Home | Editorial | Columns | government thertan for himself image

सरकार घाबरले स्वत:च्याच प्रतिमेला!

योगेंद्र यादव | Update - Jun 07, 2011, 09:03 AM IST

दुसरीकडे हरिद्वारमध्ये बाबा रामदेव प्रसारमाध्यमांपुढे आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगत होते

 • government thertan for himself image

  ram1_258वेताळाने राजा विक्रमादित्याला विचारले, ह्यराजा, जे सरकार काल बाबा रामदेव यांच्यासाठी पायघड्या घालण्यासाठी सरसावले होते ते सरकार दुसर्‍याच दिवशी बाबा रामदेवांचे आंदोलन चिरडण्यासाठी का तत्पर झाले? जर बाबा खोटे असतील, तर सरकारच्या तंबूत एवढी घबराट का?ह्ण

  21 व्या शतकातील हा राजा विक्रमादित्य आणि वेताळ कोणत्याही झाडाखाली उभे नव्हते, तर ते एका मोठय़ा टीव्हीच्या स्क्रीनखाली उभे होते. गेल्या 24 तासांत दिल्लीतील रामलीला मैदानातील घडलेले महाभारत देशभरातील विविध वृत्तवाहिन्यांवरून बघितल्यानंतर दोघांमध्ये हा संवाद चालला होता. टीव्हीवर एक रिपोर्टर रामलीला मैदानावर झालेल्या पोलिसांच्या अत्याचारी कारवाईची माहिती देत होता, तर दुसरीकडे हरिद्वारमध्ये बाबा रामदेव प्रसारमाध्यमांपुढे आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगत होते. या सर्व कोलाहलात टीव्हीच्या रिमोट कंट्रोलवरचे म्यूटचे बटण वेताळाने दाबले आणि तो राजाकडे उत्तराच्या अपेक्षेने बघू लागला.

  वेताळाचे हे प्रश्न ऐकल्यावर राजा विक्रमादित्याला एक क्षण या प्रश्नांची उत्तरे देणे कठीणप्राय वाटले. कारण यूपीए सरकार कोणत्या वेळी काय करील याचा भरवसा त्याला नव्हता. 100 कांदे किंवा 100 जोडे निवडायची वेळ येते, तेव्हा हे सरकार पहिल्यांदा 99 कांदे फस्त करते व नंतर फार मोठे आकांडतांडव करत 100 जोडेही फस्त करते, असा अनुभव त्याला होता. या सरकारने तेलंगणा मुद्दा तसेच जातीच्या आधारावरील जनगणनेवरून अशीच कोलांटउडी मारली होती; पण बाबा रामदेवांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका दिशाहीन का होत गेली, हा वेताळाचा प्रश्न त्याला सतावत होता.

  राजा विक्रमादित्याच्या मनात विचारांची चक्रे सुरू झाली. वेताळाला अगदी खरेच उत्तरे द्यायची असतील तर त्याला दिल्लीमध्ये पडद्याच्या मागे काय राजकीय हालचाली होतात, याची माहिती द्यावी लागणार होती. कारण गेली कित्येक वर्षे दिल्लीत पत्रकारिता केल्यामुळे राजाला ह्यअंदर की बातह्ण माहिती होती. त्याचबरोबर बाबांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या चिठ्ठीमागचे रहस्यही त्याला माहीत होते. बाबा आणि सरकार यांच्यात झालेल्या ह्यसेटिंगह्णची माहिती त्याला होती. दिल्लीत कोण कुणाचे पाय खेचते, कोण कुणाला वर चढवते, कुणाचा फायदा होतो, तर कुणाचा नफा होतो याची इत्थंभूत माहिती त्याच्याकडे होती. पण ही उत्तरे द्यावीत, असे त्याला वाटत नव्हते. चेहरे बदलत जातात; पण कथा त्याच असतात, हे तो जाणून होता. वेताळाच्या प्रश्नांची उत्तरे देताना जरा खोलात जाऊन विचार करावा, असे त्याला वाटले.

