आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Idea: Drone Bring Revolution In Humane Life

ग्रेट आयडिया: ड्रोनमुळे आपल्या जीवनात क्रांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रोनवरून नवे बिझिनेस मॉडेल तयार होत आहेत. नवी बाजारपेठ शोधली जात आहे. ड्रोनच्या वापराच्या नव्या पद्धती शोधल्या जात आहेत. आपले जग कसे बदलत आहे... जाणून घेऊया
मानवविरहित ड्रोन यानाची कल्पना दीडशे वर्षांहून अधिक जुनी आहे. ऑगस्ट १८४९ मध्ये ऑस्ट्रियाने व्हेनिसवर २३ फूट परिघात स्फोटकांनी भरलेल्या फुग्यांद्वारे हल्ला चढवला होता. ही स्फोटके विद्युत चुंबकीय लहरीद्वारे उडवण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान १९१६ मध्ये रेडिओ लहरीद्वारे चालवण्यात येणाऱ्या विमानाचा वापर झाला. त्यांना फ्लाइंग बॉम्ब असे म्हटले गेले. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने १९३५ मध्ये पायलटविरहित 'डीएच ८२ बी क्वीन बी' या विमानाची बांधणी केली. ती खऱ्या अर्थाने आजच्या ड्रोनची पहिली प्रतिकृती आहे. सैनिकी कारवाईसाठी निर्माण करण्यात आलेले ड्रोन विमान आज किती तरी क्षेत्रांत आपले जीवन सुखकर करत आहे. क्वीन बी यांसारख्या काही विमानांनंतर इस्रायलचे एअरक्राफ्ट इंजिनिअर अब्राहम कारेम यांनी पुढचे पाऊल उचलले. १९८५ मध्ये कारेम यांना अमेरिकी सेनेने सर्वात मोठे मानवरहित विमान बांधणीचे कंत्राट दिले. त्यांनी "अँबर' नावाचे विमान तयार केले. ते खूप यशस्वी ठरले. परंतु निधीमध्ये कपात करण्यात आल्याने प्रकल्प थांबवण्यात आला. कारेम यांनी आपले कार्य चालूच ठेवले. त्यांनी आणखी एक विमान नाॅट ७५० तयार केले. शेवटी आर्थिक अडचणीमुळे त्यांची कंपनी १९९० च्या दशकात जनरल अॅटॉमिक्सला विकली. जनरल अॅटॉमिक्सने संचारसेवेने सुसज्ज असे आणखी एक मोठे मानवविरहित यान बनवले. त्याला नाव दिले 'प्रिडेटर.' मग प्रिडेटरमध्ये लेसर बसवण्यात आले. त्यामुळे जी विमाने आता ड्रोन म्हटली जात होती. ते लक्ष्यावर प्रकाश टाकू शकतील आणि लढाऊ विमाने तेथे नेम साधू शकतील. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांनी सज्ज असे प्रिडेटर बनवण्यात आले. या विमानांनी अफगाणिस्तानात ११५ ठिकाणी अचूक हल्ले चढवले. आज ड्रोन जमिनीवर चालू शकतात, उंच भरारी घेऊ शकतात, एखाद्या इमारतीस चिकटू शकतात, तर नदीवर तरंगूही शकतात, पाण्यात शिरू शकतात.

संकटांचा पूर्व इशारा : हातात उचलून घेता येतील इतक्या लहान आकाराचे ड्रोन येणार आहेत. यात बसवलेले सेन्सर वायुमंडळातील बारीकसारीक बदल जाणून वादळ, भूकंप, गारपीट, पाऊस, सुनामी आणि जंगलात लागलेल्या आगीची सूचना देतील आणि नियंत्रणही मिळवतील.

आपत्कालीन सेवा : हरवलेल्या मुलांना हुंगून त्याची माहिती काढणारे, संकटात सापडलेल्या जनावरांची अवैध शिकार रोखणारे ड्रोन असतील एखाद्या शहरात दहशतवादी किंवा काही हिंसाचार होण्याची शक्यता असल्यास सर्वप्रथम तेथे ड्रोन तैनात करून त्यावर नियंत्रण मिळवता येईल.

बातम्यांचे संकलन : मोठ्या घटनांना ड्रोनद्वारे कोणत्याही अँगलने चित्रित करता येईल. मुलाखत घेण्यासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी ड्रोनचा वापर महत्त्वपूर्ण ठरेल.

वितरण : टपाल, औषधे, किराणा सामान, पॅकेज, शेतातून ताज्या भाज्या आणि फळे थेट उत्पादकांकडून आणण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे ड्रोन केटरिंग व्यावसायिकांकडे येत्या काही वर्षांतच दिसून येतील.

