आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चूक दुर्लक्षित करा, आनंदी व्हा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणाचे लग्न होते. काही दिवसांनंतर तरुणाची आईसुद्धा त्याच्यासोबत राहायला आली. काही वेळातच सासू आणि सुनांमध्ये मतभेद होऊ लागले. सासूचे विचार अगदीच तर्कशून्य आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप अडचणी आल्याचे सुनेला वाटत होते. एक दिवस सुनेने या अडचणीवर उपाय सुचवण्यासाठी मैत्रिणीकडून सल्ला मागितला. मैत्रिणीने सांगितले की, तू तुझ्या सासूला विष दे. सून तत्काळ आयुर्वेद तज्ज्ञाकडे गेली आणि त्याला विष मागितले. तिला विष का पाहिजे असल्याचे कारण त्याने विचारले. सुनेने सांगितले की, तिला सासूपासून सुटका करून घ्यायची आहे.

वैद्य हुशार होता. त्याने सुनेला जडीबुटींचे मिर्शण विष असल्याचे सांगून दिले. त्याने सांगितले की, हे विष थोड्या थोड्या प्रमाणात दररोज सासूच्या जेवणात मिसळ. तसेच यादरम्यान सासूशी चांगले वाग, जेणेकरून तिच्या मृत्यूनंतर लोक तुझ्यावर संशय घेणार नाहीत, असा सल्लाही दिला.

हळूहळू सुनेला जाणवले की, सासू तिच्याशी चांगली वागू लागली. दोघींमध्ये आई-मुलीसारखे नाते तयार झाले. नंतर सून वैद्याकडे गेली आणि म्हणाली मला विषाचा प्रभाव नष्ट करण्याचे औषध द्या. वैद्याने कारण विचारल्यावर ती म्हणाली, तिच्या सासूचा स्वभाव बदलला आहे. त्यामुळे ती जिवंत राहावी, असे मला वाटते. वैद्य सुनेला म्हणाला की, त्याने विषाऐवजी जेवण रुचकर बनवण्यासाठी मसाला दिला होता. सुनेने सासूची चांगली काळजी घेतली आणि तिची सेवा केली, त्यामुळे सासू-सुनेतील नात्यात परिवर्तन झाले.

एकदा मी माझ्या वरिष्ठ जपानी सहकार्‍यासोबत न्यूयॉर्कमध्ये प्रवास करत होतो. टॅक्सी ड्रायव्हर खूप विचित्र वागत होता, पण वरिष्ठ सहकारी शांत होते. टॅक्सीतून उतरल्यावर त्यांनी ड्रायव्हरचे आभार मानले. तेव्हा ड्रायव्हरने आम्ही टॅक्सीतून उतरल्यावर माफी मागितलेली पाहून मला आश्चर्य वाटले. तो म्हटला, मी सलग 24 तासांपासून काम करत आहे, त्यामुळे थोडा चिडलो होतो. मी वरिष्ठ सहकार्‍यांना विचारले की, यादरम्यान तुम्ही शांत कसे राहिलात? त्यांनी उत्तर दिले, ड्रायव्हरच्या विचित्र वागणुकीपेक्षा आपला सुरक्षित प्रवास जास्त महत्त्वाचा होता. विनम्रपणासाठी सुरक्षित प्रवासासोबत तडजोड करणे शक्य नाही.

जे इतरांच्या छोट्याछोट्या चुकांकडे दुर्लक्ष करतात, ते लोकच आनंदी आयुष्य जगू शकतात.

लेखक अमेरिका आणि जपानमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध vijay.batra@ dainikbhaskargroup.com