Home | Editorial | Columns | gold-india-rising-price-maharashtra

सोन्याचे झळाळते तेजोवलय

दिलीप सामंत, अर्थगुंतवणूक सल्लागार | Update - Jun 01, 2011, 08:38 PM IST

जगातील एकंदर मागणीपैकी २५ टक्के मागणी आपल्या देशाची आहे. तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे पुढील चार ते पाच वर्षांत दुस:या नंबरवर असलेला चीन आपल्याला सोन्याच्या बाबतीत मागे टाकणार आहे.

 • gold-india-rising-price-maharashtra

  चलन फुगवट्याच्या भस्मासुराचा सामना करण्याचे एक प्रभावी अस्त्र म्हणून सोन्याची ख्याती आहे. इंग्लंडमध्ये १५९६ ते १९९७ पर्यंतच्या ४ वर्षांच्या काळातील सोन्याच्या भावामधील चढउताराचा अभ्यास केल्यावर असे निष्पन्न झाले, की १ औंस सोन्याच्या भावात १५९६ साली ज्या आवश्यक वस्तू उपलब्ध होत्या, तितक्याच १९९७ मध्येही खरेदी करता येत होत्या. सर्वसाधारणपणे शेअर बाजारात तेजी असली की सोन्याचा भाव घटतो आणि त्या बाजारात मंदी आली की सोन्याचा भाव वधारतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याचा विचार केला तर आपल्या आर्थिक व्यवहारात १ टक्के तरी सोन्यामधील गुंतवणूक असणे आवश्यक आहे. त्यामुळे एक प्रकारचा समतोल राखला जातो.
  महाराष्ट्र राज्याच्या उदयापासून गेल्या ५ वर्षांच्या सोन्याच्या दरांवर नजर टाकली तर विश्वास बसणार नाही अशी आकडेवारी दिसून येते. १९६१ मध्ये सोन्याचा भाव होता १२ रू आणि आज २११ साली आहे २१ रू. म्हणजे सोन्याच्या भावाने अगदी कळस गाठला आहे असे वाटते. मध्यंतरीच्या काळात त्यात बरेच चढउतारही झाले आहेत.
  १९६१ ते ७४द.सा.द.शे.(+)११.४ %
  १९७४ ते ७६द.सा.द.शे.(+)२१.५%
  १९७६ ते ८द.सा.द.शे.(-)५४.३%
  १९८ ते २द.सा.द.शे.(-)४०%
  १९८० ते २००० या वीस वर्षांच्या काळात जागतिक स्तरावर खाणींमधील सोन्याचे उत्पादन दरवर्षी १३०० टनांवरून २६०० टनांपर्यंत वाढत गेले. त्यामुळे पुरवठा व मागणी यांमध्ये मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण झाला आणि सोन्याच्या भावाने मंदीचा मार्ग पत्करला.
  गेल्या ५ वर्षांतील सर्व चढउतार जमेस धरून विचार केला, तर सोन्याच्या भावात सरासरी द.सा.द.शे. ११.४ टक्क्यांची वाढ दिसून येते. हाच ट्रेन्ड कायम राहिला, तर महाराष्ट्राच्या साठीला म्हणजे २०२१ साली सोन्याचा भाव असेल, सुमारे ६२०००, रु. आणि पंच्याहत्तरीला म्हणजे २०३६ साली सोन्याच्या भावाने ३ लाख रु. ची मर्यादा सहजपणे पार केलेली असेल.
  या घोडदौडीमध्ये सिंहाचा वाटा असेल तो भारत आणि चीन या दोन देशांचा. या दोन्ही प्रगतीशील देशांमध्ये आज मध्यमवर्गांचे उत्पन्न अफाट वाढले आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक आणि दागिन्यांची खरेदी यांमध्येही वाढ झाली आहे. एका वेगळ्या प्रकारे अमेरिका हा देशही सोन्याच्या भाववाढीला कारणीभूत ठरत आहे. गेल्या वीस वर्षांमधील ग्लोबलायझेशनमुळे जगभरातील व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांमधील सीमा अतिशय पुसट झाल्या