व्यवसाय : बांधकाम, भौगोलिक सर्व्हे, एखाद्या प्रकल्पावरून पर्यावरणाची देखरेख, खुल्या समुद्रातील व्यापारी जहाजांची सुरक्षा, जमिनीमध्ये तेल व खनिजांचा शोध घेणे इत्यादी.

विपणन : फुटपाथ किंवा पार्किंग लाॅटमध्ये एखाद्या उत्पादनाची जाहिरात दाखवता येईल. मोठे बॅनर किंवा पोस्टरमधील छायाचित्रे थेट उभे करता येतील. कंपन्यांना ग्राहकांसाठीच्या उत्पादनाचे नमुने पाठवता येतील.

शेती : जेव्हा ड्रोन वापरणे स्वस्त पडेल तेव्हा धान्याची पोतीसुद्धा १ हजार किमी दूर अंतरापर्यंतच्या ग्राहकांना पोहाेचवणे सोयीचे होईल. फुलांच्या झाडांमध्ये तसेच विविध पिके, फळझाडांमध्ये परागीकरण होण्यासाठी पक्ष्यांएेवजी ड्रोनचा वापर करता येईल. बी पेरण्यासाठी, जमिनीत खताचे प्रमाण, कीटकांचा हल्ला, पिकावर पडणाऱ्या रोगावर नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर करता येईल. शेतात 'बुजगावण्या'ऐवजी ड्रोनचा वापर करता येईल. त्यामुळे पक्ष्यांच्या टोळधाडीपासून पिकांचे संरक्षण होईल.
पोलिस ड्रोन : मादक पदार्थांचा वास घेऊन त्याचा माग, गुन्हेगारांचा पाठलाग, वाहतूक तसेच शहर व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनची मदत होणार आहे.
आरोग्य सुविधांसाठी : हार्वर्ड एमआयटीचे संशोधक एका ड्रोनची तयारी करत आहेत. या ड्रोनद्वारे दुर्गम प्रदेशात लसी आणि अत्यावश्यक औषधे पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच मानवी शरीरातील ऊर्जेतील परिवर्तन जाणून आजाराचे निदान करणारे मायक्रो ड्रोनसुद्धा येतील. संसर्गजन्य राेगावर ड्रोनने लक्ष ठेवण्यात येईल. या प्रमुख क्षेत्राशिवाय शिक्षण, विज्ञान व संशोधन आणि प्रवास तसेच पर्यटनासारख्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेता ड्रोनचा विकास करण्यात येत आहे.

पूर्वी, आता आणि भविष्यातील ड्रोनचे बदलते स्वरूप
क्वीन बी ते ड्रोन
१९३५ मध्ये जेव्हा रॉयल नेव्हीने रिमोट कंट्रोल असलेल्या क्वीन बी या विमानांची चाचणी घेतली. तेव्हा अमेरिकी अॅडमिरल विलियम एच. स्टँडली यांनी कमांडर डेलमेर फाहर्नी यांना असे विमान तयार करण्याचे आदेश दिले. फाहर्नीने 'क्वीन बी' च्या सन्मानार्थ त्यांच्या विमानास 'ड्रोन' (नर मधमाशी) असे नाव दिले.

आपणसुद्धा स्टेल्थ कॉम्बॅट ड्रोनची निर्मिती करू शकतो
भारतसुद्धा शत्रूच्या दृष्टीस न पडता त्यांच्या ठिकाणांवर हल्ले करून परत येणारे आणि पुन्हा नव्या मोहिमेवर जाणारे स्टेल्थ ड्रोन निर्माण करू शकेल. 'घातक' नामक २६५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. २००९ मध्ये याला प्रत्यक्षात आणण्याच्या शक्यतेचा अभ्यास सुरू झाला होता. हे संशोधन एप्रिल २०१३ मध्ये ठरलेल्या कालावधीतच यशस्वीरीत्या पूर्णही झाले. डीआरडीओ आणि वायुसेना संयुक्तरीत्या हा प्रकल्प पूर्णही करतील. इस्रायलकडून घेतलेले 'हॅरॉप' किलर ड्रोन आपल्या सैन्यात यापूर्वीच दाखल झाले आहेत. आपल्या सैन्यदलास सहज हातात मावतील अशा सुमारे ६०० ड्रोनची गरज आहे. त्यामुळे युद्धभूमी आणि डोंगरापलीकडे पाळत ठेवता येऊ शकेल.