आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांवर प्रभाव टाकण्याच्या 7 उपयुक्त पद्धती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेल्या कामाची प्रेरणा आतून मिळते, अशी तुमची समजूत असेल. ही इच्छा आपण वापरत असलेल्या ब्रँडेड वस्तू, महागडी कार किंवा घरासारख्या इतर वस्तूंमार्फतही व्यक्त केली जाऊ शकते. या गोष्टींनी तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही काळासाठीच प्रभावित करू शकता, पण दीर्घकाळ प्रभावित करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त नाही. इतरांवर दीर्घकाळ प्रभाव टाकण्याच्या काही पद्धती..

तुम्ही इतरांची पर्वा करत नसाल तर तेसुद्धा तुमची पर्वा करणार नाहीत. तुम्ही जेवढी इतरांची मदत कराल तेवढय़ाच प्रमाणात ते मदतीसाठी तत्पर राहतील. प्रेम द्या आणि प्रेम घ्या.

प्रत्येकाला निखळ हास्य आवडत असते. एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्याकडे पाहून हसल्यास काही वेळानंतर त्या हास्यामुळे नवी ओळख निर्माण होते. त्यामुळे नेहमी हसत राहा.

आदर हा वय किंवा समूहापुरता र्मयादित नसतो. तुमच्यापेक्षा मोठा, लहान किंवा समवयीन असो, सर्वांना मान द्या. तुमचे हे औदार्य इतर लोक लक्षात ठेवतील.

प्रत्येकाला स्वत:चे नाव ऐकायला आणि लिहिलेले नाव वाचायला आवडते. त्यामुळे लोकांना त्यांच्या नावाने बोलवा.

जे काम कराल, त्याला थोडा पर्सनल टच द्या. तुम्ही कलाकार असाल तर वेगवेगळ्या पद्धतीने कला सादर करा. तुमच्या कामाच्या ब्रँडिंगचा विचार करून कृती करा.

इतरांची स्तुती करणे आणि आजूबाजूच्या नैसर्गिक वस्तूंशी जोडलेले असणे हे उच्च माणुसकीचे लक्षण आहे. सकारात्मक आयुष्य जगण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आणि लोक याकडे आवर्जून लक्ष देतात.

लोक तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकले नाहीत तर ते तुम्हाला विसरून जातील. सगळीकडे तुमची सहज उपस्थिती असणे खूप महत्त्वाचे आहे.