आहेत. टेलिकम्युनिकेशन व दळणवळण क्षेत्रांमधील उच्च प्रतीच्या टेक्नॉलॉजीमुळे उपयोगी वस्तूंचे भाव समसमान राहण्यास मदत झाली आहे. याचा परिणाम कमोडिटींच्या व्यापारामध्ये प्रचंड प्रमाणात भाव-युद्ध चालू असून, नफ्याचे प्रमाण घटत चालले आहे. यावर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ब्रॅन्डिंग. प्रत्येक कंपनी आपली माल इतरांपेक्षा कसा सरस आहे हे ग्राहकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करत असते. त्यात आवड आणि दिखाऊपणा हे दोन्ही प्रकार असतात. सोने हे सोनेच असते. त्याचा भाव सगळीकडे (मुंबईत) सारखाच असतो. 'मेकिंग चार्जेस'ही जवळजवळ सारखेच असतात. एखाद्या समारंभात दागिन्यांच्या दिखाऊपणाच्या दृष्टीने विचार केला, तर दादरच्या रानडे रोडवरील पेढीतील दागिना आहे की अतिप्रसिद्ध पेढ्यांमधील आहे हे ठळकपणे दिसून येत नाही. मग हा २५ टक्के किंमतीचा फरक का? आणि त्या चढ्या भावाची कल्पना ग्राहकांना असतानाही त्या दुकानांतील विक्री जास्त का? ब-याच ठिकाणी विचारणा केल्यानंतर जी काही माहिती मिळाली त्यामुळे हे कोडे उलगडले. सुज्ञ महिलांना हा दागिना सुप्रसिद्ध पेढ्यांमधील आहे की दादरच्या रानडे रोडवरील आहे हे त्वरित समजते. कितीही प्रयत्न केला, तरी मोठ्या पेढ्यांकडील बनावटीमधील सफाई आणि एक प्रकारची नजाकत छोट्या पेढ्या दागिन्यांमध्ये उतरवू शकत नाहीत. या विक्रीमधील विषमतेला तोंड देण्यासाठी आणि आपले स्थान कायम ठेवावे किंवा आणखी वर जावे यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवण्याचे प्रकार चालू असतात.
  २००२ पर्यंतच्या दहा वर्षांमध्ये दागिन्यांसाठी जगात दरवर्षी सरासरी ३१०० टन सोने वापरले गेले; गुंतवणुकीसाठी २२२ टन आणि इंडस्ट्रीमध्ये ३९७ टन वापरले गेले. त्या काळातील उत्पादन होते सरासरी २२०० टन. २००७ मध्ये भारतात दरवर्षी एक कोटी लग्रे होत असत. (आज हा आकडा नक्कीच वाढला असेल.) प्रत्येक लग्रामध्ये सरासरी १० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा अंदाज केला, तर दरवर्षी १० कोटी ग्रॅम सोन्याची मागणी लग्रांमध्ये फक्त वधूवरांसाठी असते. नातेवाईक त्या निमित्ताने किती सोने घेतात त्याचा अंदाज करणेही मुश्किल आहे. त्यामुळे जगातील एकंदर मागणीपैकी २५ टक्के मागणी आपल्या देशाची आहे. तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे पुढील चार ते पाच वर्षांत दुस-या नंबरावर असलेला चीन आपल्याला सोन्याच्या बाबतीत मागे टाकणार आहे. दिवसेंदिवस घटत चाललेले खाणींमधील उत्पादन, तसेच उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ, चीन आणि भारत या देशांमधील जनतेचे सोन्याबाबतचे आकर्षण, इंडस्ट्रीसाठी लागणा:या सोन्याच्या मागणीतील वाढ... एक ना हजार गोष्टी एकच तात्पर्य सांगतात : कितीही भाववाढ झाली तरी सोन्याची मागणी वाढतच राहणार आहे.
  या वाहत्या गंगेत हात धुवायचे असतील, तर आपल्या 'पोर्टफोलिओ'मध्ये १ ते १५ टक्के तरी सोन्यामधील गुंतवणूक असेल याची दक्षता घ्या.

Trending