आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप कंपनी गोझुमोचा निर्णय कौतुकास्पद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार्टअप कंपन्याआता देशात कौतुकाची बाब बनल्या आहेत. त्या पारंपरिक अशा बाजारपेठेत वेगाने नवे उपक्रम आणि बदल घडवून आणत आहेत. त्यांच्या यशाने अनेकांना प्रेरणा दिली. तथापि, ९० टक्क्यांहून अधिक स्टार्टअप गाशा गुंडाळतात आणि गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडतात, ही खरी वस्तुस्थिती मात्र लपवली जाते. नव्या संशोधनासाठी पैसे लागतात आणि बुडणारा पैसा हा त्यासाठीच खर्च होतो. मात्र, या वस्तुस्थितीचा बचाव करता येत नाही. हा पैसा तो अनाठायीच खर्ची घालतात.

मात्र, नुकताच एक बदल पाहण्यास मिळाला. जुन्या वाहन बाजारात काम करणाऱ्या गोझुमो या स्टार्टअप कंपनीने एक निष्कर्ष काढला. तो असा : अनेक बदल करूनही त्यांचे बिझनेस मॉडेल यशस्वी ठरत नाही. यात पुन्हा पैसे गुंतवण्याऐवजी ही कंपनी बंद करून ते लाखो रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसे पाहता हा पैसा ते दाबून ठेवू शकत होते. नव्या कल्पनांवर ते पैसे गुंतवू शकले असते. त्याऐवजी त्यांनी दाखवलेला परिपक्व निर्णय कौतुकास्पद आहे. यात नवे काय? असे तुम्हाला वाटेल. सगळे पैसे गमावून बसल्यावर व्यवसायिक व्यवसाय बंद करून टाकतातच ना? फरक असा की, स्टार्टअप बिझनेस असूनही त्याला वेगळ्या पद्धतीने चालवण्यात येतो. हा व्यवसाय कर्ज घेऊन चालवता येत नाही तर गुंतवणूकदारांच्या विश्वास, व्हिजन आणि पैशावर चालवला जातो. यात असामान्य असा परतावा मिळण्याची शक्यता असल्याने जोखीम घेण्याची क्षमता तयार होते. परंतु कधी कधी निर्णय चुकतात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरही लाखो डॉलर वाया घालवले जातात. अशी प्रकरणे या व्यवस्थेलाच बदनाम करतात. गुंतवणूकदारांत चलबिचल निर्माण करतात. नवे स्टार्टअप सुरू करण्यास अडचणी येतात आणि आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

यामुळेच गोझुमोचा निर्णय योग्य असून नवा बदल म्हणून त्याकडे पाहण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...