटात चालावे लागे, वाहन जाऊ शकत नव्हते.

स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ असतानादेखील त्यांना ताप, सर्पदंश, कांजिण्या यासारख्या आजारांवर उपचार करावे लागले. एक्स-रे मशीन आणि अन्य तपासणी उपकरण नव्हते. गरोदरपणाची चाचणी करण्याची किट नव्हती. गळ्यात स्टेथस्कोप, आैषधाचा डबा, सुई आणि टॉर्च बॅग घेऊन त्या घराबाहेर पडत.

अनेकदा रस्तेही नसायचे. वाळवंटात कितीतरी मैल त्यांना एकट्याने चालावे लागत असे. त्या काळात अरब शेखांच्या पत्नी प्रसूतीसाठी रुग्णालयात जात नव्हत्या आणि रस्ता नसल्यामुळे कारनेही जाऊ शकत नव्हत्या. अशा स्थितीत तिथे काम करावे असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, जुलेखा यांनी मोठ्या धैर्याने आपल्यातील सेवाभाव कायम ठेवला. सन १९६६-६७ ची घटना आहे. एक जण बकरी घेऊन त्यांच्याकडे आला होता. माझ्या बकरीवर उपचार करा, असे तो म्हणू लागला. आपण जनावरांवर उपचार करत नसल्याचे त्यांनी सांगितले. जुलेखा यांना जे शक्य होते ते त्यांनी केले. २८ वर्षे तिथे काम केल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये शारजामध्ये जुलेखा हॉस्पिटल सुरू केले.

१९९१ मध्ये एका कार अपघातात त्यांच्या हात, पाय, मणक्यामध्ये दुखापत झाली. याशिवाय शरीरात १८ अवयवांची हाडे मोडली. त्या अनेक दिवस अतिदक्षता विभागात होत्या. सहा महिने फिजिओथेरपीच्या उपचारानंतर त्या चालू-फिरू लागल्या. जखमी झाल्यानंतरही ठरलेल्या वेळी १९९२ मध्ये रुग्णालय सुरू केले. त्या भारतात नागपूरमध्ये एक शाळा आणि रुग्णालय चालवतात.
प्रेरणा| जुलेखा दाऊद, डॉक्टर
वय - ७५ वर्षे
शिक्षण - एमबीबीएस
कुटुंब - पती डॉ. इक्बाल(अॉप्थेल्मॉलॉजिस्ट)