आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी आण्विक ताकदही पणाला लावू’, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचे पहिल्या विदेश दौऱ्यात वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीतील बॉन या लहानशा शहरातील सर्व हॉटेल्स काही दिवसांपूर्वी बुक करण्यात आले होते. हे काय सुरू आहे, याची कल्पना कित्येक मुत्सद्द्यांनाही नव्हती. नंतर कळले की, अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन हे पहिल्या विदेश दौऱ्यासाठी बॉन शहरात येत आहेत. या दौऱ्यात ते जी-२० संघटनेतील परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतील. तसेच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गी लावरोव्ह यांची खास वेगळी भेट घेतील, हे हळूहळू उघड झाले. 
 
युरोपमध्ये जपान, दक्षिण कोरियासारख्या मित्रराष्ट्रांची नावे घेऊन ते म्हणाले की, आम्ही मित्रराष्ट्रांच्या संरक्षणार्थ कोणतीही जोखीम उचलू शकतो. त्यांचा थेट निशाणा चीन आणि उत्तर कोरियाकडे होता. टिलरसन आणि त्यांच्या स्टाफसाठी बॉन शहरापासून २० मैल अंतरावर एका निसर्गरम्य गावात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  

ही जागा बैठकीच्या जागेपासून दूर निवडण्यात आली. यावरून अमेरिका आणि युरोपदरम्यान वाढलेल्या अंतराचे बोध होतात. अनिवासी, शरणार्थी, सुरक्षा आणि व्यवसायांच्या पातळीवर अमेरिका- युरोपदरम्यान सामंजस्य निर्माण होऊ शकत नाही. टिलरसन आणि लावरोव्ह यांची एक खास बैठक झाली. जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतची बैठक ही जुलै महिन्यात जर्मनीत हेमबर्ग येथे होणाऱ्या जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचा एक भाग होती. लावरोव्ह यांच्यासोबतच्या बैठकीत टिलरसन यांनी कठोर भूमिका घेतली.

अमेरिकेतील संरक्षण प्रणालीतील सायबर सुरक्षेवरून रशियावर आरोप आहे. ट्रम्प प्रशासनाचे परराष्ट्र धोरण एकदम स्पष्ट आहे, हे दर्शवण्याचा प्रयत्न टिलरसन यांनी केला. युक्रेनमधील हिंसाचार थांबवण्यासाठी दिलेले आश्वासन रशियाला पूर्ण करावेच लागेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी या बैठकीत केली. जपान आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलताना टिलरसन म्हणाले की, ‘अमेरिका मित्रराष्ट्रांचे संरक्षण करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. गरज पडल्यास संपूर्ण आण्विक आणि संरक्षण क्षमतांचा वापर केला जाईल.’ टिलरसन यांच्याशी बोलताना लावरोव्ह यांची भूमिका सामान्य होती. ते म्हणाले, ‘रशिया आणि अमेरिका विविध क्षेत्रांत परस्परांना सहकार्य करू शकतात. काही बंद्यांवर अद्याप चर्चा झालेला नाही. काही प्रकरणे खूप कृत्रिम आहेत, त्यांचे राजकारण करू नये. काही बाबींवर दोन्ही देशांनी विचार केला पाहिजे.’
बातम्या आणखी आहेत...