  टीव्ही ह्यमुकाह्ण झाला असला तरी त्यावरच्या प्रतिमा क्षणाक्षणाला बदलत होत्या. टीव्हीवर चाललेला गोंधळ बघत राजा पुन्हा भानावर आला. तो वेताळाकडे पाहत म्हणाला, ह्यबाबा रामदेव यांना सरकार घाबरले आहे, याचे एक कारण म्हणजे नैतिक सत्तेपुढे नेहमीच राजसत्तेला झुकावे लागते. पण इथे मात्र वेगळीच गोची आहे. बाबा रामदेव यांची देशातील लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांच्याकडे भक्त आणि अनुयायांची फौज आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातील लाखो लोकांच्या मनात बाबांविषयी चांगले मत आहे. पण अण्णा हजारे यांच्यामागे नैतिकतेचे जे वलय आहे, ते बाबांपाशी नाही. प्रस्थापित समाजव्यवस्थेशी आयुष्यभर संघर्ष केल्याचा भाव मेधा पाटकर, अरुणा राय यांच्या चेहर्‍यावर दिसतो तसा संघर्षाचा भाव बाबांच्या चेहर्‍यावर नाही. एवढेच काय, या लोकनेत्यांकडे किंवा हजारो राजकीय कार्यकर्त्यांकडे जनआंदोलनाचा जो व्यापक अनुभव आहे तेवढा अनुभवही बाबांकडे नाही.

  ह्यसरकार बाबांच्या नैतिक वलयाला घाबरले नाही, तर ते स्वत:च्या प्रतिमेला घाबरले आहे. राजकारण्यांची बेसुमार संपत्ती स्वीस बँकेत आहे, हे जनतेला माहीत आहे. या देशातील कुठलाच पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. प्रामाणिक पंतप्रधान मिळूनही या गेल्या 7 वर्षांत काळा पैसा देशात आणण्यासाठी या सरकारने कुठलेच ठोस प्रयत्न केलेले नाहीत, हे जनतेला माहिती आहे. अशा परिस्थितीत बाबा रामदेव यांनी हे प्रश्न उठवण्याचा प्रयत्न केल्यामुळे सरकारला काहीतरी उत्तरं देणे भाग पडले.

  ह्यपण असं काहीही असलं तरी बाबांचं उपोषण मोडण्याची हिंमत सरकारमध्ये आली कुठून? कपिल सिब्बल आणि बाबा रामदेव यांच्यात जी चर्चा झाली त्याबद्दलची परिपूर्ण माहिती गुलदस्त्यात आहे. बाबांकडे जर आमरण उपोषणाचे अस्त्र होते तर सरकारकडेही काहीतरी व्यूहरचना असणार! या देशात अनेक धर्मगुरू, बाबांचे संबंध राजकीय नेत्यांशी असतात. जमीन, आर्शम आणि संपत्ती यामुळे हे संबंध घनिष्ठ झालेले असतात. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना स्वत: प्रामाणिक, निष्कलंक असले पाहिजे. आपले आंदोलनच सत्यावर आधारलेले नसेल तर ते काही कालावधीतच डळमळायला लागते. बाबांचे आंदोलन असेच डळमळीत झाले आणि ते उधळून लावण्याची संधी सरकारने सोडली नाही. बाबांनी आपणहून ही संधी सरकारला दिली.ह्ण

  आता टीव्हीवर चाललेला सगळा गोंधळ बघून वेताळ कंटाळला होता. त्यामुळे राजाचे लांबलचक उत्तर ऐकण्याची त्याची मन:स्थिती नव्हती. वेताळाची ही अवस्था पाहिल्यावर राजाने त्याला थोडक्यात उत्तर दिले, ह्यवेताळा, वरून बघितलं तर सरकार आणि बाबा रामदेव हे एकमेकांच्या विरोधातील आहेत; पण खोलात पाहिलं तर धर्मशक्ती व राजकारण यांचा र्‍हास होताना दिसतोय. जेव्हा राजकारणातच धर्म चुकतो तेव्हा राजकीय नेते धर्मगुरू व बाबाबुवांसाठी पायघड्या घालायला लागतात. जेव्हा राजसत्तेच्या आचरणातून नैतिक शक्ती नाहीशी होते तेव्हा त्यांच्या हातात केवळ काठी उरते. जेव्हा धर्माच्या बढायांमधून सत्य नाहीसे व्हायला होते तेव्हा नीतिविहीन राजकारणाचा प्रभाव वाढत जातो.ह्ण वेताळ खांद्यावरून उतरण्याच्या अगोदरच विक्रमादित्याने रिमोटचे बटन दाबून टीव्ही बंद केला.Trending