आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तुमच्या कंपनीकडे भन्नाट कल्पना आणि चांगल्या लोकांची टीम आहे हे मान्य; पण तरीही लोकांनी तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवायचा? थोडक्यात सांगायचे तर तुम्ही तुमचे ग्राहक, गुंतवणुकदार व कर्मचा-यांना तुमच्या क्षमतेबाबत कशी खात्री देणार? नामवंत मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट सिअॅल्डिनी यांच्या ‘इन्फ्ल्युएन्स : द सायकॉलॉजी ऑफ पर्सुएशन’ या पुस्तकात विश्वसनीयता प्राप्त करण्याचे महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत. त्या सिद्धांतांसंबंधी...
बदल्यात काय देणार ते सांगा - आपण उपकाराची परतफेड करत आहोत, असे वाटते तेच काम करायला लोक अधिक इच्छुक असतात. त्यामुळे एक उद्यमी या नात्याने तुमच्या भावी गुंतवणूकदारांना किंवा अन्य भागधारकांना छोटे पॅकेज, सवलत किंवा सूट द्या. त्यांना त्यांचा बिझनेस अधिक चांगला करण्यासाठी सूचना करा. त्यांच्यापैकी काही लोक तुमचे ग्राहक होण्याचा निर्णय घेऊ शकतात.
सर्वसंमती आवश्यक - बहुतांश लोक एखाद्या उत्पादनाची उपयोगिता किंवा त्याच्या आवश्यकतेबाबत दुस-याचा सल्ला घेतात. उदा.- एखादा प्रतिष्ठित लेखक पुस्तक लिहिताना त्या विषयाशी संबंधित प्रतिष्ठित लोकांचा सल्ला घेतो आणि पुस्तकात अभिप्रायही लिहायला सांगतो. त्यामुळे पुस्तकाचे भावी वाचक ते अधिक चोखंदळपणे वाचतात.
विचार करायला भाग पाडा - तुम्ही लोकांना काही काळासाठी तुमचे उत्पादन किंवा सेवा देऊन भाग पाडू शकता. उदा.- डिस्काउंटऐवजी उत्पादनाची किंमत वाढवा. डायमंड इंडस्ट्रीमध्ये ही पद्धत यशस्वी ठरली आहे. हिरा दुर्लभ रत्न नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर केलेल्या जाहिरात कॅम्पेनिंगने लोकांना ‘हिरा नेहमीसाठी दुर्लभ आहे’ असा विचार करायला भाग पाडले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.